सार
हेल्दी आणि टेस्टी नाश्तासाठी वेगवेगळे पर्याय आहेत. पण झटपट एखादी रेसिपी तयार करायची असल्यास पोहा बॉल्स करू शकता. यासाठी अगदी कमी सामग्री लागते. जाणून घेऊया पोहा बॉल्सची रेसिपी सविस्तर...
Poha Balls Recipe in Marathi : हेल्दी आणि फिट राहण्यासाठी सकाळचा नाश्ता करणे फार महत्वाचे आहे. बहुतांशजण नाश्तामध्ये ओट्स, ब्रेड किंवा पोह्याचे सेवन करणे पसंत करतात. पण दररोज एकसमान नाश्ता करुन कंटाळा असाल तर पोह्यांची खास डिश तयार करु शकता. खरंतर, पोह्यांचे हेल्दी बॉल्स सकाळच्या नाश्तासाठी करू शकता. याचीच रेसिपी पुढे स्टेप बाय स्टेप जाणून घेऊया.
सामग्री
- 1 वाटी पोहे
- 1/2 वाटी रवा
- अर्धा वाटी दही
- 1/2 बारीक चिरलेली कोथिंबीर
- 1/2 धणे पावडर
- 1/4 जीरे पावडर
- 1/4 हिरवी मिरची
- राई, कढीपत्ता आणि दोन चमचे तेल
- चवीनुसार मीठ
कृती
- सर्वप्रथम एका भांड्यात भिजवलेले पोहे, रवा आणि दही मिक्स करुन घ्या.
- मिश्रणात कोथिंबीर आणि मीठ घालून पुन्हा पीठ मळून घ्या.
- पोह्यांच्या बॉल्सससाठी तयार करण्यात आलेल्या पीठाचे लहान आकाराचे गोळे तयार करुन घ्या.
- पीठाचे गोळे इडलीच्या भांड्यात ठेवून 10-15 मिनिटे वाफवून घ्या.
- फोडणीसाठी पॅनमध्ये तेल गरम करा. यामध्ये कढीपत्ता, जीरे आणि राई घाला.
- वाफवलेले पोह्यांचे बॉल्स इडलीच्या भांड्यातून काढून फोडणीमध्ये हलके फ्राय करा.
- एका प्लेटमध्ये काढून गरमागरम पोहा बॉल्स सॉस किंवा चटणीसोबत खाण्यासाठी सर्व्ह करा.
आणखी वाचा :
तोंडाला सुटेल पाणी, वाचा Creamy Macaroni Pasta रेसिपी स्टेप बाय स्टेप