सार

Orange Tea Recipe : बऱ्याच रील्समध्ये, व्हिडीओमध्ये दिसणारा ‘ऑरेंज टी’ सध्या सोशल मीडियावर ट्रेंडिंग झाला आहे. या ऑरेंज टी ची खासियत अशी आहे की हा चहा चवीला तर रिफ्रेशिंग आहेच पण आरोग्यासाठी देखील फायदेशीर आहे.

Orange Tea Recipe : चहाला वेळ नसते पण वेळेला चहा लागतो. भारतीयांचं चहा प्रेम तर जगभरात प्रसिद्ध आहे. आसेतुहिमाचल प्रत्येक ठिकाणच्या चहाची चव वेगळी असते. धो धो पाऊस कोसळत असताना आसामच्या चहाने रंगत येते तर गुलाबी थंडीत काश्मीरचा कहावाने उबदार वाटते. 

कट्टर चहाप्रेमींना तर मे महिन्याच्या भर उन्हाळ्यात सुद्धा गरमागरम मसाला चहा घेतल्याशिवाय कामं सुचत नाहीत. अर्थात काही हेल्थ कॉन्शस चहाप्रेमी दुधाची तहान ताकावर भागवावी तशी चहाची तल्लफ शुगरफ्री ब्लॅक टी -ग्रीन टी (Green Tea) वर भागवतात. पण शेवटी स्पेशल दुधाच्या चहाची सर दुसऱ्या कोणत्याही चहाला येत नाही असेच बहुतांश चहाप्रेमींचे मत असते.

चवीला रुचकर व आरोग्यास फायदेशीर 

हल्ली बाजारात वेगवेगळ्या प्रकारचे चहा मिळतात आणि सोशल मीडियावर सुद्धा लोक चहाच्या वेगवेगळ्या रेसिपी ट्राय करत असतात. अशीच सध्या चहाची एक आगळीवेगळी रेसिपी व्हायरल झाली आहे. बऱ्याच रील्समध्ये, व्हिडीओमध्ये दिसणारा ‘ऑरेंज टी’ (Viral Orange Tea) सध्या सोशल मीडियावर ट्रेंडिंग (Social Media Trending) झाला आहे. या ऑरेंज टी (Orange Tea Recipe) ची खासियत अशी आहे की हा चहा चवीला तर रिफ्रेशिंग आहेच पण आरोग्यासाठी देखील फायदेशीर आहे. हा चहा खास करून हिवाळ्यात प्यायला जातो.

हिवाळ्यात सर्दी- खोकल्याच्या साथी कायम पसरलेल्या असतात. या इन्फेक्शनशी लढण्यासाठी तसेच रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी व्हिटॅमिन सी आपल्या शरीरासाठी अतिशय आवश्यक आहे. सध्या हिवाळ्यात संत्री मुबलक प्रमाणात उपलब्ध आहेत आणि संत्री हा व्हिटॅमिन सी (Vitamin C) चा एक उत्तम स्रोत आहे. संत्र्याची बर्फी तर आपण नेहेमीच खातो. आज ऑरेंज टी ट्राय करून बघूया. चला तर फूड ब्लॉगर मेघना कडू यांचा इंस्टाग्रामवर व्हायरल झालेला ऑरेंज टी (Orange Tea Recipe) कसा बनवायचा हे जाणून घेऊया.

ऑरेंज टी रेसिपी 

साहित्य -

- एक संत्रे

- एक कप पाणी

- एक टीस्पून चहा पूड

- दोन चमचे साखर

सर्वप्रथम संत्रे मधोमध कापून घ्या व त्याचे वाटीसारखे दोन भाग करून घ्या. संत्र्याचे साल वाटीसारखे दिसेल याप्रकारे त्यातून संत्र्याच्या फोडी अलगद काढून घ्या. एका भांड्यात कपभर पाणी घ्या व त्यात सोललेली संत्री आणि साखर घालून उकळून घ्या. यानंतर संत्र्याचे साल घ्या व त्याला सुईच्या साहाय्याने छोटी छोटी छिद्रे करून घ्या जेणेकरून त्यातून चहा गाळला जाऊ शकेल. त्यानंतर एका कपावर ही छिद्रे केलेली संत्र्याची साल ठेवा व त्या सालीमध्ये २ चमचे चहाची पूड घाला. संत्र्याच्या फोडी व साखर घातलेले पाणी उकळले की ते सालीत ओतून घ्या.

असे केल्यावर त्या सालीतून थेंब थेंब चहाचा अर्क कपात उतरेल. अशा प्रकारे तुमचा ऑरेंज टी तयार आहे. तुम्हाला जर यात साखर नको असेल तर तुम्ही थोडा मध देखील घालू शकता. तसेच तुमच्या आवडीनुसार चहापूड कमी-जास्त घालू शकता. फक्त तुम्ही वापरताय ते संत्र जास्त आंबट नसेल याची काळजी घ्या नाहीतर तुमचा चहा ऍसिडिक होऊ शकेल.

ऑरेंज टीचे फायदे

या चहामध्ये व्हिटॅमिन सी, अँटिऑक्सिडंट्स आणि इतर पोषक घटक भरपूर प्रमाणात असतात.त्यामुळे हा चहा ताप, सर्दी, खोकला या आजारांशी लढण्यास मदत करतो. या चहाने रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास देखील मदत होते व हा चहा वजन कमी करण्यात देखील फायदेशीर आहे.

View post on Instagram
 

 

Content / Video Credit Instagram @chef_modeon

आणखी वाचा -

Achari Chicken Tikka : वीकेंड पार्टीवेळी नॉन-व्हेजमध्ये अचारी चिकन टिक्का आहे बेस्ट पर्याय, जाणून घ्या रेसिपी

नाश्तामध्ये खा हे 7 प्रकारचे हेल्दी चीला