सार

Anant-Radhika Wedding Reception : अनंत अंबानी आणि राधिका मर्चेंटचा अखेर 12 जुलैला विवाहसोहळा मोठ्या धूमधडाक्यात पार पडला. लग्नानंतरही कपलचे काही फंक्शन आयोजित करण्यात आले आहेत. याचे काही फोटो-व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

Anant-Radhika Wedding Reception : अनंत अंबानी आणि राधिका मर्चेंटच्या लग्नसोहळ्यानंतर 14 जुलैला मंगल उत्सवाचे (Mangal Ustav) आयोजन मुंबईतील जिओ वर्ल्ड कंन्वेक्शन सेंटरमध्ये आयोजित करण्यात आले होते. या सोहळ्याला राजकीय, बॉलिवूड, क्रिकेट क्षेत्रातील खेळाडू आणि अनेक व्यावसायिकांनी उपस्थिती लावली होती. अशातच अनंत-राधिकाच्या मंगल उत्सवावेळचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

काय आहे व्हिडीओमध्ये?
व्हायरल झालेल्या व्हिडीओनुसार, अनंत अंबानी आणि राधिका मर्चेंट मंगल उत्सवाचा आनंद लुटताना दिसून येत आहेत. यावेळी नववधू राधिकाने भांगात कुंकू आणि गळ्यात मंगळसूत्र घातल्याचे दिसून आले आहे. या लूकमध्ये राधिका एका सौभग्यवतीसारखी दिसत आहे. याच दरम्यान, राधिकाच्या अगदी जवळ अनंत उभा असल्याचेही व्हिडीओमध्ये दिसत आहे. मंगल उत्सवावेळी अनंतने काळ्या रंगातील शेरवानी आणि राधिकाने लाइट गोल्डन रंगातील लेहेंगा परिधान केला आहे.

View post on Instagram
 

मंगल उत्सावाला बॉलिवूड कलकारांची एण्ट्री
14 जुलैला झालेल्या मंगल उत्सव म्हणजेच मिनी रिसेप्शनला गोविंदा, सनी देओल, बॉबी देओल, मधुर भांडारकर, सुभाष घई, राजकुमार राव आणि पत्नी पत्रलेखा, बिपाशा बासू, करण सिंह ग्रोवर, अर्जुन कपूर, डायना पँटी, अँटली, जॅकी भगन्नानी, रकुल प्रीत सिंग आणि आयुषमान खुरानासह अन्य बॉलिवूडमधील कलाकारांनी उपस्थिती लावल्याचे दिसून आले.

शुभ आशीर्वाद सोहळ्यातील पाहुणे
शनिवारी (13 जुलै) अंबानी परिवाराने शुभ आशीर्वाद सोहळ्याचे आयोजन केले होते. या सोहळ्यालाा बॉलिवूडमधील शाहरुख खान, सलमान खान, सिद्धार्थ मल्होत्रा आणि अमिताभ बच्चन यांच्यासोबत नात नव्या नंदा आणि नातू निखील नंदा आला होता. याशिवाय सुनील शेट्टी, केएल राहुल, रणबीर कपूर, जान्हवी कपूरसह अन्य सेलेब्सने उपस्थिती लावली होती.

लग्नसोहळ्यातील राधिकाचा लूक
लग्नाच्या दिवशी राधिकाने अबू जानी संदीप खोसला यांनी डिझाइन केलेला लाल आणि गोल्डन रंगातील हेव्ही वर्क करण्यात आलेला आयव्हरी लेहेंगा परिधान केला होता. यावर सुंदर ज्वेलरी घालत राधिकाने ब्राइडल लूक पूर्ण केला होता. खरंतर, राधिकाचा संपूर्ण लूक गुजरातील परंपरेतील पनेतरप्रमाणे दिसून येत होता. या परंपरेनुसार, नववधू पांढऱ्या आणि लाल रंगातील आउटफिट्स परिधान करते. याशिवाय आउटफिटवर टिश्यू शोल्डर दुप्पटाही कॅरी केला होता.

आणखी वाचा : 

'काही चुकले असल्यास माफ करा...', नीता अंबानींनी मागितली फोटोग्राफर्संची माफी

Anant and Radhika Merchant Wedding : अनंत अंबानीच्या फेट्याला लावलेल्या कलगीची किंमत 160 कोटी?