MalayalamNewsableKannadaKannadaPrabhaTeluguTamilBanglaHindiMarathiMyNation
Add Preferred SourceGoogle-icon
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • लेटेस्ट न्यूज
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • वेब स्टोरीज
  • यूटिलिटी न्यूज
  • मुंबई
  • भारत
  • महाराष्ट्र
  • स्पोर्ट्स
  • गुन्ह्याच्या बातम्या
  • विश्व
  • गेम्स
  • Home
  • lifestyle
  • Science Of Dreams : झोपेत आपल्याला स्वप्न का पडतात? मेंदूच्या या करामतींमागचं विज्ञान जाणून घ्या

Science Of Dreams : झोपेत आपल्याला स्वप्न का पडतात? मेंदूच्या या करामतींमागचं विज्ञान जाणून घ्या

आपण गाढ झोपेत असताना आपला मेंदू नेमकं काय करत असतो? आपल्याला स्वप्न का पडतात? यामागे दडलेली वैज्ञानिक कारणं आणि मेंदूच्या काही थक्क करणाऱ्या गोष्टी…

3 Min read
Author : Karishma R
Published : Oct 02 2026, 02:05 PM IST
Share this Photo Gallery
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Whatsapp
  • GNFollow Us
15
स्वप्न पडण्यामागची महत्त्वाची कारणं
Image Credit : pinterest

स्वप्न पडण्यामागची महत्त्वाची कारणं

आपण रात्री गाढ झोपेत असताना अचानक काही विचित्र स्वप्न पडतात. कधीकधी थोड्या वेळापूर्वी घडलेल्या घटना, तर कधी लहानपणी भेटलेली माणसं स्वप्नात दिसतात. काही वेळा आपण हवेत उडत असल्यासारखे भन्नाट सीन्सही दिसतात. पण तुम्हाला माहितीये का? आपण झोपतो तेव्हा आपला मेंदू पूर्णपणे बंद होत नाही. तो बॅकग्राउंडला खूप मोठं काम करत असतो, असं न्यूरोसायंटिस्ट सांगतात.

स्वप्न म्हणजे फक्त काल्पनिक कथा नसतात. आपल्या मेंदूतल्या आठवणी साठवणं, भावनांवर नियंत्रण ठेवणं आणि माइंड क्लीन करण्यासाठी मेंदू ही एक प्रकारची प्रोसेस करत असतो, हे संशोधनातून सिद्ध झालंय. शास्त्रज्ञांनी स्वप्न पडण्यामागची महत्त्वाची कारणं वैज्ञानिकदृष्ट्या स्पष्ट केली आहेत.

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred
25
व्हर्च्युअल रिॲलिटी माइंड गेम'
Image Credit : Chatgpt

व्हर्च्युअल रिॲलिटी माइंड गेम'

आपण सकाळपासून रात्रीपर्यंत अनेक गोष्टी पाहतो आणि अनुभवतो. आपला मेंदू या सगळ्या गोष्टी एका डिजिटल फाईल मॅनेजरसारख्या सेव्ह करतो. दिवसभरात गोळा केलेल्या माहितीतून नको असलेल्या गोष्टी मेंदू डिलीट करतो आणि महत्त्वाच्या आठवणी लाँग टर्म मेमरीमध्ये पाठवतो. याच प्रक्रियेत जुन्या आणि नव्या आठवणी स्वप्नांचं रूप घेतात.

भीती, दुःख किंवा आनंद यांसारख्या तीव्र भावनांना मेंदू रिसेट करतो. तणाव वाढवणाऱ्या 'नॉरएपिनेफ्रिन'सारख्या हार्मोन्सची पातळी कमी करून मानसिक जखमा भरून काढायला स्वप्न मदत करतात. भविष्यातल्या संकटांचा सामना करण्यासाठी मेंदू स्वप्नांच्या रूपात एक 'व्हर्च्युअल रिॲलिटी माइंड गेम' तयार करतो. झोपेत लॉजिकल विचार करणारा मेंदूचा भाग विश्रांती घेतो, त्यामुळे अनेक शास्त्रज्ञ आणि कलाकारांना स्वप्नातच नवीन आयडिया सुचल्या आहेत.

Related Articles

Related image1
Lemon For Drishti : दृष्ट काढण्यासाठी लिंबू-मिरचीच का वापरतात? जाणून घ्या रंजक कारण
35
स्वप्न माणसांपुरतंच मर्यादित नाही
Image Credit : Asianet News

स्वप्न माणसांपुरतंच मर्यादित नाही

आपण झोपतो तेव्हा झोपेचे वेगवेगळे टप्पे असतात. यातला सर्वात महत्त्वाचा टप्पा म्हणजे REM (Rapid Eye Movement) स्लीप. या वेळेत आपल्या डोळ्यांच्या बाहुल्या वेगाने फिरत असतात. मेंदूतले व्हिज्युअल आणि इमोशनल भाग खूप ॲक्टिव्ह असतात.

याच REM स्लीपमध्ये आपल्याला अगदी स्पष्ट आणि एखाद्या कथेसारखी स्वप्न पडतात. या टप्प्यात मेंदू कितीही ॲक्टिव्ह असला, तरी आपलं शरीर मात्र पूर्णपणे विश्रांती घेत असतं. स्वप्न पडणं हे फक्त माणसांपुरतंच मर्यादित नाही. कुत्रे आणि लहान मुलंही REM स्लीपमध्ये स्वप्न पाहतात, असं संशोधनातून समोर आलंय.

45
एका रात्रीत सरासरी ४ ते ६ स्वप्न पडतात
Image Credit : Getty

एका रात्रीत सरासरी ४ ते ६ स्वप्न पडतात

विज्ञानाने स्वप्नांबद्दल काही आश्चर्यकारक गोष्टी सांगितल्या आहेत. स्वप्न पाहताना आपण खरोखरच हात-पाय हलवू नयेत, म्हणून मेंदू पाठीच्या कण्याला केमिकल सिग्नल्स पाठवून स्नायूंना तात्पुरतं लॉक करतो. प्रत्येक व्यक्तीला एका रात्रीत सरासरी ४ ते ६ स्वप्न पडतात, पण उठल्यावर आपण ९५ टक्के भाग विसरतो.

स्वप्नातला प्रत्येक चेहरा आपण वास्तवात पाहिलेला असतो, मेंदू नवीन चेहरे बनवत नाही. एखादं स्वप्न तासनतास चालल्यासारखं वाटलं, तरी ते फक्त ५ ते २० मिनिटांचंच असतं. जन्मापासून अंध असलेल्यांना स्वप्नात दृश्य दिसत नाहीत, पण त्यांना स्पर्श, आवाज आणि वासाची तीव्र स्वप्न पडतात.

55
सायंटिफिक मॅजिक
Image Credit : Gemini AI

सायंटिफिक मॅजिक

स्वप्न आपल्याला भविष्य सांगतात किंवा येणाऱ्या संकटांची पूर्वकल्पना देतात, असा अनेकांचा समज असतो. पण याला कोणताही वैज्ञानिक आधार नाही. स्वप्न हे फक्त आपल्या मेंदूतले विचार, ताणतणाव, अपुरी झोप, खाण्याच्या सवयी आणि रोजच्या अनुभवांचं प्रतिबिंब असतं.

काही वेळा आपण स्वप्न पाहत आहोत, हे आपल्याला झोपेतच समजतं. याला 'ल्युसिड ड्रीमिंग' (Lucid Dreaming) म्हणतात. अशा वेळी आपण स्वप्नाचा वेग किंवा त्यातली कथा कंट्रोल करू शकतो. थोडक्यात सांगायचं तर, स्वप्न म्हणजे आपल्या मेंदूने केलेली एक अद्भुत सायंटिफिक मॅजिक आहे, असं तज्ज्ञ सांगतात.

Lifestyle News in Marathi (जीवनशैली बातम्या): Get the latest lifestyle news updates, fashion trends, and beauty tips in Marathi. Read रिलेशनशिप टिप्स, हेल्थ टिप्स, Travel News & Watch Marathi Lifestyle Video at Asianet Marathi News.

About the Author

KR
Karishma R
करिश्मा भुर्के, एशियानेट या वेबसाइटसाठी कंटेंट रायटर म्हणून कार्यरत. सामना, झी २४ तास, न्यूज १८ लोकमत, महाराष्ट्र टाइम्ससह ७ वर्ष पत्रकारिता क्षेत्रातील अनुभव. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयसह, इन्फ्रास्ट्रक्चर, नागरी विकास, सामाजिक, गाव-खेड्यातील विविध विषयांवर लेखनाची आवड. जोशी-बेडेकर कॉलेजमधून बॅचलर ऑफ मास मीडियाची पदवी, तर साठे महाविद्यालयातून मास्टर्स इन जर्नालिजमचं शिक्षण पूर्ण केलं आहे.
जीवनशैली बातम्या

Recommended Stories
Recommended image1
Egg vs Chicken vs Mutton : अंडी, चिकन की मटण... सर्वात जास्त प्रोटीन कशात असतं?
Recommended image2
Money Psychology : पैसा माणसाचा विचार कसा बदलतो? सायकॉलॉजी काय सांगते ते पाहा
Recommended image3
Guru Ketu Conjunction 2026 : अनेक वर्षांनंतर गुरु-केतूची युती, या 4 राशींना लागणार जॅकपॉट
Recommended image4
Navratri 2026 Fasting Snacks : नवरात्रीत उपवासाचे तेच तेच पदार्थ खाऊन कंटाळलात? घरीच बनवा हे ७ झटपट स्नॅक्स
Recommended image5
Jowar Roti : ज्वारीची भाकरी खाल्ल्याने खरंच वजन कमी होतं का? कोणी खाऊ नये?
Related Stories
Recommended image1
Lemon For Drishti : दृष्ट काढण्यासाठी लिंबू-मिरचीच का वापरतात? जाणून घ्या रंजक कारण
Asianet
Follow us on
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • About Website
  • Terms of Use
  • Privacy Policy
  • CSAM Policy
  • Complaint Redressal - Website
  • Compliance Report Digital
  • Investors
© Copyright 2026 Asianxt Digital Technologies Private Limited (Formerly known as Asianet News Media & Entertainment Private Limited) | All Rights Reserved