सातत्याने पोट बिघडतेय? असू शकतात या Cancer ची लक्षणे, वेळीच सावध व्हा

| Published : Apr 01 2024, 12:35 PM IST / Updated: Apr 01 2024, 12:38 PM IST

Colon cancer

सार

सध्या देशभरात कोलन कॅन्सरच्या रुग्णांचा आकडा वेगाने वाढत चालला आहे. अशातच कोलन कॅन्सरच्या धोक्यापासून दूर राहण्यासाठी लाइफस्टाइलमध्ये बदल करणे अत्यावश्यक आहे.

Health Care : देशभरात कॅन्सरच्या रुग्णांचा आकडा दिवसागणिक वाढत चालला आहे. कॅन्सर हा जीवघेणा आजार असून त्याचे काही प्रकार असतात. जगभरात होणाऱ्या एकूण मृत्यूच्या दरातील सर्वाधिक मोठे कारण कॅन्सर देखील आहे. त्यापैकीच एक म्हणजे ‘कोलोरेक्टल कॅन्सर’, याला ‘कोलन कॅन्सर’ (Colon Cancer) असेही म्हटले जाते. सर्वसामान्यपणे कोलन कॅन्सर वयाच्या 60 वर्षापेक्षा अधिक वयोगटातील व्यक्तींना होतो. जाणून घेऊया कोलन कॅन्सरची लक्षणे आणि उपाय याबद्दल सविस्तर...

कोलन कॅन्सर नक्की काय आहे?
आरोग्य तज्ज्ञांनुसार, मोठ्या आतड्यांमध्ये होणाऱ्या कॅन्सरला कोलोरेक्टल कॅन्सर किंवा कोलन कॅन्सर म्हटले जाते. हा कॅन्सर सर्वसामान्यपणे शरिरातील कोलन भागात होतो, जेथे रेक्टमचा भाग प्रभावित होऊ शकतो. यामध्ये मोठ्या आतड्याचे फार मोठे नुकसान होते. याच कारणास्तव याला आतड्यांचा कॅन्सर किंवा रेक्टल कॅन्सरही म्हटले जाते. यामुळे वेळीच उपचार न केल्यास व्यक्तीचा मृत्यूही होऊ शकतो.

कोलन कॅन्सरची लक्षणे

  • मलत्याग करण्याच्या सवयीत बदल, जसे की, बद्धकोष्ठता.
  • मलाच्या माध्यमातून रक्त पडणे
  • पोट दुखणे
  • शरिरात लोहाच्या कमतरेतमुळे रक्ताची कमी
  • थकवा जाणवणे
  • भूक न लागणे
  • अचानक वजन कमी होणे

लाइफस्टाइलमध्ये करा बदल
कोलन कॅन्सरचा धोका कमी करण्यासाठी तुम्ही तुमच्या लाइफस्टाइलमध्ये बदल केला पाहिजे. यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या, फळे आणि कडधान्यांचा समावेश आहारात करावा. मद्यपान आणि धुम्रपान करणे टाळले पाहिजे. याशिवाय दररोज व्यायाम आणि हेल्दी डाएटचे सेवन करावे. यामध्ये खनिज, लोह, व्हिटॅमिन, फायबर आणि अँटीऑक्सिडेंट्सयुक्त गुणधर्म असणारी फळ, भाज्यांचे सेवन करावे.

(Disclaimer : सदर लेख केवळ सामान्य माहिती देण्याकरिता आहे. Asianet News या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी आपण तज्ज्ञ किंवा आपल्या ओळखीच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)

आणखी वाचा : 

Health Care: सकाळी उठल्या नंतर तांब्याच्या भांड्यात पाणी पित पिताय? तर हे नक्की वाचा..

निरोगी आयुष्याची गुरुकिल्ली कोणती ? हे 5 महत्त्वाचे नियम शरीराला लावाच

Health News : आपल्या शरीरासाठी काय चांगलं साखर की गूळ?