5 ऑगस्टपासून श्रावण महिन्याची सुरुवात झाली आहे. या काळात भगवान शंकरांची पूजा केली जाते. अशातच मुंबईतील पुढील काही शंकरांच्या प्रसिद्ध मंदिरांना भेट देऊ शकता.
वर्ष 1890 च्या काळात गिरगाव येथे बाबुलनाथचे मंदिर उभारण्यात आले होते. भगवान शंकरांना समर्पित असणाऱ्या या मंदिरात भाविकांची दर्शनासाठी मोठी गर्दी होते.
अंबरनाथ येथे प्राचीन काळातील भगवान शंकरांचे मंदिर आहे. पांडवांच्या काळात या मंदिराची उभारणी झाल्याचे सांगितले जाते.
वसईतील तुंगारेश्वरच्या टेकडीवर शंकरांचे मंदिर आहे. ट्रेकिंगला जाणारे पर्यटक तुंगारेश्वर मंदिराला नक्की भेट देतात.
महाराष्ट्रातील सर्वाधिक मोठे शिवलिंग असणारे कौपिनेश्वर मंदिर ठाणे येथे आहे. श्रावणात भगवान शंकरांच्या दर्शनासाठी तुम्ही कौपिनेश्वर मंदिराला भेट देऊ शकता.
आरे कॉलनीच्या पश्चिमेला स्वयंभू तपेश्वर शिव मंदिर आहे. हे मंदिर वर्ष 1971 मध्ये उभारण्यात आले आहे. या मंदिरात आदिवासींकडून वर्षांनूवर्षे पूजा केली जाते.
यंदा श्रावणाची सुरुवात तब्बल 71 वर्षांनी सोमवारपासून झाली असून शेवटही श्रावणी सोमवारने होणार आहे.