- Home
- lifestyle
- रात्री ट्रेन प्रवास करताय?, या ५ महत्त्वाच्या टिप्स तुमच्या प्रवासाचा अनुभव बदलून टाकतील!
रात्री ट्रेन प्रवास करताय?, या ५ महत्त्वाच्या टिप्स तुमच्या प्रवासाचा अनुभव बदलून टाकतील!
Late Night Train Journey Rules : भारतीय प्रवासासाठी सर्वाधिक ट्रेनवर अवलंबून असतात. दिवसा असो वा रात्री, ट्रेनचा प्रवास आरामदायक असतो. दररोज अनेक लोक देशभरात प्रवास करतात.

रात्रीचा ट्रेन प्रवास
रात्री ट्रेनने प्रवास करणाऱ्यांनी काही गोष्टी पाळल्या पाहिजेत. सहप्रवाशांना कोणताही त्रास होणार नाही याची प्रत्येकाने काळजी घ्यावी.
आवाज
रात्रीच्या प्रवासात ट्रेनमध्ये मोठ्याने बोलू नका किंवा फोनवर मोठ्या आवाजात गाणी लावू नका. विशेषतः रात्री १० नंतर शांतता राखण्याचा प्रयत्न करा. यामुळे सहप्रवाशांना त्रास न होता झोपता येते.
लाइट
रात्रीच्या प्रवासात फक्त नाईट लाईट वापरण्याची काळजी घ्या. इतर सर्व लाईट्स बंद करा. कोणत्याही परिस्थितीत सहप्रवाशांच्या झोपेत व्यत्यय आणू नका.
मिडल बर्थ
मिडल बर्थसाठी एक निश्चित वेळ ठरलेली आहे. रात्री १० ते सकाळी ६ वाजेपर्यंत मिडल बर्थची वेळ असते. त्यामुळे लोअर बर्थवरील प्रवाशांनी मिडल बर्थवाल्यांना सहकार्य करावे.
जेवण
बहुतेक ट्रेनमध्ये रात्री १० वाजता ऑनबोर्ड फूड सर्व्हिस बंद होते. जर तुम्हाला रात्री उशिरा जेवायची सवय असेल, तर जेवण आधीच ऑर्डर करा.
चार्जिंग
अनेक झोनमध्ये रात्री ११ नंतर ट्रेनमधील पॉवर बंद केली जाते. त्यामुळे तुमचा मोबाईल फोन किंवा लॅपटॉप रात्री ११ च्या आधीच चार्ज करण्याचा प्रयत्न करा.

