मुलांना स्नॅक्ससाठी आलू चाट तयार करून देऊ शकता. यामध्ये काही भाज्या, दही आणि आंबट-तिखट चटणी मिक्स करुन अगदी झटपट चाट तयार करू शकता.
सकाळच्या नाश्ता किंवा रात्रीच्या वेळेस मुलांना चमचमीत काहीतरी खायचे असल्यास आलू पराठा तयार करून देऊ शकता.
अगदी झटपट आणि कमी वेळात होणारा पदार्थ म्हणजे आलू व्हेजिटेबल सँडविच. अशा सँडविचमध्ये मुलांना भाज्या आणि पनीरही मिक्स करून देऊ शकता.
सध्या डोसाचे वेगवेगळे प्रकार मिळतात. पण बटाट्याची भाजी असेलला डोसा प्रत्येकालाच आवडतो. यामुळे मुलांनाही घरच्याघरी आलू डोसा तयार करून देऊ शकता.
समोसामध्ये बटाट्याची भाजी भरून मुलांना स्नॅक्स म्हणून खाण्यास देऊ शकता. आंबट-तिखट चटणीसोबत गरमागरम समोसा मुलांना खायला फार आवडतो.
स्मॅश केलेल्या बटाट्यामध्ये मसाले, भाज्या आणि चीज मिक्स करुन त्याचे गोलाकार बॉल्स तयार करून घ्या. अशाप्रकारचे कुरकुरीत आणि टेस्टी चीज पोटॅटो बॉल्स मुलांना नक्कीच आवडतील.