Happy Propose Day Wishes in Marathi: या रोमँटिक शुभेच्छांसह ‘प्रपोज डे’ करा साजरा

| Published : Feb 06 2024, 01:31 PM IST / Updated: Feb 06 2024, 01:37 PM IST

propose day quotes

सार

तुम्हाला तुमच्या पार्टनरला, नवरा-बायकोला देखील काहीतरी रोमँटिक मेसेज पाठवायचा असेल तर तुम्ही प्रपोज डेच्या (Propose Day) निमित्ताने पाठवू शकता. यामुळे तुमच्या खास व्यक्तीचा दिवस अधिक सुंदर होईल.

Propose Day 2024 : सात फेब्रुवारीपासून व्हॅलेंटाईन वीकची (Valentine Week) सुरुवात होते. रोझ डे (Rose Day) आपल्या आवडत्या व्यक्तीला ‘रोझ’ देऊन आपल्या मनातल्या भावना व्यक्त केल्यानंतर दुसरा दिवस येतो ‘प्रपोझ डे’ (Propose Day) चा. प्रपोज डे हा दिवस रोमँटिक व्हाइब्सने भरलेला आहे. तुमचे अव्यक्त प्रेम व्यक्त करण्यासाठी तर हा अगदी योग्य दिवस आहे. गर्लफ्रेंड, बॉयफ्रेंड, क्रश यांच्यापर्यंत तुम्हाला तुमच्या भावना पोचवायचा असतील तर हा दिवस त्यासाठी परफेक्ट आहे. किंवा तुम्हाला तुमच्या पार्टनरला, नवरा-बायकोला देखील काहीतरी रोमँटिक मेसेज पाठवायचा असेल तर तुम्ही प्रपोज डेच्या निमित्ताने पाठवू शकता. यामुळे तुमच्या खास व्यक्तीचा दिवस अधिक सुंदर होईल.

Propose Day Messages : रोमँटिक प्रपोज डे मेसेज शुभेच्छा :

  • तुझ्या होकार किंवा नकारावर माझे पुढचे सगळे आयुष्य अवलंबून आहे. मला नकार द्यायचा की होकार हे तुझ्या हातात असले तरी मी तुझ्यावर शेवटपर्यंत प्रेम करत राहीन. Happy Propose Day !
  • तुला जिंकून घेण्याचे मला लागलेय आहे वेड, मला समजून घेशील ना? तुझ्या प्रेमाची मला लागलीये ओढ, साथ मला देशील ना? Happy Propose Day !
  • तुझ्या आयुष्यात मी असेन किंवा नसेन, ते तुझ्या हातात आहे. पण माझ्या हृदयात तुझाच चेहरा व मनावर तुझेच नाव कोरले गेले आहे हे सत्य कधीच बदलणार नाही. Happy Propose Day !
  • कुणीतरी राहावं आपल्या हृदयात असं तुलाही वाटत असेलच ना? मी तर तुझी निवड केली, तुही माझी निवड करशील ना? Happy Propose Day !
  • श्वासात श्वास व जीवात जीव असेपर्यंत तुला साथ देईन. आयुष्याच्या प्रत्येक वादळात तुझा हात घट्ट धरून ठेवेन हे माझे तुला वचन आहे.या प्रवासात तू मला सोबत करशील का? तुझ्या उत्तराची वाट बघणारा तुझाच…. Happy Propose Day !
  • हातात असावा फक्त तुझाच हात, तुझी मिळावी आयुष्यभराची साथ…देवाने बांधली आपली गाठ, कोणी करू नये आपल्या प्रेमावर मात… Happy Propose Day !
  • प्रेम म्हणजे काय हे प्रेमात पडल्याशिवाय कळत नाही. मैत्रीचा सुंदर अनुभव तर आपण घेतला आहे. प्रेमाची सुंदर अनुभूती एकमेकांबरोबर घेऊया का? माझ्या प्रेमाचा स्वीकार करशील का? Happy Propose Day!
  • माझ्या आयुष्यातील सर्वात खास व प्रिय व्यक्तीला प्रपोज डे च्या शुभेच्छा! या जन्मात जसे आपली एकमेकांना साथ आहे तशीच पुढच्या अनेक जन्मात मला साथ देशील ना? Happy Propose Day!
  • आजवर मला मैत्रीण म्हणून सोबत केलीस, तशी आयुष्याची सहचारिणी म्हणून साथ देशील का? मैत्रीची पुढची पायरी म्हणजे प्रेम असते. ही पुढची पायरी माझ्याबरोबर चढशील का? Happy Propose Day !
  • मला पुढचा जन्म मिळाला तर त्या जन्मातही मला तुझेच व्हायचे आहे. पुढच्या शंभर जन्मांसाठी तुला आत्ताच प्रपोज करतो /करते आहे. माझं प्रपोझल स्वीकारशील ना? Happy Propose Day !

आणखी वाचा -

फक्त 50 रुपयांत प्रेयसीला द्या Valentine Day चे खास गिफ्ट

Rose Day 2024: रोझ डेच्या निमित्ताने तुमच्या प्रेमाच्या व्यक्तीला पाठवा खास मेसेज

Valentine Day Week List 2024 : फेब्रुवारी महिन्यात या दिवसापासून सुरू होणार 'व्हॅलेंनटाइन वीक', पाहा 'रोझ डे ते किस डे' पर्यंतचे कॅलेण्डर