Spinach Benefits in Winter : हिवाळ्यात शरीर तंदुरुस्त ठेवण्यासाठी पालकाचा आहारात समावेश करणे अत्यंत फायदेशीर ठरतो. भाजी, सूप, पराठा, कोशिंबीर किंवा स्मूदी अशा विविध पद्धतीने पालक खाल्ल्यास रोगप्रतिकारशक्ती वाढते, पचन सुधारते.
Spinach Benefits in Winter : हिवाळ्याच्या दिवसांत थंडीमुळे शरीराची प्रतिकारशक्ती कमी होण्याची शक्यता असते. सर्दी-खोकला, सांधेदुखी, थकवा अशा समस्या अनेकांना जाणवतात. अशा वेळी आहारात पौष्टिक आणि उष्ण गुणधर्म असलेल्या भाज्यांचा समावेश करणे अत्यंत गरजेचे ठरते. पालक ही अशीच एक हिरवी पालेभाजी आहे, जी पोषणमूल्यांनी भरलेली असून हिवाळ्यात शरीरासाठी खूप फायदेशीर मानली जाते. लोह, फायबर, व्हिटॅमिन A, C आणि K ने समृद्ध असलेला पालक योग्य पद्धतीने डाएटमध्ये घेतल्यास तुम्ही थंडीतही तंदुरुस्त राहू शकता.
पालकाची भाजी – रोजच्या जेवणासाठी उत्तम पर्याय
हिवाळ्यात पालकाची साधी किंवा उसळीसोबतची भाजी खाणे खूप लाभदायक ठरते. पालकातील लोह रक्तातील हिमोग्लोबिन वाढवण्यास मदत करते, त्यामुळे अशक्तपणा आणि थकवा कमी होतो. तसेच फायबरमुळे पचन सुधारते आणि बद्धकोष्ठतेची समस्या दूर राहते. थंडीत पचनशक्ती मंदावते, अशा वेळी पालकाची गरम भाजी शरीराला उष्णता देण्यास मदत करते.
पालक सूप – रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी
थंडीत सर्दी-खोकल्यापासून बचाव करण्यासाठी पालकाचे सूप अतिशय उपयुक्त ठरते. गरम पालक सूपमध्ये थोडे आले, लसूण आणि मिरी घातल्यास त्याचा परिणाम अधिक चांगला होतो. पालकातील अँटीऑक्सिडंट्स आणि व्हिटॅमिन C शरीराची रोगप्रतिकारशक्ती मजबूत करतात. रात्री झोपण्यापूर्वी किंवा दुपारी सूप घेतल्यास शरीर उबदार राहते आणि थंडीचा त्रास कमी होतो.
पालक पराठा व भाजीपोळी – ऊर्जेसाठी परिपूर्ण
हिवाळ्यात शरीराला जास्त ऊर्जेची गरज असते. पालक पराठा किंवा पालकाची भाजीपोळी हा एक उत्तम पर्याय आहे. गव्हाच्या पिठात पालक मिसळून बनवलेले पराठे पौष्टिक असतात आणि पोटही बराच वेळ भरलेले राहते. सकाळच्या नाश्त्यासाठी पालक पराठा खाल्ल्यास दिवसभर उत्साह आणि ताकद मिळते.
पालक कोशिंबीर व स्मूदी – हलका पण पौष्टिक आहार
ज्यांना हलका आहार हवा आहे त्यांच्यासाठी पालकाची कोशिंबीर किंवा स्मूदी उत्तम आहे. कच्च्या पालकात पोषक घटक जास्त प्रमाणात टिकून राहतात. दही, लिंबू आणि काकडीसोबत पालकाची कोशिंबीर केल्यास पचन सुधारते आणि वजन नियंत्रणात राहते. मात्र थंडीत कच्चा पालक मर्यादित प्रमाणातच घ्यावा.


