सार
काही घरांमध्ये तुळशीचे रोप दीर्घकाळ टिकत राहत नाही. काही कारणास्तव सुकल जाते. तुमच्यासोबतही असेच होत असल्यास तुळशीचे रोप लावताना काही चुका होतायत हे लक्षात घ्या.
Tulsi Puja Niyam : हिंदू धर्मात तुळशीच्या रोपाला फार महत्व आहे. देवाला नैवेद्य किंवा प्रसाद दाखवण्याआधी त्यावर तुळशीचे पान ठेवले जाते. हेच कारण आहे की, भारतातील बहुतांशजणांच्या घरात तुळशीचे रोप लावले जाते. पण काही घरांमध्ये तुळशीचे रोप दीर्घकाळ टिकले जात नाही. लगेच सुकले जाते. तुमच्यासोबतही असेच होत असल्यास तुळशीचे रोप लावताना तुम्ही काही चुका करताय हे लक्षात घ्या.
तुळशीचे रोप लावण्याधी करा हे काम
धार्मिक मान्यतेनुसार, तुळशीच्या रोपात देवी लक्ष्मीचा वास असतो. यामुळे नर्सरीमधून आणल्यानंतर थेट घरातील कुंडीत लावू नका. यासाठी शुभ दिवस आणि तारीख निवडा. यानंतर सर्व देवी-देवतांची पूजा करत देवी तुळशी मातेला घरात विराजमान होण्यासाठी प्रार्थना करा. ज्या ठिकाणी तुळशीचे रोप लावत आहात तेथे स्वच्छता असू द्या. तुळशीच्या रोपाला दररोज पाणी घालण्यासह हळद-कुंकू, चंदनाची टिळाही लावा. सकाळ-संध्याकाळी तुळशीच्या रोपापुढे दिवा लावा.
या गोष्टींची घ्या काळजी
तुळशीचे रोप लावताना काही गोष्टींची विशेष काळजी घ्यावी. तुळशीचे रोप दक्षिण दिशेला लावू नये. याशिवाय एकादशी आणि रविवारी तुळशीला पाणी किंवा दिवा लावू नये. धार्मिक मान्यतेनुसार, तुळशीच्या रोपात देवी लक्ष्मीचा वास असतो. या दिवशी तुळशी मातेकडून भगवान विष्णूसाठी निर्जळ व्रत केले जाते. एवढेच नव्हे सूर्य आणि चंद्र ग्रहणावेळीही तुळशीच्या रोपाजवळ दिवा लावू नये. असे मानले जाते की, तुळशीच्या रोपाजवळ भगवान शंकर आणि गणपतीची मुर्ती देखील ठेवू नये.
या महिन्यात लावाले तुळशीचे रोप
तुळशीचे रोप ऑक्टोंबर आणि नोव्हेंबर महिन्यात लावणे शुभ मानले जाते. या महिन्यात लावलेले तुळशीचे रोप लवकर सुकण्याची शक्यता कमी असते. रोप बुधवारी किंवा गुरुवारी लावणे शुभ असते. तुळशीचे रोप लावताना आखणी एक गोष्ट लक्षात ठेवावी की, रोपाच्या फांद्याचा कधीच जमिनीला स्पर्श होऊ देऊ नये.
(DISCLAIMER : लेखाद्वारे वाचकांपर्यंत केवळ माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत. याबाबत Asianet News Marathi कोणताही दावा व समर्थन करत नाही. यासाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)
आणखी वाचा :
भारतातील 12 ज्योतिर्लिंगांच्या दर्शनाने होणारे लाभ, आयुष्यात एकदा जा
मुंबईत फिरायला गेल्यास नक्की ट्राय करा हे 10 Foods, 3 तर वर्ल्ड फेमस