सार
थंडीचे दिवस सुरू झाले असून अशातच आरोग्याची काळजी घेणे फार महत्वाचे आहे. अशातच थंडीच्या दिवसात शरीर आतमधून उष्ण राहण्यासाठी कोणत्या फूड्सचे सेवन करावे याबद्दल जाणून घेऊया…
Winter health care : थंडीचे दिवस सुरू झाले असून आरोग्याची काळजी घेण्याचा सल्ला दिला जातो. या ऋतूमध्ये रोगप्रतिकारक शक्ती कमी असणाऱ्या व्यक्ती लवकर आजारांना बळी पडतात. थंडीच्या दिवसात सर्दी-खोकला अशा आरोग्यासंबंधित समस्या उद्भवल्या जातात. यामुळे डाएटमध्ये शरिराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासह शरिराला आतमधून उष्णता मिळण्यासाठी कोणत्या फूड्सचे सेवन करावे याबद्दल जाणून घेऊया सविस्तर...
थंडीत खा हे हेल्दी फूड्स
सुका मेवा
थंडीच्या दिवसात बदाम, अक्रोड, काजू अशा सुका मेव्याचे सेवन करावे. यामुळे शरीर थंडीच्या दिवसात आतमधून उष्ण राहण्यास मदत होते.
तीळ आणि गूळ
तीळ आणि गुळाचे सेवन थंडीच्या दिवसात खासकरुन केले जाते. यामुळे शरिराला आतमधून उष्णता मिळते. यासोबत हाडांना बळकटी मिळण्यासही मदत होते.
लसूण आणि आलं
लसूण आणि आल्याचे थंडीत सेवन करणे आरोग्यासाठी फायदेशीर ठरू शकते. आल्याच्या सेवनाने शरीर आतमधून गरम राहण्यास मदत होते. याशिवाय लसणामुळे शरिराची रोगप्रतिकारक शक्ती वाढली जाते.
हळदीचे दूध
सूप, खिचडी किंवा हळदीचे दूध प्यायल्याने थंडीत शरीर आतमधून उष्ण राहते. हळदीच्या दूधामध्ये नैसर्गिक रुपात अँटीबायोटिक असल्याने सर्दी-खोकल्यापासून तुम्ही दूर राहता.
तूप
थंडीत तूपाचे सेवन केल्याने शरिराला उर्जा मिळते. याशिवाय शरीर आतमधून उष्ण राहते.
हिरव्या पालेभाज्या
थंडीच्या दिवसात हिरव्या पालेभाज्या जसे की, पालक, मेथी याचे सेवन करावे. यामध्ये भरपूर प्रमाणात लोह आणि व्हिटॅमिन्स असल्याने शरीर आतमधून उष्ण राहण्यास मदत होते.
(Disclaimer : सदर लेख केवळ सामान्य माहिती देण्याकरिता आहे. Asianet News या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी आपण तज्ज्ञ किंवा आपल्या ओळखीच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)
आणखी वाचा :
विमानतळावर कधीच खाऊ नका हे पदार्थ, पडाल आजारी
थंडीच्या दिवसात चेहऱ्यावर येईल ग्लो, नारळाच्या तेलात मिक्स करा या 3 वस्तू