MalayalamNewsableKannadaKannadaPrabhaTeluguTamilBanglaHindiMarathiMyNation
Add Preferred SourceGoogle-icon
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • लेटेस्ट न्यूज
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • वेब स्टोरीज
  • यूटिलिटी न्यूज
  • मुंबई
  • भारत
  • महाराष्ट्र
  • स्पोर्ट्स
  • गुन्ह्याच्या बातम्या
  • विश्व
  • गेम्स
  • Home
  • lifestyle
  • Chicken Pickle Recipe : आंध्र स्टाईल चिकन लोणचं, महिनाभर टिकेल

Chicken Pickle Recipe : आंध्र स्टाईल चिकन लोणचं, महिनाभर टिकेल

Chicken Pickle: चिकनचं लोणचं खूप चविष्ट लागतं. आंध्र स्टाईलचे मसाले आणि तिळाच्या तेलात झणझणीत चिकन लोणचं कसं बनवायचं ते इथं जाणून घ्या. हे लोणचं तीन महिने ताजं राहतं.

2 Min read
Author : Chanda Mandavkar
Published : Nov 09 2026, 05:10 PM IST
Share this Photo Gallery
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Whatsapp
  • GNFollow Us
13
चिकन लोणचं रेसिपी
Image Credit : Gemini Ai

चिकन लोणचं रेसिपी

तुम्ही चिकनपासूनही उत्तम लोणचं बनवू शकता. आंध्र स्टाईलचे तिखट मसाले, सुवासिक तिळाचं तेल आणि भाजलेल्या मसाल्यांची पावडर घालून बनवलेलं हे चिकन लोणचं चवीला भारी लागतं. भात, दही-भात, चपाती, डोसा कशासोबतही खा, चव भन्नाट लागेल. चिकनचा रस्सा किंवा फ्राय खाऊन कंटाळा आलाय? मग एकदा हे आंध्र स्पेशल चिकन लोणचं घरी नक्की ट्राय करा. ज्यांना तिखट आवडतं त्यांना हे नक्कीच आवडेल.

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred
23
आंध्र स्पेशल चिकन लोणचं साहित्य
Image Credit : Gemini Ai

आंध्र स्पेशल चिकन लोणचं साहित्य

चिकन मॅरिनेशनसाठी:

चिकन- ५०० ग्रॅम

हळद - १/२ टीस्पून

लाल तिखट - २ टीस्पून

आलं-लसूण पेस्ट - १ टेबलस्पून

मीठ - चवीनुसार

मसाला पावडरसाठी:

धणे - १ टेबलस्पून

मेथी दाणे - १/२ टीस्पून

मोहरी - १/२ टीस्पून

जिरं - १ टीस्पून

दालचिनी - ३ छोटे तुकडे

लवंग - ४

वेलची - २

हरभरा डाळ - १ टेबलस्पून

फोडणीसाठी:

तिळाचं तेल - गरजेनुसार

Related Articles

Related image1
Pickle Storage Tips : लोणचं वर्षभर टिकवायचंय? बरणीत ठेवताना ही एक चूक अजिबात करू नका!
Related image2
Mango Pickle Recipes : कैरीपासून तयार करा या 5 प्रकारची लोणची, वाचा रेसिपी
33
चिकन लोणचं बनवण्याची पद्धत
Image Credit : Gemini Ai

चिकन लोणचं बनवण्याची पद्धत

  1. सगळ्यात आधी बोनलेस चिकन स्वच्छ धुऊन त्याचे छोटे तुकडे करून घ्या. त्यात हळद, लाल तिखट, आलं-लसूण पेस्ट आणि चवीनुसार मीठ घालून चांगलं मिक्स करा. हे सुमारे ३० मिनिटं बाजूला ठेवा.

२. गॅसवर एक पॅन ठेवा. त्यात धणे, मेथी, मोहरी, जिरं, दालचिनी, लवंग, वेलची आणि हरभरा डाळ घालून चांगला सुगंध येईपर्यंत भाजा. नंतर हे मसाले थंड होऊ द्या आणि मिक्सरमध्ये जाडसर वाटून घ्या.

३. आता एका कढईत थोडं जास्त तिळाचं तेल टाकून गरम करा. त्यात आधीच मॅरिनेट केलेले चिकनचे तुकडे टाकून चांगले परतून घ्या. चिकनचे तुकडे छान शिजून गोल्डन ब्राऊन होईपर्यंत मध्यम आचेवर परता.

४. चिकन चांगलं शिजल्यावर त्यात तयार केलेला मसाला पावडर घालून मिक्स करा. मसाला चिकनच्या सगळ्या तुकड्यांना लागेल असा व्यवस्थित ढवळून घ्या.

५. मसाला चिकनमध्ये चांगला मिसळेपर्यंत आणि तेल सुटेपर्यंत मध्यम आचेवर शिजू द्या. चिकन पूर्ण शिजून लोणच्यासारखं दिसू लागल्यावर गॅस बंद करा. झालं, तुमचं मस्त झणझणीत आंध्र स्पेशल चिकन लोणचं तयार आहे.

Lifestyle News in Marathi (जीवनशैली बातम्या): Get the latest lifestyle news updates, fashion trends, and beauty tips in Marathi. Read रिलेशनशिप टिप्स, हेल्थ टिप्स, Travel News & Watch Marathi Lifestyle Video at Asianet Marathi News.

About the Author

CM
Chanda Mandavkar
चंदा सुरेश मांडवकर एक अनुभवी प्रकार असून त्यांना मीडिया क्षेत्राचा 8 वर्षांचा अनुभव आहे. एका वृत्तवाहिनीमधून पत्रकाराच्या रुपात काम करण्यास सुरुवात केली. चंदा यांना लाइफस्टाइल, राजकीय आणि जनरल नॉलेज या विषयांमध्ये रस असून गेल्या 1 वर्षांहून अधिक काळ एशियानेट न्यूजमध्ये या विभागांसाठी काम करत आहेत. आपल्या वाचकांना सोप्या आणि सहज समजेल अशा भाषेत लिहण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न असतो.
जीवनशैली बातम्या

Gold & Metal Rates

Loading rates…

All cities ›
Recommended Stories
Recommended image1
Curse Village : सणाचा शाप... दिवाळीत अंधारात राहणारे देशातील एकमेव गाव!
Recommended image2
Air Pollution : दिवाळीनंतर प्रदूषित हवेमुळे मायग्रेनचा त्रास होतो का? अशी घ्या आरोग्याची काळजी
Recommended image3
Why Eyes Close While Sneezing : शिंकताना डोळे आपोआप का मिटतात? यामागील आश्चर्यकारक रहस्य जाणून घ्या!
Recommended image4
Rahu Ketu Transit : 18 महिन्यांनंतर राहु-केतुचे गोचर; 12 राशींवर काय होणार परिणाम?
Recommended image5
Jhumka with Chain : साडीवर रॉयल लूक देणारे झुमका आणि चेन डिझाईन्स
Related Stories
Recommended image1
Pickle Storage Tips : लोणचं वर्षभर टिकवायचंय? बरणीत ठेवताना ही एक चूक अजिबात करू नका!
Recommended image2
Mango Pickle Recipes : कैरीपासून तयार करा या 5 प्रकारची लोणची, वाचा रेसिपी
Asianet
Follow us on
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • About Website
  • Terms of Use
  • Privacy Policy
  • CSAM Policy
  • Complaint Redressal - Website
  • Compliance Report Digital
  • Investors
© Copyright 2026 Asianxt Digital Technologies Private Limited (Formerly known as Asianet News Media & Entertainment Private Limited) | All Rights Reserved