वजन कमी करण्यासाठी फॉलो करा हे 5 नियम, आठवड्याभरात दिसेल फरक
- FB
- TW
- Linkdin
वजन कमी करण्यासाठी खास टिप्स
वजन वाढल्यानंतर ते कमी करणे बहुतांशजणांना कठीण वाटते. कारण अनेक प्रकारे वजन कमी करण्याचा प्रयत्न करुनही काहीही फरक दिसत नाही. खरंतर, शरीर हेल्दी राहण्यासाठी सर्वाधिक महत्वाचे म्हणजे समतुल्य रुटीन फॉलो करणे आवश्यक आहे. सध्याच्या बदललेल्या लाइफस्टाइलमुळे डाएट आणि एक्सरसाइजसाठी काहींना वेळच मिळत नाही. अशातच वजन वाढणे, लठ्ठपणा अशा समस्या उद्भवू लागतात. जाणून घेऊया वजन कमी करण्यासाठी असे कोणते 5 नियम फॉलो करावेत जेणेकरुन वेगाने वजन कमी होण्यास मदत होईल.
दररोज 30-40 मिनिटे व्यायाम करा
वाढलेले वजन कमी करण्यासाठी दररोजच्या रुटीनमध्ये कमीत कमी 30-40 मिनिटे फिजिकल अॅक्टिव्हिटी जरुर करावी. यासाठी योगा अथवा कार्डिओ एक्सरसाइज करु शकता.
फूड्सचे प्रमाण नव्हे कॅलरीज कमी करा
बहुतांशजण वजन कमी करण्यासाठी दिवसभरात खाणे कमी करतात अथवा एक वेळचे जेवण कमी करतात. यामुळे वजन कमी नव्हे तर शरिरात उर्जा निर्माण होत नाही. यामुळे काही आजार मागे लागतात. वजन कमी करायचे असल्यास खाण्यातील कॅलरीज कमी करा. यासाठी फॅट्स असणारे पदार्थ खाणे टाळा. याशिवाय एकाचवेळी भरपूर प्रमाणात खाण्याएवजी थोड्याथोड्यावेळाने खा.
पुरेशा प्रमाणात पाणी प्या
वजन कमी करण्यासाठी दिवसाची सुरुवात एक ग्लास पाणी पिऊन करा. दररोज कमीतकमी 3 लीटर पाणी प्या. यामुळे तुम्हाला डिहाइट्रेशनची समस्या उद्भवणार नाही. पाण्याशिवाय तुम्ही नारळाचे पाणीही पिऊ शकता. यामुळे मेटाबॉलिज्म सुधारण्यासह वजनही लवकर कमी होईल.
प्रोटीनयुक्त डाएट फॉलो करा
वजन कमी करण्यासह स्नायूंना बळकटी मिळण्यासाठी डाएटमध्ये प्रोटीनयुक्त पदार्थांचे सेवन करावे. यासाठी सोयाबीन, लो फॅट पनीर, अंड्यांचा सफेद भाग अशा गोष्टी डाएटमध्ये खाव्यात. दररोज किती प्रमाणात प्रोटीनचे सेवन करावे याबद्दलचा सल्ला आरोग्य तज्ज्ञांकडून घेऊ शकता.
पुरेशी झोपही महत्वाची
वजन वाढण्यामागील आणखी एक मुख्य कारण म्हणजे बिघडलेली झोपेची वेळ. यामुळे झोपही पूर्ण होत नाही आणि अशातच शरिरातील कॉर्टिसोल हार्मोन वाढला जातो. यामुळे तणाव वाढण्यासह मेटाबॉलिज्म स्लो होतो. परिणामी वजन वाढण्यास सुरुवात होते. वजन कमी करायचे असल्यास योग्य वेळी आणि सात ते आठ तासांची झोप घेणे अत्यंत महत्वाचे आहे.
(DISCLAIMER : लेखाद्वारे वाचकांपर्यंत केवळ माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत. याबाबत Asianet News Marathi कोणताही दावा व समर्थन करत नाही. यासाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)
आणखी वाचा :
पावसाळ्यात करटुल्याची भाजी खाण्याचे आरोग्यदायी फायदे, वजनही होईल कमी
Breastfeeding संबंधित हे 6 गैरसमज प्रत्येक महिलेला माहिती असावेत