MalayalamNewsableKannadaKannadaPrabhaTeluguTamilBanglaHindiMarathiMyNation
Add Preferred SourceGoogle-icon
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • लेटेस्ट न्यूज
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • वेब स्टोरीज
  • यूटिलिटी न्यूज
  • मुंबई
  • भारत
  • महाराष्ट्र
  • स्पोर्ट्स
  • गुन्ह्याच्या बातम्या
  • विश्व
  • गेम्स
  • Home
  • lifestyle
  • Raksha Bandhan 2026 : रक्षाबंधन 27 की 28 ऑगस्ट? जाणून घ्या योग्य तारखेसह राखी बांधण्याचा शुभ मुहूर्त

Raksha Bandhan 2026 : रक्षाबंधन 27 की 28 ऑगस्ट? जाणून घ्या योग्य तारखेसह राखी बांधण्याचा शुभ मुहूर्त

यंदा श्रावण पौर्णिमा दोन दिवस असल्याने रक्षाबंधनाच्या तारखेबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. मात्र उदयतिथीनुसार 28 ऑगस्ट 2026 रोजी रक्षाबंधन साजरा केला जाणार आहे.

2 Min read
Author : Chanda Mandavkar
Published : Aug 06 2026, 02:20 PM IST
Share this Photo Gallery
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Whatsapp
  • GNFollow Us
16
यंदा रक्षाबंधन कधी?
Image Credit : CHATGPT.COM

यंदा रक्षाबंधन कधी?

यंदा श्रावण पौर्णिमा दोन दिवसांवर आल्याने रक्षाबंधनाची तारीख नेमकी कोणती, याबाबत अनेकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. वैदिक पंचांगानुसार श्रावण पौर्णिमा 27 ऑगस्टपासून सुरू होत आहे. तरी उदयतिथीच्या नियमानुसार रक्षाबंधनाचा सण 28 ऑगस्ट 2026 रोजी साजरा करणे अधिक शुभ असणार आहे. या दिवशी राखी बांधण्याचा शुभ मुहूर्त, राहुकाल आणि वरलक्ष्मी व्रताचा योगही जुळून आला आहे.

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred
26
27 की 28 ऑगस्ट?
Image Credit : Getty

27 की 28 ऑगस्ट?

वैदिक पंचांगानुसार श्रावण शुद्ध पौर्णिमा तिथी 27 ऑगस्ट रोजी सकाळी 9.08 वाजता सुरू होऊन 28 ऑगस्ट रोजी सकाळी 9.48 वाजेपर्यंत राहणार आहे.

हिंदू धर्मात बहुतेक सण उदयतिथीनुसार साजरे केले जातात. तर 28 ऑगस्टच्या सूर्योदयावेळी पौर्णिमा तिथी असल्यामुळे रक्षाबंधन 28 ऑगस्ट, शुक्रवार रोजी साजरा करणे शास्त्रानुसार योग्य ठरणार आहे.

Related Articles

Related image1
Raksha Bandhan 2025 : बहिण-भावाला खास शुभेच्छा! नात्यात येईल आणखी गोडवा!
Related image2
Raksha Bandhan 2025 : रक्षाबंधनाला बहिणीला भेट देण्यासाठी 5 गिफ्ट आयडिया
36
राखी बांधण्याचा शुभ मुहूर्त
Image Credit : Getty

राखी बांधण्याचा शुभ मुहूर्त

28 ऑगस्ट रोजी राखी बांधण्यासाठी सकाळचा शुभ मुहूर्त सकाळी 5.57 ते सकाळी 9.48 पर्यंत आहे. या वेळेत बहिणींनी भावाला राखी बांधल्यास ते शुभ मानले जाते.

46
शुभ मुहूर्त चुकला तर काय कराल?
Image Credit : Getty

शुभ मुहूर्त चुकला तर काय कराल?

काही कारणास्तव दिलेल्या शुभ मुहूर्तात राखी बांधणे शक्य झाले नाही तरी चिंता करण्याची गरज नाही. राहुकाल टाळून दिवसभरात इतर शुभ वेळेतही राखी बांधता येते.

56
रक्षाबंधनाच्या दिवशी राहुकाल कधी?
Image Credit : Getty

रक्षाबंधनाच्या दिवशी राहुकाल कधी?

28 ऑगस्ट रोजी राहुकालाची वेळ सकाळी 10.46 ते दुपारी 12.22 वाजेपर्यंत असणार आहे. तर राहुकाल हा अशुभ काल मानला जात असल्याने या वेळेत कोणतेही शुभ कार्य करण्याचे टाळावे.

66
वरलक्ष्मी व्रताचाही शुभ योग
Image Credit : Getty

वरलक्ष्मी व्रताचाही शुभ योग

यंदा 28 ऑगस्ट रोजी रक्षाबंधनासोबतच वरलक्ष्मी व्रत देखील आहे. श्रावण महिन्याच्या शेवटच्या शुक्रवारी हे व्रत केले जाते. त्यामुळे या दिवशी धार्मिक दृष्ट्या विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.

(DISCLAIMER : लेखाद्वारे वाचकांपर्यंत केवळ माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत. याबाबत Asianet News Marathi कोणताही दावा व समर्थन करत नाही. यासाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

Lifestyle News in Marathi (जीवनशैली बातम्या): Get the latest lifestyle news updates, fashion trends, and beauty tips in Marathi. Read रिलेशनशिप टिप्स, हेल्थ टिप्स, Travel News & Watch Marathi Lifestyle Video at Asianet Marathi News.

About the Author

CM
Chanda Mandavkar
चंदा सुरेश मांडवकर एक अनुभवी प्रकार असून त्यांना मीडिया क्षेत्राचा 8 वर्षांचा अनुभव आहे. एका वृत्तवाहिनीमधून पत्रकाराच्या रुपात काम करण्यास सुरुवात केली. चंदा यांना लाइफस्टाइल, राजकीय आणि जनरल नॉलेज या विषयांमध्ये रस असून गेल्या 1 वर्षांहून अधिक काळ एशियानेट न्यूजमध्ये या विभागांसाठी काम करत आहेत. आपल्या वाचकांना सोप्या आणि सहज समजेल अशा भाषेत लिहण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न असतो.
जीवनशैली बातम्या

Recommended Stories
Recommended image1
Navratri 2026 Fashion: जुन्या कपड्यांना द्या नवा लूक, नवरात्रीसाठी ९ भन्नाट आयडिया!
Recommended image2
Navratri 2026 Outfits : जान्हवी ते आलिया, नवरात्रीसाठी 9 बॉलिवूड अभिनेत्रींचे खास लूक्स
Recommended image3
Aluminium Foil For Plants : कुंडीतील झाडांसाठी ॲल्युमिनियम फॉइलचे ३ भन्नाट फायदे
Recommended image4
Gas Stove Low Flame : गॅस शेगडीची फ्लेम अचानक कमी झालीये? लगेच या ६ गोष्टी तपासा!
Recommended image5
Hair Care Tips : रोज हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? डॉक्टर काय सांगतात ते वाचा
Related Stories
Recommended image1
Raksha Bandhan 2025 : बहिण-भावाला खास शुभेच्छा! नात्यात येईल आणखी गोडवा!
Recommended image2
Raksha Bandhan 2025 : रक्षाबंधनाला बहिणीला भेट देण्यासाठी 5 गिफ्ट आयडिया
Asianet
Follow us on
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • About Website
  • Terms of Use
  • Privacy Policy
  • CSAM Policy
  • Complaint Redressal - Website
  • Compliance Report Digital
  • Investors
© Copyright 2026 Asianxt Digital Technologies Private Limited (Formerly known as Asianet News Media & Entertainment Private Limited) | All Rights Reserved