वेगाने वजन कमी करण्याचा विचार करताय? वाचा काय म्हणतात आरोग्य तज्ज्ञ
Rapid Weight Loss : पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये विनेश फोगाटला कुस्तीच्या अंतिम सामन्यासाठी अपात्र ठरवण्यात आले. खरंतर, विनेशच्या वाढलेल्या वजनामुळे हा निर्णय घेण्यात आला. पण वेगाने वजन कमी करण्यासंदर्भात एक्सपर्ट्स काय म्हणतात हे जाणून घेऊया.
| Published : Aug 08 2024, 09:14 AM IST
- FB
- TW
- Linkdin
विनेश फोगाट अंतिम सामन्यातून बाहेर
पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये भारतीय पैलवान विनेश फोगाटचे सुवर्ण पदकाचे स्वप्न अपूर्ण राहिले. विनेशचे वाढलेले वजन पाहता तिला कुस्तीच्या अंतिम सामन्यातून बाद करण्यात आले. ऑलिम्पिक कुस्तीच्या नियमांनुसार विनेशचे वजन 50 किलोग्रॅम असावे. पण वजन 100 ग्रॅम अधिक असले तरीही चालते. मात्र विनेशचे सामन्याआधी वजन 50 किलो 150 ग्रॅम असल्याचे आढळल्याने तिल अंतिम सामन्यातून बाहेर करण्यात आले. खरंतर, कुस्तीची स्पर्धा सुरु होण्याआधी प्रत्येक खेळाडूचे वजन तपासून पाहिले जाते. रिपोर्ट्सनुसार, विनेशने आपले वाढलेले वजन कमी करण्यासाठी एक दिवस आधी खूप मेहनतही केली होती. अशातच वेगाने वजन कमी करणे किती योग्य आहे आणि याबद्दल हेल्थ एक्सपर्ट्स काय म्हणतात हे जाणून घेऊया.
विनेश फोगाटने केले वजन कमी
रिपोर्ट्सनुसार, विनेश फोगाटने एका रात्रीत 1 ते 1.5 किलोग्रॅम वजन कमी केले. विनेशची प्रकृती हिडाइड्रेशनच्या कारणास्तव बिघडली गेल्याने उपचार करण्यात आले. असे बोलले जात आहे की, वेगाने वजन कमी केल्याने विनेशची प्रकृती बिघडली असावी. हेल्थ एक्सपर्ट्सच्या मते, शरिरावर अत्याधिक भार पडल्यास आरोग्य बिघडले जाऊ शकते.
काय म्हणतायत हेल्थ एक्सपर्ट्स?
हेल्थ एक्सपर्ट्स वेगाने वजन कमी करण्यासंदर्भात म्हणतात की, यामुळे काही नुकसान होऊ शकते. काहीजण वेगाने वजन कमी करण्याचा जोरदार प्रयत्न करतात. त्यांना असे वाटते की, एका रात्रीत वजन काही किलोग्रॅम कमी होईल. अशातच अत्याधिक व्यायाम केला जातो. याशिवाय अधिक कठोर डाएट प्लॅन फॉलो केला जातो. अशा सर्व गोष्टींमुळे लगेच वजन कमी होत नाही. यामुळे शरिराला नुकसानच पोहोचले जाते.
सर्वसामान्य व्यक्तीने वेगाने वजन कमी करण्याचा कधीच प्रयत्न करु नये असा सल्लाही हेल्थ एक्सपर्ट्स देतात. यामुळे शरिरातील स्नायूंना नुकसान पोहोचले जाते. याशिवाय शरिरात व्हिटॅमिनची कमतरता, इलेक्ट्रोलाइटचा असामान्य स्तर आणि डिहाइड्रेश अशा काही समस्या उद्भवू शकतात.
कठोर डाएटमुळेही होईल नुकसान
डाएटिएशनच्या मते, काहीजण वेगाने वजन कमी करण्यासाठी कठोर डाएट सुरु करतत. अशातच पचनक्रियेला नुकसान पोहोचले जाऊ शकते. याशिवाय हेव्ही एक्सरसाइज करताना स्नायू खेचल्यासारखेही होतात. अशातच उच्च रक्तदाब आणि कोलेस्ट्रॉलचा शरिरातील स्तर वाढला जाऊ शकतो. एवढेच नव्हे अन्य आरोग्यासंबंधित समस्याही उद्भवू शकतात.
या गोष्टींची घ्या काळजी
वजन कमी करण्यासाठी अजिताब घाई करू नये. यासाठी संतुलित आहारासह पुरेशा प्रमाणात पोषण तत्त्वांचे सेवन करावे. एवढेच नव्हे नियमित 30 ते 40 मिनिटे व्यायाम करावा.
(DISCLAIMER : लेखाद्वारे वाचकांपर्यंत केवळ माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत. याबाबत Asianet News Marathi कोणताही दावा व समर्थन करत नाही. यासाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)
आणखी वाचा :
चितासारखी चपळ असणाऱ्या Vinesh Phogat चा वाचा खास डाएट प्लॅन
वजन कमी करण्यासाठी फॉलो करा हे 5 नियम, आठवड्याभरात दिसेल फरक