Marathi

मुंबईत फिरायला गेल्यास नक्की ट्राय करा हे 10 Foods, 3 तर वर्ल्ड फेमस

Marathi

मुंबईतील फूड

मायानगरी म्हणून ओखळल्या जाणाऱ्या मुंबईत येण्याचे प्रत्येकाचे स्वप्न असते. मुंबईत आयुष्य जगणे कठीण असले तरीही खिशाला परवडणाऱ्या किंमतीत काही फूड्सचे वेगवेगळे प्रकार चाखायला मिळतात.

Image credits: Instagram
Marathi

वडापाव

मुंबईकरांच्या सर्वाधिक आवडीचा पदार्थ म्हणजे वडा पाव. खिशाला परवडणाऱ्या किंमतीतील वडापाव प्रत्येक मुंबईकर आवडीने खातो. 

Image credits: Facebook
Marathi

भेलपुरी

संध्याकाळच्या स्नॅक टाइमवेळी खाल्ला जाणारा पदार्थ म्हणजे भेलपुरी. मुंबईतील चौपाटींसह रस्त्यांवर भेलपुरीचे अनेक स्टॉल दिसून येतात. 

Image credits: facebook
Marathi

पावभाजी

मुंबईत पावभाजी देखील आवडीने खाल्ली जाते. पावभाजीसाठी मुंबईतील काही हॉटेल्स, खाऊगल्ली प्रसिद्ध आहेत. 

Image credits: Instagram
Marathi

अकुरी

पारसी नागरिकांमध्ये आकुरी पदार्थ आवडीने खाल्ला जातो. चवीने तिखट असणारा आकुरी पदार्थाची चव तुम्हाल इराणी कॅफेमध्ये चाखता येईल. 

Image credits: Instagram
Marathi

फ्रँकी

कॉलेज किंवा ऑफिसला जाणारे बहुतांशजण स्नॅक टाइमवेळी फ्रँकी खातात. 50 रुपयांपासून सुरु होणाऱ्या फ्रँकीचे वेगवेगळे प्रकार मुंबईत खायला मिळतात. 

Image credits: Facebook
Marathi

बोंबील फ्राय

नॉन-व्हेज पदार्थांमध्ये मुंबईत चिकट, मटणासह मासेही आवडीने खाल्ले जातात. बोंबील फ्राय प्रत्येकजण आवडीने खातो. सध्या बोंबील फ्रायही वेगवेगळ्या प्रकारे हॉटेल्समध्ये सर्व्ह केले जाते. 

Image credits: Facebook
Marathi

बॉम्बे सँडविच

मुंबईतील प्रसिद्ध फूडपैकी एक म्हणजे बॉम्बे सँडविच. तीन लेअर असणाऱ्या सँडविचमध्ये भाज्या, बटाट्याची भाजी, मिरचीची चटणी, बटर लावून तयार केले जाते. 

Image credits: Instagram
Marathi

रगडा पॅटिस

भेलपुरीसह रगडा पॅटिसही मुंबईत आवडीने खाल्ला जातो. यामध्ये बटाट्याच्या पॅटिससोबत आंबड-गोड आणि तिखट पाणी दिले जाते. यावरुन कांदा, टोमॅटो आणि कोथिंबीरने गार्निशिंग केले जाते. 

Image credits: Facebook
Marathi

बन मस्का

इराणी कॅफेमध्ये गेल्यानंतर तेथील चहा, कॉफीसोबत बन मस्का आवर्जून  खाल्ला जातो. पावाला भरपूर प्रमाणात बटर लावून तुम्हाला खाण्यासाठी सर्व्ह केला जातो. 

Image credits: Facebook
Marathi

खिमा घोटाळा

नॉन-व्हेज खवय्यांसाठी मुंबईत आणखी एक प्रसिद्ध डिश खिमा घोटाळा आहे. खिमा चिकन किंवा मटणाचाही येतो. प्रत्येकाची खिमा तयार करण्याची पद्धत वेगवेगळी असते. 

Image credits: Instgaram

हातापेक्षा लांब हवेत बेलाचे पानं, कुंडीऐवजी 'या' जागी लावून पहा रोपटं

नवरात्रीत 7 Gujrati Blouse तुम्हाला दिसतील झक्कास, गरब्यात दिसाल खास!

डास आणि माश्या दूर होतील, घरीच बनवा हे 5 फ्लोअर क्लीनर

Bracelet चे हे 8 डिझाइन्स बजेटसह देतील परफेक्ट लूक