आज दुसरा श्रावणी सोमवार असून या दिवशी तिळाची शिवमूठ वाहिली जाणार आहे. याशिवाय भगवान शंकराची पूजा-प्रार्थना केली जाईल. या दिवसाचे महत्व सविस्तर जाणून घेऊया.

मुंबई : श्रावण महिना म्हणजे भक्ती, पूजन आणि महादेवांच्या कृपेचा काळ. देवशयनी एकादशीपासून भगवान विष्णू योगनिद्रेत जातात, त्यामुळे सृष्टीचा संपूर्ण कारभार भगवान शंकर सांभाळतात, असे मानले जाते. याच कारणामुळे श्रावण महिन्याचे आणि विशेषतः सोमवारी येणाऱ्या दिवसांचे फार मोठे महत्त्व आहे. श्रावणातील प्रत्येक सोमवार महादेवाची पूजा, जप, नामस्मरण आणि व्रतासाठी अत्यंत पवित्र मानला जातो. यंदा 4 ऑगस्ट 2025 रोजी दुसरा श्रावणी सोमवार आहे. या दिवशी भक्तांनी तीळाची शिवामूठ अर्पण करण्याची परंपरा पाळावी.

आजची पंचांग माहिती

  • आजची तारीख: 04 ऑगस्ट 2025 (सोमवार)
  • तिथी : श्रावण महिना
  • नक्षत्र : अनुराधा
  • सुर्योदय : सकाळी 06:13 वाजता
  • सूर्यास्त : सायंकाळी 07:10 वाजता
  • अमृतकाळ : दुपारी 14:19 ते 15:56
  • राहूकाळ : सकाळी 07:50 ते 09:27

या दिवशी अमृतकाळात पूजा-अर्चना, व्रत, मंत्रजप इत्यादी कार्य शुभ मानले जातात, तर राहूकाळ टाळणे हितावह ठरते.

तिथी म्हणजे काय?

हिंदू पंचांगानुसार, तिथी ही चंद्र आणि सूर्य यांच्या अंतरावर आधारित असते. चंद्ररेषा सूर्यरेषेपासून १२ अंशाने पुढे गेल्यानंतर तयार होणाऱ्या वेळेला तिथी म्हणतात. एका महिन्यात एकूण ३० तिथी असतात आणि त्या दोन भागांत विभागल्या जातात. शुक्ल पक्ष आणि कृष्ण पक्ष. शुक्ल पक्षाच्या शेवटी पौर्णिमा आणि कृष्ण पक्षाच्या शेवटी अमावस्या असते.

नक्षत्र म्हणजे काय?

नक्षत्र म्हणजे आकाशातील विशिष्ट ताऱ्यांचे समूह. यांची एकूण संख्या २७ असून या प्रत्येक नक्षत्रावर नऊ ग्रहांचे अधिपत्य असते. या नक्षत्रांची काही उदाहरणे अशी: अश्विनी, भरणी, कृतिका, रोहिणी, मृगशिरा, अर्द्रा, पुनर्वसू, पुष्य, आश्लेषा, मघा, पूर्वा-उत्तर फाल्गुनी, हस्त, चित्रा, स्वाती, **अनुराधा**, ज्येष्ठा, मूल, पूर्वाषाढा, उत्तराषाढा, श्रवण, धनिष्ठा, शतभिषा, पूर्वाभाद्रपदा, उत्तराभाद्रपदा आणि रेवती.

वार म्हणजे काय?

वार म्हणजे दिवस. आठवड्याचे सात दिवस म्हणजेच सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार आणि रविवार हे सात वार आहेत. प्रत्येक वाराला विशिष्ट ग्रहाशी संबंधित मानले जाते. उदा. सोमवार हा चंद्राशी, मंगळवार मंगळ ग्रहाशी आणि गुरुवार गुरू ग्रहाशी संबंधित मानला जातो.

योग म्हणजे काय?

‘योग’ म्हणजे सूर्य आणि चंद्र यांच्या विशेष अंतरावर आधारित विशिष्ट स्थिती. एकूण २७ योग असतात. उदाहरणार्थ – विषकुंभ, प्रीती, आयुष्मान, सौभाग्य, शोभन, अतिगंड, सुकर्मा, धृती, शूल, गंड, वृद्धी, ध्रुव, व्याघट, हर्षण, वज्र, सिद्धी, व्यातिपात, वरीयन, परिघ, शिव, सिद्ध, साध्य, शुभ, शुक्ल, ब्रह्मा, इंद्र आणि वैधृती. हे योग पंचांगानुसार दिवसाचे शुभ-अशुभ परिणाम ठरवतात.

करण म्हणजे काय?

तिथीचे अर्धे भाग करण म्हणून ओळखले जातात. प्रत्येक तिथीत दोन करण असतात – एक पूर्वार्धात आणि दुसरा उत्तरार्धात. करणांचे एकूण ११ प्रकार आहेत: बाव, बलव, कौलव, तैतिल, गर, वाणिज, विष्टी, शकुनी, चतुष्पाद, नाग आणि किस्तुघ्न. यामधील विष्टी करणाला भद्रा असेही म्हणतात. भद्राकाळात कोणतेही शुभकार्य करणे टाळावे, असा संकेत आहे.