- Home
- lifestyle
- Raksha Bandhan 2025 : रक्षाबंधननिमित्त पोस्टाची लाडक्या बहिणींसाठी विशेष भेट!, फक्त ₹12 मध्ये पाठवा तुमच्या भावाला राखी
Raksha Bandhan 2025 : रक्षाबंधननिमित्त पोस्टाची लाडक्या बहिणींसाठी विशेष भेट!, फक्त ₹12 मध्ये पाठवा तुमच्या भावाला राखी
Raksha Bandhan 2025 : रक्षाबंधनानिमित्त भारतीय डाक विभागाने फक्त ₹१२ मध्ये 'राखी स्पेशल एन्व्हलप'ची सुविधा उपलब्ध केली आहे. हा वॉटरप्रूफ लिफाफा राखी सुरक्षितपणे पोहोचवण्यासाठी खास डिझाइन केलेला असून, बहिणींना कमी खर्चात आणि वेळेत राखी पाठवता येईल.

मुंबई : राखीचा सण म्हणजे भाऊ–बहिणींच्या नात्यातील प्रेम, विश्वास आणि सुरक्षा याचं नितळ प्रतीक. यंदा 9 ऑगस्ट 2025 रोजी संपूर्ण देशभरात उत्साहात रक्षाबंधन साजरं होणार आहे. या दिवशी बहिण आपल्या भावाच्या हातावर प्रेमाची राखी बांधते आणि त्याच्या सुखी, निरोगी आयुष्यासाठी प्रार्थना करते.
पण अनेकदा भाऊ–बहिण वेगवेगळ्या शहरात, राज्यात किंवा देशात असल्यामुळे प्रत्यक्ष भेटता येणं शक्य होत नाही. अशा वेळी डिजिटल शुभेच्छा पाठवण्याची परंपरा रुजलेली असली, तरीही भारतीय डाक विभागाने यंदा खास अशी एक सुंदर संधी निर्माण केली आहे.
फक्त 12 रुपयांत ‘राखी स्पेशल एन्व्हलप’, भारतीय पोस्टची अभिनव संकल्पना!
भारतीय डाक विभागाने दरवर्षीप्रमाणे यंदाही एक खास ‘रक्षाबंधन स्पेशल लिफाफा’ बाजारात आणला आहे. फक्त ₹12 मध्ये उपलब्ध असलेला हा लिफाफा वॉटरप्रूफ आणि टिकाऊ साहित्याचा बनवलेला असून राखी सुरक्षितपणे पोहोचवण्यासाठी खास डिझाइन केला आहे.
या लिफाफ्याच्या खास वैशिष्ट्यांवर एक नजर
पाणी आणि हवामानाचा परिणाम न होणारा वॉटरप्रूफ डिझाइन
राखी, शुभेच्छा कार्ड किंवा लहान संदेश ठेण्याची सुरक्षित जागा
देशभरात कुठेही सहज पाठवता येण्याची सुविधा
सामान्य पोस्टपेक्षा राखीसाठी योग्य आकार व मजबुती
3-4 दिवसांत राखी पोहोचण्याची खात्री
या लिफाफ्याच्या माध्यमातून बहिणी आपली प्रेमाची राखी अत्यंत कमी खर्चात आणि सुरक्षित पद्धतीने पाठवू शकतात. विशेष म्हणजे, यासाठी वेगळं पार्सल करण्याची गरज नाही.
लवकर पाठवा राखी, वेळेवर पोहोचण्यासाठी!
पोस्ट विभागाने नागरिकांना आवाहन केलं आहे की, रक्षाबंधनाच्या गडबडीत उशीर होऊ नये म्हणून लवकरात लवकर राखी पाठवा, जेणेकरून ती सणाच्या दिवशी वेळेवर भावाच्या हातात पोहोचू शकेल. सध्या श्रावण महिना सुरू असल्यामुळे डाक कार्यालयांमध्ये गर्दी वाढत आहे, त्यामुळे शक्यतो लवकर राखी पाठवणं फायदेशीर ठरेल.
नात्याला स्पर्श देणारा सण, राखीला पोस्टाचं साथ!
रक्षाबंधन हे नात्याचं सजीव रूप आहे, आणि भारतीय डाक विभागाने त्याला एका खास स्पर्शात गुंडाळलं आहे. डिजिटल युगातसुद्धा प्रत्यक्ष राखी पाठवून नात्याचा जिवंतपणा जपता येतो, आणि हे शक्य होतं अवघ्या ₹12 मध्ये!

