भगवान शंकरांच्या लिंगाची पूजा करणे शुभ फलदायी मानले जाते. देशात वेगवेगळ्या राज्यात अशी एकूण 12 ज्योतिर्लिंग आहेत. या ज्योतिर्लिंगांच्या दर्शनाने आयुष्यात कोणते लाभ होतात हे पाहूया.
गुजरातमधील सोमनाथ मंदिरात भाविकांची फार मोठी गर्दी होते. या मंदिरात दर्शन घेतल्यानंतर आयुष्यात धनप्राप्ती आणि शांती येते असे मानले जाते.
आंध्र प्रदेशातील मल्लिकार्जुन मंदिरातील दर्शनानंतर आयुष्यातील सर्व वाईट रुपांमधून मुक्ती मिळते असे म्हटले जाते.
आयुष्यात एकदा तरी महाकालेश्वरच्या दर्शनासाठी जावे. असे म्हटले जाते की, महाकालेश्वरच्या दर्शनाने सर्व प्रकारच्या भयातून मुक्ती मिळते.
मध्य प्रदेशातील ओंकारेश्वर मंदिरात दर्शनाने आयुष्यात यश मिळते आणि भाविकांच्या इच्छा पूर्ण होतात असे मानले जाते.
केदारनाथ येथे दर्शन घेतल्यानंतर आयुष्यातील सर्व पापांमधून मुक्ती मिळते असे मानले जाते.
भीमाशंकर मंदिरात भगवान शंकराच्या पूजा-दर्शनाने आयुष्यात यश मिळते असे म्हणतात.
काशी विश्वेशनाथ मंदिरात दर्शनामुळे सर्व प्रकारच्या कर्मांपासून मुक्ती मिळते अशी मान्यता आहे. हे मंदिर उत्तर प्रदेशात स्थित आहे.
महाराष्ट्रातील त्र्यंबकेश्वर येथे मनोकामना पूर्ण होतात असे मानले जाते. महाशिवरात्रीच्या वेळी त्र्यंबकेश्वराच्या मंदिरात दर्शनासाठी फार मोठी गर्दी होते.
झारखंडमध्ये असलेल्या भगवान शंकरांच्या 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक वैद्यनाथ येथे दर्शनाने सर्व प्रकारच्या रोगांपासून मुक्ती मिळते.
गुजरातमधील नागेश्वर मंदिरात दर्शनाने सर्व पापांमधून मुक्तता होते असे मानले जाते.
तमिळनाडूतील रामेश्वरम मंदिराला स्वर्गाचा प्रवेशद्वार असल्याचे मानले जाते. आयुष्यात एकदातरी या मंदिरात दर्शनासाठी यावे.
औरंगाबाद येथे असलेल्या भगवान शंकराच्या 12 ज्योतिर्लिंमधील एक घृष्णेश्वर मंदिरात दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी होते. या मंदिरात दर्शनानंतर घरात समृद्धी येते असे म्हणतात.
लेखाद्वारे वाचकांपर्यंत केवळ माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत. याबाबत Asianet News Marathi कोणताही दावा व समर्थन करत नाही. यासाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.