Health News : आपल्या शरीरासाठी काय चांगलं साखर की गूळ?

| Published : Mar 31 2024, 02:06 PM IST / Updated: Mar 31 2024, 02:11 PM IST

sugar

सार

कमी वयात मधुमेहाचा धोका वाढला आहे. त्यामुळे अनेक लोक खाण्या पिण्याच्या सवयींमध्ये बदल करत आहेत. काहीजण गोड पदार्थ, मिठाई कमी करत आहेत, तर काहीजण साखरेला पर्याय शोधत असून काही जण ब्राउन शुगर वापरतात . यावर साखरेऐवजी गूळ आणि मधाचा वापर केला जातोय.

'साखरेपेक्षा गूळ चांगला' अशी म्हण आपल्या मराठी मध्ये प्रसिद्ध आहे. आणि अलीकडच्या काळात तर ती अत्यंत लोकप्रिय झाली आहे. सध्या आरोग्य आणि तंदुरुस्तीवर भर जातोय. तसेच कमी वयात मधुमेहाचा धोका वाढला आहे. त्यामुळे अनेक लोक खाण्या पिण्याच्या सवयींमध्ये बदल करत आहेत. काहीजण गोड पदार्थ, मिठाई कमी करत आहेत, तर काहीजण साखरेला पर्याय शोधत असून काही जण ब्राउन शुगर वापरतात . यावर साखरेऐवजी गूळ आणि मधाचा वापर केला जातोय. गुळाचा वापर रोजच्या चहापासून ते सणासुदीच्या मिठाईपर्यंत सर्वच गोष्टींमध्ये केला जातो.पण साखरेपेक्षा गूळ खरंच चांगला आहे का? जाणून घ्या नेमकं काय आपल्या शरीराला चांगलं आहे.

साखर आणि गूळ यात काय फरक आहे?

साखर आणि गूळ या दोन्ही गोष्टी उसापासून बनवल्या जातात. परंतु, त्यावर प्रक्रिया करण्याची पद्धत वेगळी आहे. पांढरी साखर एक रिफाईंड स्वीटनर आहे. सल्फर डायऑक्साइड, कॅल्शियम हायड्रॉक्साईड, फॉस्फोरिक अॅसिड यांसारखी रसायने वापरून त्यावर प्रक्रिया केली जाते. त्यामुळे उसातील जीवनसत्त्वे, प्रथिने आणि खनिजे यांसारखी पोषक तत्वे नष्ट होतात. एकूण त्यात कॅलरीजशिवाय कोणताही पोषक घटक नसतो.हेच गूळ बनवताना उसाचा रस उकळला जातो. उसाच्या रसातील पाण्याचं पूर्णपणे बाष्पीभवन होईपर्यंत उकळून घट्ट झालेलं मिश्रण ब्लॉक्समध्ये भरलं जातं. त्यात रिफाईंड असा काही प्रकार नसल्यामुळे गुळातील पोषक तत्वे अबाधित राहतात.गुळामध्ये पोषक तत्वं असतात तर साखरेत ते जवळपास नसल्यात जमा असतात. कॅलरीजच्या बाबतीत दोन्ही पदार्थ समान आहेत.

साखर खाल्ल्यावर काय होतं?

साखर घालून तयार केलेले पदार्थ लगेच पचतात. साखरेमध्ये कोणतीही प्रथिने किंवा खनिजे नसल्यामुळे ती लवकर पचते आणि तेवढ्याच लवकर रक्तात शोषली जातात. यामुळे रक्तातील ग्लुकोजची पातळी लगेच वाढते. जसजसे ग्लुकोज वाढते तसतसे स्वादुपिंड इन्सुलिन बनवत चालते आणि शरीरातील इन्सुलिनचे प्रमाण वाढते.

साखर सोडली तर काय होईल ?

साखरेचा शरीराला कोणत्याही स्वरूपात फायदा नाही उलट नुकसानच आहे. साखरेऐवजी गूळ आणि मध यांसारख्या गोष्टी घेतल्यास त्यांची सवय होण्याचा धोका असतो. तुम्हाला तुमचं वजन नियंत्रणात ठेवायचं असेल किंवा तुमच्या रक्तातील साखरेची पातळी स्थिर ठेवायची असेल, तर गोडाचं सेवन कमी करणं हाच उपाय आहे.

Disclaimer :सदर लेख केवळ सामान्य माहिती देण्याकरिता आहे. Asianet News या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी आपण तज्ज्ञ किंवा आपल्या ओळखीच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

आणखी वाचा :

माइक्रोप्लास्टिकमुळे वाढू शकतो हृदयविकाराच्या झटक्यासह स्ट्रोकचा धोका

Healthy Tips : उष्मघात आणि झळांपासून अशी घ्या स्वतःची काळजी

लहान मुलांच्या पोटात जंत का होतात? यावर उपाय काय आणि लक्षणे कसाही ओळखायची