MalayalamNewsableKannadaKannadaPrabhaTeluguTamilBanglaHindiMarathiMyNation
Add Preferred SourceGoogle-icon
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • लेटेस्ट न्यूज
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • वेब स्टोरीज
  • यूटिलिटी न्यूज
  • मुंबई
  • भारत
  • महाराष्ट्र
  • स्पोर्ट्स
  • गुन्ह्याच्या बातम्या
  • विश्व
  • गेम्स
  • Home
  • lifestyle
  • Empty Stomach Tea : रिकाम्या पोटी चहा पिणं खरंच धोकादायक आहे का? अनेकांना हे सत्य माहित नाही

Empty Stomach Tea : रिकाम्या पोटी चहा पिणं खरंच धोकादायक आहे का? अनेकांना हे सत्य माहित नाही

सकाळी उठल्याबरोबर रिकाम्या पोटी चहा पिण्याची सवय तुम्हालाही आहे का? यामुळे ॲसिडिटी, छातीत जळजळ आणि पचनाचे त्रास होऊ शकतात.

2 Min read
Author : Karishma R
Published : Oct 19 2026, 11:04 PM IST
Share this Photo Gallery
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Whatsapp
  • GNFollow Us
19
सकाळी सकाळी चहा पिण्याची सवय आहे?
Image Credit : Asianet News

सकाळी सकाळी चहा पिण्याची सवय आहे?

सकाळी रिकाम्या पोटी चहा पिण्याची सवय तुम्हालाही आहे का? यामुळे ॲसिडिटी, छातीत जळजळ आणि पचनाचे त्रास खरंच होतात का? पाहा ही खास माहिती.

अनेकांची सकाळ चहाशिवाय सुरूच होत नाही. झोपेतून उठल्यावर एक कप गरम चहा पिणं हा अनेकांच्या दिनचर्येचा भाग असतो. चहा प्यायल्याने शरीरात उत्साह आणि तरतरी येते.

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred
29
पचनाशी संबंधित त्रास
Image Credit : Instagram

पचनाशी संबंधित त्रास

पण रिकाम्या पोटी चहा पिण्याच्या सवयीमुळे काहींना पचनाशी संबंधित त्रास होऊ शकतात. मग सकाळी रिकाम्या पोटी चहा प्यायल्याने नेमक्या कोणत्या समस्या निर्माण होतात? यासाठी कोणती काळजी घ्यावी? याची सविस्तर माहिती आपण पाहूया.

Related Articles

Related image1
Viral Story : दुबईची लक्झरी लाइफस्टाइल सोडून उत्तराखंडमध्ये चहा विकतोय तरुण, कारण काय तर...
Related image2
Hot Beverages : गरमागरम चहा-कॉफी पिताय? थांबा! ही एक चूक कॅन्सरचा धोका वाढवू शकते
39
रिकाम्या पोटी चहा प्यायल्यास काय होते?
Image Credit : Instagram

रिकाम्या पोटी चहा प्यायल्यास काय होते?

चहामध्ये कॅफीनसह (Caffeine) अनेक घटक असतात. हे घटक काहींच्या पचनसंस्थेवर आणि पोटातील आम्लतेवर (Acidity) परिणाम करतात. विशेषतः ज्यांना आधीच ॲसिडिटी, गॅस किंवा छातीत जळजळ होण्याचा त्रास आहे, त्यांना सकाळी रिकाम्या पोटी चहा प्यायल्यास जास्त त्रास होऊ शकतो.

49
वैयक्तिक प्रकृतीवर अवलंबून
Image Credit : Instagram

वैयक्तिक प्रकृतीवर अवलंबून

काहींना पोटात जळजळ, मळमळ किंवा पोटदुखीचा त्रास जाणवू शकतो. पण याचा परिणाम सर्वांवर सारखाच होत नाही. तुम्ही किती कडक चहा पिता, चहाचे प्रमाण किती आहे आणि तुमची वैयक्तिक प्रकृती कशी आहे, यावर हे सर्व अवलंबून असते.

59
चहा प्यायल्याने आतड्यांचे नुकसान होते का?
Image Credit : Instagram

चहा प्यायल्याने आतड्यांचे नुकसान होते का?

मर्यादित प्रमाणात चहा प्यायल्याने आतड्यांचे थेट नुकसान होते, असा कोणताही भक्कम वैज्ञानिक पुरावा नाही. तरीही चहातील कॅफीनमुळे काहींच्या आतड्यांच्या हालचाली वाढू शकतात. यामुळे चहा प्यायल्याबरोबर शौचास जावेसे वाटू शकते. संवेदनशील पचनसंस्था असलेल्यांना पोटात पेटके येणे किंवा जुलाब यांसारख्या समस्याही उद्भवू शकतात.

69
जेवणानंतर लगेच चहा पिणे टाळावे
Image Credit : Instagram

जेवणानंतर लगेच चहा पिणे टाळावे

याशिवाय, चहामध्ये असलेले टॅनिन (Tannins) अन्नातील लोह शोषून घेण्याचे प्रमाण कमी करतात. त्यामुळे ज्यांच्या शरीरात लोहाची कमतरता आहे, त्यांनी जेवणासोबत किंवा जेवणानंतर लगेच चहा पिणे टाळले पाहिजे.

79
सकाळी चहा पिताना कोणती काळजी घ्यावी?
Image Credit : Instagram

सकाळी चहा पिताना कोणती काळजी घ्यावी?

- सकाळी उठल्याबरोबर सर्वात आधी एक ग्लास पाणी पिण्याची सवय लावा.

- जर रिकाम्या पोटी चहा प्यायल्याने तुम्हाला त्रास होत असेल, तर हलका नाश्ता केल्यानंतरच चहा प्या.

89
काय काळजी घ्याल?
Image Credit : Instagram

काय काळजी घ्याल?

- चहाचे प्रमाण नेहमी मर्यादित ठेवा आणि जास्त कॅफीनचे सेवन टाळा.

- शरीरात लोहाची कमतरता असल्यास जेवणाच्या आणि चहाच्या वेळेत अंतर ठेवा.

- जर तुम्हाला वारंवार पोटदुखी, छातीत जळजळ किंवा पचनाचे त्रास होत असतील, तर नक्कीच डॉक्टरांचा सल्ला घ्या.

99
चहा पूर्णपणे बंद करू नका पण...
Image Credit : Instagram

चहा पूर्णपणे बंद करू नका पण...

थोडक्यात सांगायचे तर, सर्वांनीच चहा पिणे पूर्णपणे बंद करण्याची गरज नाही. तुमच्या शरीराला मानवेल असे प्रमाण आणि योग्य वेळ निवडणे महत्त्वाचे आहे. निरोगी सकाळच्या दिनचर्येसोबत चहा पिण्याच्या सवयीचा योग्य समतोल राखा.

Lifestyle News in Marathi (जीवनशैली बातम्या): Get the latest lifestyle news updates, fashion trends, and beauty tips in Marathi. Read रिलेशनशिप टिप्स, हेल्थ टिप्स, Travel News & Watch Marathi Lifestyle Video at Asianet Marathi News.

About the Author

KR
Karishma R
करिश्मा भुर्के, एशियानेट या वेबसाइटसाठी कंटेंट रायटर म्हणून कार्यरत. सामना, झी २४ तास, न्यूज १८ लोकमत, महाराष्ट्र टाइम्ससह ७ वर्ष पत्रकारिता क्षेत्रातील अनुभव. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयसह, इन्फ्रास्ट्रक्चर, नागरी विकास, सामाजिक, गाव-खेड्यातील विविध विषयांवर लेखनाची आवड. जोशी-बेडेकर कॉलेजमधून बॅचलर ऑफ मास मीडियाची पदवी, तर साठे महाविद्यालयातून मास्टर्स इन जर्नालिजमचं शिक्षण पूर्ण केलं आहे.
जीवनशैली बातम्या

Gold & Metal Rates

Loading rates…

All cities ›
Recommended Stories
Recommended image1
Cow Ghee Vs Buffalo Ghee : गाईचं तूप की म्हशीचं? रोज खाण्यापूर्वी हे नक्की जाणून घ्या
Recommended image2
Horoscope 1st November 2026 : 1 नोव्हेंबरचं राशीभविष्य : वृषभसह 'या' 3 राशींचा सन्मान वाढणार, कोणाचा दिवस कसा जाणार?
Recommended image3
Stomach Bloating Relief : जेवल्यानंतर पोट फुगतंय का? तज्ज्ञांनी सांगितलेल्या या 4 टिप्स नक्की फॉलो करा
Recommended image4
Vitamin A Vision Discovery : गर्भात बाळाची दृष्टी कशी तयार होते? 30 वर्षांचं कोडं सुटलं
Recommended image5
Stroke Risk: रात्री उशिरा जेवल्याने स्ट्रोकचा धोका वाढतो का?
Related Stories
Recommended image1
Viral Story : दुबईची लक्झरी लाइफस्टाइल सोडून उत्तराखंडमध्ये चहा विकतोय तरुण, कारण काय तर...
Recommended image2
Hot Beverages : गरमागरम चहा-कॉफी पिताय? थांबा! ही एक चूक कॅन्सरचा धोका वाढवू शकते
Asianet
Follow us on
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • About Website
  • Terms of Use
  • Privacy Policy
  • CSAM Policy
  • Complaint Redressal - Website
  • Compliance Report Digital
  • Investors
© Copyright 2026 Asianxt Digital Technologies Private Limited (Formerly known as Asianet News Media & Entertainment Private Limited) | All Rights Reserved