सार

श्रावणातील शनिवारी अश्वत्थ मारुती, नृसिंहाची पूजा केली जाते. पण तुमच्या कुंडलीत राहु-केतूसंबंधित काही समस्या असल्यास श्रावणातील शनिवारी काही उपाय केल्याने ते शांत होऊ शकतात. याबद्दल जाणून घेऊया सविस्तर..

Shravan Shanivar Upay :  श्रावण महिन्याला ५ ऑगस्टपासून सुरुवात झाली आहे. या महिन्यापासून सण-उत्सवांना सुरुवात होते. याशिवाय श्रावणात भगवान शंकरांची पूजा करणे अत्यंत शुभ मानले जाते. या काळात बहुतांशजण उपवास करण्यासह भक्तिरसात तल्लिन होतात. शनिवारचा दिवस हिंदू धर्मात न्यायाची देवता शनिला समर्पित असल्याचे मानले जाते. शनि देव भगवान शंकराचे भक्त आहे. यामुळे श्रावणातील शनिवार अत्यंत खास असतो. अशातच श्रावणातील शनिवारी काही उपाय केल्याने शनि देव प्रसन्न होण्यासह राहु-केतूसंबंधित सर्व समस्यांपासूनही दूर राहू शकता.

या मंत्रांचा जाप कर
श्रावणातील शनिवारी काही विशेष मंत्रांचा जाप करुन तुम्ही शनिसह राहु-केतू शांत करु शकता. "ॐ शं शनैश्चराय नमः" मंत्राचा जाप केल्याने शनिदेवाची कृपा तुमच्यावर कायम राहिल. राहु शांत करण्यासाठी शनिवारी "ॐ रां राहवे नमः" आणि केतूसाठी "ॐ कें केतवे नमः" मंत्राचा जाप 108 वेळा करावा.

बैलाला भोजन द्या
बैल भगवान शंकराचे वाहन मानले जाते. यामुळे बेलाला नंदीचे रुप मानत श्रावण महिन्यातील शनिवारी गुळ आणि चणे खायला द्या. यामुळे भगवान शंकरांसह शनि देवाचे आशीर्वाद मिळतील. याशिवाय राहु-केतूचा प्रभावही कमी होईल. असे मानले जाते की, तुम्ही शनिला प्रसन्न ठेवल्यास आपोआप राहु-केतू स्वत:हून शांत होतात.

काळे वस्र आणि काळे उडदाचे दान
शनिवारी काळ्या रंगातील वस्र, काळे उडद यांचे दान करावे. यामुळे शनि, राहु-केतूसंबंधित दोष कमी होतात. श्रावणात तुम्ही या वस्तूंचे दान केल्यास आयुष्यात स्थिरता आणि आर्थिक लाभही होऊ शकतो.

शनि यंत्राची स्थापना
श्रावणातील शनिवारी पूजेच्या येथे शनि यंत्राची स्थापना करुन नियमित शनि देवाची पूजा केल्याने त्याचे आशीर्वाद मिळतात. यामुळेच श्रावणातील शनिवारी शनि यंत्राची स्थापना करणे शुभ मानले जाते.

भगवान शंकरांची पूजा
भगवान शंकरांची पूजा आणि शिव मंत्रांचा जापन केल्याने कुंडलीतील राहु-केतूसह अन्य ग्रह देखील शांत होतात. या दिवशी भगवान शंकराला जल, फूल, बेलपत्र अर्पण करणे अत्यंत शुभ मानले जाते.

(DISCLAIMER : लेखाद्वारे वाचकांपर्यंत केवळ माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत. याबाबत Asianet News Marathi कोणताही दावा व समर्थन करत नाही. यासाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

आणखी वाचा : 

श्रावणात मुंबईतील शंकरांच्या या 5 प्रसिद्ध मंदिरांना नक्की भेट द्या

Shravani Somvar 2024 : श्रावणी सोमवारी वाचा 'श्री शिवस्तुती', होतील संकटे दूर