जुन्या व्हेलवेट कुर्तापासून तयार करा या 9 Creative Things

| Published : Dec 18 2024, 08:48 AM IST

Reuse old velvet kurti and make creative things at home

सार

Old Velvet Kurta Reuse : जुनी व्हेलवेट कुर्ता फेकून देण्याएवजी त्याचा पुन्हा वेगवेगळ्या प्रकारे वापर करू शकता. यापासून ब्लाऊज ते टेबल रनर तयार करू शकता.

Old Velvet Kurta Reuse : तुमच्याकडे एखादा जुना व्हेलवेट कुर्ता असल्यास आणि तो फेकण्याचा विचार करताय तर थांबा. कारण जुन्या व्हेलवेट कुर्ताचा पुन्हा वापर करुन एखादी नवी क्रिएटिव्ह वस्तू तयार करू शकता. पाहूया जुन्या व्हेलवेट कुर्तापासून काय-काय तयार करू शकता हे पुढे.....

व्हेलवेट ब्लाऊज

कुर्तापासून व्हेलवेटचे ब्लाऊज तयार करु शकता. हे ब्लाऊज साडी किंवा लेहेंग्यावर फार सुंदर दिसेल.

पोटली बॅग

व्हेलवेटच्या कापडापासून पोटली बॅग तयार करण्याची आयडिया बेस्ट आहे. या बॅगला गोटा-पट्टी किंवा मोत्यांनी सजावट करू शकता.

कुशन कव्हर

व्हेलवेटच्या कापडापासून बेड किंवा सोफ्यासाठी कुशन कव्हर तयार करू शकता. या कव्हरला आकर्षक लूक देण्यासाठी गोटा-पट्टी किंवा फ्रिंजने सजवा.

शॉर्ट जॅकेट

कुर्तापासून क्रॉप जॅकेट तयार करत एथनिक लूक क्रिएट करू शकता. हे जॅकेट साडी किंवा सूटवर ट्राय करा.

क्लच किंवा स्लिंग बॅग

व्हेलवेट कुर्तापासून एक लहान क्लच किंवा स्टायलिश स्लिंग बॅग तयार करा. पार्टी किंवा एखाद्या फंक्शनवेळी ही बॅग वापरता येऊ शकते.

व्हेलवेट दुपट्टा

कुर्ताचा कापड लांबलचक कापून घेत त्यापासून सुंदर असा दुपट्टा तयार करू शकता.

टेबल रनर

व्हेलवेटच्या कापडापासून टेबल रनर किंवा साइड टेबल कव्हर तयार करू शकता. याला जरी किंवा लेसची बॉर्डर लावून सजवा.

व्हेलवेट हेअर एक्ससेरिज

व्हेलवेटच्या कुर्तापासून हेअर बँड किंवा ब्रोच तयार करू शकता.

स्लीव्हलेस कुर्ता किंवा क्रॉप टॉप

जुन्या व्हेलवेटच्या कुर्ताला नवा लूक देण्यासाठी स्लीव्हलेस कुर्ता किंवा क्रॉप टॉप तयार करू शकता.

आणखी वाचा : 

काळवंडलेल्या कोपऱ्यांच्या समस्येवर सोपा उपाय, आठवड्याभरात दिसेल फरक

वयाच्या पंन्नाशीतही दिसाल तरुण, नेसा Neelam Kothari सारख्या 6 साड्या