MalayalamNewsableKannadaKannadaPrabhaTeluguTamilBanglaHindiMarathiMyNation
Add Preferred SourceGoogle-icon
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • लेटेस्ट न्यूज
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • वेब स्टोरीज
  • यूटिलिटी न्यूज
  • मुंबई
  • भारत
  • महाराष्ट्र
  • स्पोर्ट्स
  • गुन्ह्याच्या बातम्या
  • विश्व
  • गेम्स
  • Home
  • lifestyle
  • Gudhi Padwa 2026: हिंदू नववर्षाचा श्रीगणेशा! गुढीपाडवा का साजरा करतात? जाणून घ्या 'या' ५ खास गोष्टी आणि शुभ मुहूर्त

Gudhi Padwa 2026: हिंदू नववर्षाचा श्रीगणेशा! गुढीपाडवा का साजरा करतात? जाणून घ्या 'या' ५ खास गोष्टी आणि शुभ मुहूर्त

Gudhi Padwa 2026: गुढीपाडवा हिंदू नववर्षाचा प्रारंभ असून तो ब्रह्मदेवाने सृष्टीची निर्मिती केल्याने, रामाच्या अयोध्या पुनरागमनामुळे, शालिवाहन शकाच्या विजयामुळे साजरा करतात. या दिवशी गुढी उभारण्याच्या शास्त्रोक्त पद्धतीसह कडूनिंबाचे महत्त्व सांगितले.

2 Min read
Author : Rameshwar Gavhane
Published : Mar 17 2026, 06:41 PM IST
Share this Photo Gallery
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Whatsapp
  • GNFollow Us
17
हिंदू नववर्षाचा श्रीगणेशा! गुढीपाडवा का साजरा करतात?
Image Credit : Getty

हिंदू नववर्षाचा श्रीगणेशा! गुढीपाडवा का साजरा करतात?

मुंबई: चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजेच आपला मराठमोळा 'गुढीपाडवा'! हिंदू संस्कृतीतील साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या या सणाने आपल्या नवीन वर्षाची सुरुवात होते. घराघरात उभारली जाणारी उंच गुढी केवळ विजयाचे प्रतीक नाही, तर ती समृद्धी आणि आरोग्याची नांदी आहे. यंदा २०२६ मध्ये गुढीपाडवा साजरा करताना, या सणामागचा नेमका इतिहास आणि शास्त्र काय आहे, हे जाणून घेऊया. 

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred
27
१. सृष्टीचा वाढदिवस, ब्रह्मध्वजाची कथा
Image Credit : Getty

१. सृष्टीचा वाढदिवस, ब्रह्मध्वजाची कथा

पौराणिक कथांनुसार, ब्रह्मदेवाने याच दिवशी विश्वाची निर्मिती केली. म्हणूनच या दिवसाला 'सृष्टीचा वाढदिवस' मानले जाते. या दिवशी उभारल्या जाणाऱ्या गुढीला 'ब्रह्मध्वज' असेही म्हणतात, जो विश्वाच्या निर्मितीचा आनंद साजरा करतो. 

Related Articles

Related image1
Summer Flowers: देवाला रोज ताजी फुलं, बाल्कनीत लावा ही ६ झाडं, सुगंध थेट देवापर्यंत पोहोचेल!
Related image2
Summer Health Care : उन्हाळ्यात कलिंगड खा आणि रहा फ्रेश! त्वचा व आरोग्यासाठी 5 जबरदस्त फायदे
37
२. प्रभू श्रीरामांचे आगमन आणि विजयाचा उत्सव
Image Credit : Getty

२. प्रभू श्रीरामांचे आगमन आणि विजयाचा उत्सव

भगवान श्रीविष्णूंनी प्रभू रामाचा अवतार घेऊन रावणाचा वध केला आणि याच दिवशी अयोध्येत पुनरागमन केले. प्रभू रामाच्या स्वागतासाठी अयोध्येतील जनतेने घराघरात गुढ्या आणि तोरणे उभारली होती, तीच परंपरा आजही आपण जोपासतो आहोत. 

47
३. शालिवाहन शकाचा प्रारंभ
Image Credit : Printrest

३. शालिवाहन शकाचा प्रारंभ

महाराष्ट्राच्या मातीतील पैठणच्या शालिवाहन राजाने क्रूर शक लोकांचा पराभव केला. या ऐतिहासिक विजयाप्रीत्यर्थ चैत्र शुद्ध प्रतिपदेपासून 'शालिवाहन शक' ही कालगणना सुरू झाली. आपल्या पंचांगाची सुरुवात याच दिवसापासून होते. 

57
गुढी कशी उभारावी? (शास्त्रोक्त पद्धत)
Image Credit : pinterest

गुढी कशी उभारावी? (शास्त्रोक्त पद्धत)

अभ्यंगस्नान: पहाटे लवकर उठून सुवासिक तेलाने मर्दन करून अभ्यंगस्नान करावे.

गुढीची रचना: एक उंच वेळूची (बांबूची) काठी घेऊन ती स्वच्छ करावी. त्याच्या टोकाला भरजरी रेशमी वस्त्र, कडूनिंबाची डहाळी, फुलांचा हार आणि साखरेच्या गाठी (बत्तासे) बांधावेत. त्यावर चांदीचा किंवा तांब्याचा तांब्या (लोटी) उपडा ठेवावा.

पूजन: दारासमोर सुंदर रांगोळी काढून त्यावर ही गुढी उभारावी आणि तिची मनोभावे पूजा करावी. 

67
आरोग्यासाठी कडूनिंबाचा प्रसाद
Image Credit : Instagram

आरोग्यासाठी कडूनिंबाचा प्रसाद

गुढीपाडव्याला कडूनिंबाची पाने, जिरे, मिरी, हिंग, सैंधव आणि ओवा यांचे मिश्रण करून त्याचे सेवन केले जाते. आयुर्वेद शास्त्रानुसार, चैत्र महिन्याच्या सुरुवातीला कडूनिंबाचे सेवन केल्याने वर्षभर रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि रक्ताभिसरण सुधारते. 

77
साडेतीन मुहूर्ताचे महत्त्व
Image Credit : adobe stock

साडेतीन मुहूर्ताचे महत्त्व

हा दिवस अत्यंत शुभ मानला जात असल्याने नवीन उद्योगाचा प्रारंभ, गृहप्रवेश किंवा सोन्या-चांदीची खरेदी करण्यासाठी हा सर्वोत्तम मुहूर्त आहे. संध्याकाळी सूर्यास्तापूर्वी गुढीला नैवेद्य दाखवून ती सन्मानाने खाली उतरवली जाते.

About the Author

RG
Rameshwar Gavhane
रामेश्वर गव्हाणे हे asianetnews.com या प्रथितयश संस्थेच्या मराठी एशियानेट विभागात कंटेट रायटर या पदावर कार्यरत आहेत. त्यांनी रानडे इन्स्टिट्युट येथून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं असून पॉलिटिकल सायन्समध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. त्यांनी असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून टीव्ही ९ मराठी या न्यूज चॅनलमधून पत्रकारितेला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी लोकशाही मराठी न्यूज चॅनलमध्येही असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून काम केले आहे. त्यानंतर त्यांनी इनशॉर्ट्स पब्लिक अॅप येथे कंटेट स्पेशॅलिस्ट म्हणून काम केले आहे. त्यांना पत्रकारितेत एकूण ६ वर्षांचा अनुभव आहे. रामेश्वर गव्हाणे यांना राजकीय, सामाजिक विषय, गुन्हे या विषयावर लिहायला आवडते. त्यांना टीव्ही आणि डिजीटल मिडिया क्षेत्रात कामाचा अनुभव आहे.
जीवनशैली बातम्या
गुढी पाडवा

Recommended Stories
Recommended image1
ज्वेलरी फॅशनमध्ये 'Nose Cuff'ची एन्ट्री, चारचौघांत दिसाल हटके
Recommended image2
वजन कमी करण्यासाठी 5 प्रभावी Detox Drinks; आठवड्याभरात दिसेल फरक!
Recommended image3
Relationship Advice : तुम्हीही घरातील ‘Silent Politics’ चे बळी आहात? नात्यांमध्ये वाढणाऱ्या शांत संघर्षामागची कारणे घ्या जाणून
Recommended image4
Horoscope 26th May : आज या 3 राशींचा खर्च वाढणार, बजेट बिघडणार; पाहा तुमचं राशीभविष्य
Recommended image5
Jewellery: बकरी ईदला नवाबी लूकसाठी ट्राय करा हे खास मुगलई पासा
Related Stories
Recommended image1
Summer Flowers: देवाला रोज ताजी फुलं, बाल्कनीत लावा ही ६ झाडं, सुगंध थेट देवापर्यंत पोहोचेल!
Recommended image2
Summer Health Care : उन्हाळ्यात कलिंगड खा आणि रहा फ्रेश! त्वचा व आरोग्यासाठी 5 जबरदस्त फायदे
Asianet
Follow us on
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • About Website
  • Terms of Use
  • Privacy Policy
  • CSAM Policy
  • Complaint Redressal - Website
  • Compliance Report Digital
  • Investors
© Copyright 2026 Asianxt Digital Technologies Private Limited (Formerly known as Asianet News Media & Entertainment Private Limited) | All Rights Reserved