तुम्ही Jio, Airtel युजर्स आहात? पाहू शकता फुकटात नेटफ्लिक्स
जिओ किंवा एअरटेलच्या युजर्सला कोणत्याही शुल्काशिवाय प्रसिद्ध ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्स पाहता येणार आहे. या ओटीटी प्लॅटफॉर्मवर तुम्ही फुकटात सिनेमे, वेब सीरिज पाहू शकता.
जिओच्या दोन प्रीपेड प्लॅनमध्ये नेटफ्लिक्स अॅपचे सब्सक्रिप्शन फुकटात दिले जात आहे. यामधील पहिला प्लॅन 1 हजार 99 रूपयांचा आहे. या प्लॅनमध्ये तुम्ही फ्री नेटफ्लिक्स पाहू शकता.
फ्री नेटफ्लिक्सव्यतिरिक्त युजर्सला 84 दिवसांच्या वॅलिडिटीसह प्रतिदिन 2GB इंटरनेट डेटा, अनलिमिडेट कॉलिंग आणि 100 SMS सारखी सुविधा कंपनीकडून दिली जाणार आहे.
जिओचा दुसरा प्लॅन 1 हजार 499 रूपयांचा आहे. यामध्ये युजर्सला नेटफ्लिक्सचे फ्री सब्सक्रिप्शन मिळणार आहे.
जिओच्या या प्लॅनमध्ये युजर्सला नेटफ्लिक्ससह 84 दिवसांपर्यंत प्रतिदिन 3GB इंटरनेट, 100 SMS, अनलिमिटेड कॉलिंग, जिओ सिनेमा, जिओ टीव्ही सारख्या सुविधा कंपनी देणार आहे.
एअरटेलच्या 1 हजार 499 रूपयांच्या प्लॅनमध्ये युजर्सला नेटफ्लिक्सचा बेसिक प्लॅन फ्री मिळणार आहे. तर 84 दिवसांपर्यंत प्रतिदिन 3GB डेटा, अनलिमिटेड कॉलिंग, 100 SMSची सुविधा मिळणार आहे.
एअरटेलच्या या पॅकमध्ये युजर्सला हॅलोट्यून्स, विंक म्युझिक, अपोलो 24*7 सारखी सुविधा मोफत मिळणार आहे.