सार

सध्या लग्नसोहळ्याचे दिवस सुरू झाले आहेत. अशातच चमकदार त्वचेसाठी पार्लरमध्ये जाऊन पैसे खर्च करण्याएवजी घरच्याघरी काही सोपे उपाय करू शकता. खासकरुन कच्च्या दूधाचा वापर करुन चेहऱ्यावर इन्स्टंट ग्लो मिळवू शकता.

Tips for instant glow on face : लग्नसोहळ्याचे दिवस सुरू झाल्यानंतर बहुतांशजण पार्लरमध्ये जाऊन वेगवेगळ्या ब्युटी ट्रिटमेंट करतात. पण पैसे न खर्च करता घरच्याघरी चमकदार त्वचेसाठी कच्च्या दूधाचा वापर करू शकता. यामुळे पिंपल्सची समस्याही कमी होईल.

कच्चे दूध आणि बेसन

बेसनाच्या पीठामध्ये अँटी-एंफ्लेमेंटरी आणि अँटी-ऑक्सिडेंट्स गुणधर्म असतात. यामुळे त्वचा स्वच्छ आणि चमकदार होण्यास मदत होते. यासाठी दोन चमचे कच्च्या दूधामध्ये बेसन मिक्स करुन घट्ट पेस्ट तयार करा. यामध्य गुलाब पाणीही मिक्स करा. तयार केलेली पेस्ट चेहऱ्यावर 10 मिनिटे लावून स्वच्छ पाण्याने धुवा.

हळद आणि कच्चे दूध

हळदीमध्ये करक्यूमिन गुणधर्म असल्याने त्वचा स्वच्छ आणि चमकदार होण्यास मदत होते. यासाठी एक चमचा कच्च्या दूधात हळद मिक्स करुन पेस्ट तयार करा. पेस्ट चेहऱ्यावर 10 मिनिटे लावून ठेवल्यानंतर धुवा. यामुळे त्वचा नैसर्गिक रुपात चमकदार होण्यास मदत होईल.

बदामाचे तेल आणि कच्चे दूध

बदामाचे तेल त्वचेला खोलवर मॉइश्चराइज करण्यासह चमक वाढवते. अशातच चेहऱ्याच्या इन्स्टंट ग्लो साठी बदामाच्या तेलात कच्चे दूध मिक्स करा.

कच्चे दूध आणि चंदन

चंदनाचा वापर त्वचेची चमक वाढवण्यासाठी काही वर्षांपासून केला जातो. ऑर्गेनिक चंदन पावडरमध्ये कच्चे दूध मिक्स करुन पेस्ट तयार करा. तयार केलेली पेस्ट चेहऱ्यावर 10 मिनिटे ठेवल्यानंतर स्वच्छ धुवा.

मध आणि कच्चे दूध

मध त्वचेला मॉइश्चराइज करण्यासह चमक आणण्याचे काम करते. एक चमचा कच्च्या दूधामध्ये मध मिक्स करुन पेस्ट तयार करुन 10 मिनिटे चेहऱ्याला लावून ठेवा.

(Disclaimer : सदर लेख केवळ सामान्य माहिती देण्याकरिता आहे. Asianet News या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी आपण तज्ज्ञ किंवा आपल्या ओळखीच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)

आणखी वाचा : 

थंडीत शरीर आतमधून उष्ण राहण्यासाठी खा हे 6 फूड्स

शिळ्या भातापासून तयार करा हे 2 चमचमीत पदार्थ, तोंडाला सुटेल पाणी