सार
बहुतांशजणांचे वजन कमी केल्यानंतर पुन्हा वाढण्याची समस्या उद्भवली जाते. खरंतर, वजन कमी करुनही का वाढलेय यामागील कारण काहींना माहिती नसते. याबद्दलच सविस्तर जाणून घेऊया...
Health Tips : वजन कमी करणे सध्याच्या घडीला सर्वसामान्य बाब आहे. व्यायाम आणि डाएटकडे लक्ष देऊन सहज वजन कमी करता येते. पण काहीजणांमध्ये कमी झालेले वजन पुन्हा वाढण्यास सुरुवात होते. खरंतर, व्यक्तीचे वजन एक ते दीड वर्षांमध्ये पुन्हा वाढले जाते असे म्हटले जाते. जाणून घेऊया कमी झालेले वजन पुन्हा वाढण्यामागे काय कारणे असू शकतात याबद्दल सविस्तर...
का वाढले जाते वजन?
वजन कमी झाल्यानंतर पुन्हा वाढण्यामागे मोठे कारण म्हणजे तुमच्या सवयी आहेत. वजन कमी करण्यासाठी काही सवयींमध्ये बदल केला जातो. पण वजन कमी झाल्यानंतर पुन्हा जुन्या सवयी काहीजण फॉलो करू लागतात. वजन कमी करण्यासाठी काहीजण एक आठवडा किंवा महिनाभर साखर आणि जंक फूड्चे सेवन करणे टाळतात.
वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी काय करावे?
- वजन कमी झाल्यानंतर पुन्हा वाढू लागल्यास हेल्दी सवयी फॉलो करण्यास सुरुवात करा.
- दररोज सहा ते आठ तासांची पुरेशी झोप घ्या.
- जंक फूड्स किंवा अत्याधिक तेलकट पदार्थांपासून दूर रहा.
- घरच्याघरी तयार करण्यात आलेल्या पदार्थांचे सेवन करा. याशिवाय ओव्हरइंटिंगच्या समस्येपासून दूर राहण्यासाठी हेल्दी डाएट फॉलो करा.
(Disclaimer : सदर लेख केवळ सामान्य माहिती देण्याकरिता आहे. Asianet News या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी आपण तज्ज्ञ किंवा आपल्या ओळखीच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)
आणखी वाचा :
चेहऱ्यावर इन्स्टंट ग्लो हवाय? कच्च्या दूधात मिक्स करा या 5 वस्तू