सार

सध्या बदलत्या जीवनशैलीनुसार प्रत्येक व्यक्तीला कोणते न कोणते आजार आहेतच.त्यामुळे निरोगी राहाणे आजच्या काळात सगळ्यात महत्वाचे आहे.त्यासाठी काय करायला हवे हे जाणून घ्या.

सध्या बदलत्या जीवनशैलीनुसार प्रत्येक व्यक्तीला कोणते न कोणते आजार आहेतच.त्यामुळे निरोगी राहाणे आजच्या काळात सगळ्यात महत्वाचे आहे.तसेच सध्याच्या काळात खूप जास्त वेळ बसून काम करण्याची पद्धत आहे. त्यामुळे शरीराला कोणताही व्यायाम मिळत नाही आणि परिणामी आजारांनी ग्रासले जाते.

पूर्वीच्या काळात प्रत्येक काम हाताने केले जायचे त्यामुळे शरीराचा व्यायाम व्हायचा मात्र आता हे सगळं यांत्रिकीकरणाने वेधलं असल्यामुळे प्रत्येक कामाला मशीनचा उपयोग केला जात आहे. मग ते कपडे धुण्यापासून ते ऑफिसाममध्ये जाण्या पर्यंत सगळं काही सहज आणि सोप झालं आहे. त्यामुळे शरीर मंदावला आणि वेग वेगळे व्याधी सुरु झाले.

आयुष्य जरी धकाधकीचे झाले असले तरी जीवनशैली बैठी झाली आहे. ही बैठी जीवनशैलीच आरोग्याचा शत्रू बनली आहे. दिवस-दिवस एकाच जागेवर बसून सगळ्यांची वजने वाढू लागली.या वजनवाढीतूनच मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयविकार, सांध्याचे आजार, पीसीओडी, वंध्यत्व अशा आजारांच्या संख्येत वाढ झाली.तसेच हे आजार केवळ, चाळिशी उलटलेल्या प्रौढांचे राहिले नाहीत, तर विशी-पंचविशीच्या युवावर्गातही दिसू लागले आहेत. संतुलित आहार, नियमित व्यायाम, योग्य वेळी योग्य काळासाठी झोपणे, व्यसने नसणे आणि तणाव नियंत्रित ठेवणे ही आरोग्याची पंचसूत्रे असतात.आजच्या जीवनशैलीत आरोग्याच्या या सर्वच नियमांना हरताळ फासला आहे. त्यामुळे जीवनशैलीत बदल करणे, हीच आयुष्याची गुरुकिल्ली आहे .

निरोगी आयुष्याची पंचसुत्रे :

1.चार वेळा मर्यादित आणि संतुलित आहार

सकाळी नाश्ता, दुपारी जेवण, संध्याकाळी 4-5 च्या सुमारास काही स्नॅक्स आणि रात्री 8-9 च्या दरम्यान जेवण, आहारात पिष्टमय पदार्थ30 टक्के, तेलतुपाचे पदार्थ 25 टक्के आणि 45टक्के प्रथिने असावीत. शाकाहारामध्ये उसळी, डाळी, मोड आलेली धान्ये आणि मांसाहारामध्ये अंडी, चिकन, मांस यातून प्रथिने मिळतात. जोडीला पालेभाज्या, ताजी फळे यातून तंतुमय पदार्थ म्हणजे फायबर असावे.

2.नियमित व्यायाम

बैठ्या जीवनशैलीतून उद्भवणारे आजार टाळायचे असतील, तर नियमितपणे दररोज 35 ते 45 मिनिटे मध्यम तीव्रतेचा व्यायाम केलाच पाहिजे.दररोज 4-6 किलोमीटर भरभर चालण्याचा एरोबिक व्यायाम किंवा 45 मिनिटे वजनांच्या सहाय्याने जिममधील अॅनेरोबिक व्यायाम करायला हवा.

3. झोप आणि विश्रांती

बदलत्या जीवनशैलीनुसार रात्री उशीरा झोपणे आणि गरजेइतकी झोप न घेता दुसऱ्या दिवशी परत कामाला लागणे, यामुळे झोपेच्या वेळेची अनियमितता आणि अपूर्णता वाढीस लागली आहे.झोप अपुरी झाल्याने वजनवाढ होते, मेंदूवर आणि हृदयावर दुष्परिणाम होतात आणि मुख्य म्हणजे तणाव

4.व्यसने बंद

धूम्रपान आणि तंबाखूसेवन हे हृदयविकार आणि उच्च रक्तदाबासाठी सर्वात महत्वाचे जोखमीचे घटक असतात. आजच्या तरुणात आणि तरुणींमध्येदेखील ही व्यसने मोठ्या प्रमाणात वाढत आहेत.

5.ताणतणाव नको 

प्रत्येकालाच ताणतणावाला सामोरे जावे लागते यात काही शंका नाही मात्र हा तणाव वाढतच जात असल्याने त्याचे शरीरावर देखील परिणाम होतात. तणाव नष्ट करता येत नाही, मात्र त्याचे शरीरावर होणारे परिणाम नक्कीच कमी करता येतात.यासाठी मेडीटेशन, योगासने, दीर्घ श्वसन, रीलॅक्सिंग टेक्निक्स यांचा वापर करावा. आपले दिवसाचे काम वेळापत्रकाप्रमाणे आखून करावे. 

आणखी वाचा :

Health News : आपल्या शरीरासाठी काय चांगलं साखर की गूळ?

माइक्रोप्लास्टिकमुळे वाढू शकतो हृदयविकाराच्या झटक्यासह स्ट्रोकचा धोका

Healthy Tips : उष्मघात आणि झळांपासून अशी घ्या स्वतःची काळजी