सार

Tech News: डीपफेक व्हिडीओ अथवा ऑडिओ आर्टिफिशियल इंटेलिजेंसच्या मदतीने तयार केले जातात. डीपफेक व्हिडीओ आणि ऑडिओ सध्या सोशल मीडियात खूप व्हायरल होतायत. पण एखादा व्हिडीओ खरा आहे की बनवाट कसा ओळखायचा? याबद्दल जाणून घेऊया सविस्तर...

Deepfake Video: बॉलिवूडमधील अभिनेत्री रश्मिका मंदाना, कतरिना कैफ आणि आलिया भटसह काही अन्य लोकांचे अलिकडल्या काळात डीपफेक व्हिडीओ इंटरनेटवर व्हायरल झाले होते. खरंतर डीपफेक व्हिडीओ पाहताना ते खरे असल्याचे भासते. पण ते बनावट आहेत ओळखणे देखील तितकेच मुश्किल आहे. या डीपफेकमुळे देशातील सरकारही चिंतेत आहे. 

सोशल मीडियात डीपफेकबद्दल जोरदार चर्चा सुरू आहे. पण इंटरनेटवर डीपफेक संदर्भातील माहिती फार कमी उपलब्ध आहे. अशातच लोक लोक डीपफेक आणि आर्टिफिशियल इंटेलिजेंस या दोन्ही गोष्टींमध्ये गोंधळलेले असतात. डीपफेक नक्की काय? हे तंत्रज्ञान कसे काम करते अशा सर्व गोष्टींबद्दल जाणून घेऊयात सविस्तर...

डीपफेक व्हिडीओ
डीपफेक व्हिडीओ, जे आर्टिफिशियल इंटेलिजेंसच्या (Artificial Intelligence) मदतीने तयार केले जातात. डीपफेकचे काही प्रकार असतात. यामध्ये एखाद्या व्यक्तीचा चेहरा दुसऱ्या व्यक्तीच्या चेहऱ्यामध्ये बदलला जाऊ शकतो. तसेच ऑडिओ क्लोनिंग (Audio Cloning) देखील केले जाऊ शकते. व्यक्तीचा आवाज क्लोन करून म्हणजेच त्या व्यक्तीचा आवाज वापरून अशा गोष्टी बोलायला लावल्या जातात ज्या त्याने कधीच बोलल्या नाहीत. एवढेच नव्हे तर मृत्यू झालेल्या व्यक्तीचा चेहरा वापरूनही डीपफेक व्हिडीओ तयार केले जाऊ शकतात.

डीपफेकचा वापर करणारा डिकोडर (Decoder) सर्वप्रथम व्यक्तीच्या चेहऱ्याचे हावभाव, तो कसा दिसतो याचा सखोल अभ्यास करतो. त्यानंतर एखाद्या बनावट चेहऱ्यावर दुसऱ्या व्यक्तीचा चेहरा लावला जातो. डीपफेक तंत्रज्ञानासाठी काही गोष्टींची मदत घ्यावी लागते. सर्वसामान्य लोकांना डीपफेक व्हिडीओ तयार करणे शक्य नाही. परंतु सध्या डीपफेकसंदर्भातील वेगवेगळे अ‍ॅप मार्केटमध्ये उपलब्ध आहेत. या अ‍ॅपच्या मदतीने सहज डीपफेक व्हिडीओ तयार केले जाऊ शकतात.

असे ओळखा डीपफेक व्हिडीओ

  • एखाद्या व्हिडीओवर विश्वास ठेवण्यापूर्वी त्यामध्ये जे काही बोलले जात आहे ते खरं आहे का? याचा विचार करा.
  • व्हिडीओ अथवा ऑडिओची सत्यता पडताळून पाहा. यासाठी अन्य ठिकाणी तो व्हिडीओ तसाच दिसतोय का हे देखील पाहा.
  • डीपफेकमधील चुका तुम्ही सहज ओळखू शकता. जसे- कान-नाक व्यवस्थितीत न दिसणे, दातांचा, डोळ्यांच्या पापण्या, भुवयांचा आकार इत्यादी.
  • डीपफेक व्हिडीओ झूम (Zoom) करून पाहिल्यास त्यामध्ये बोलत असलेल्या व्यक्तीचे हावभाव तपासून पाहू शकता. अधिक जवळून पाहिल्यास त्या व्यक्तीच्या ओठांच्या हालचालीवरून तुम्हाला कळू शकते तो व्हिडीओ बनावट आहे की खरा. (Deepfake Video Kase Olkhayche)

डीपफेकचे तोटे
डीपफेक व्हिडीओमुळे लोकांच्या मानसिकतेवर परिणाम होऊ शकतो. खासकरून ग्रामीण भागात, जेथे तंत्रज्ञान विकसित नाही तेथे एखाद्या व्यक्तीची व्यक्तिमत्त्व बिघडवण्याचा डीपफेकच्या माध्यमातून प्रयत्न केला जाऊ शकतो. डीपफेकमुळे काही गोष्टी सहज साध्य होत असल्या तरीही याचा नकारात्मक परिणाम एखाद्याच्या आयुष्यावर होऊ शकतो.

आणखी वाचा: 

DRY CLEANचा खर्च टाळायचाय? घरच्या घरी असा स्वच्छ धुवा ओव्हरकोट

Aadhaar Card: PVC आधार कार्ड काढायंच? जाणून घ्या घरबसल्या अर्ज करण्याची प्रक्रिया

Vastu Tips: आर्थिक समस्यांचा सामना करताय? खरेदी करा या रंगाची पर्स