सार

Pitru Paksha 2024 Date : यंदा पितृपपक्ष भाद्रपद पौर्णिमेपासून सुरु होणार आहे. येत्या 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोंबरपर्यंत पितृ पंधरवडा असणार आहे. जाणून घ्या पितृपक्षाची योग्य तारीख काय...

Pitru Paksha 2024 Date : पितृपपक्ष भाद्रपद महिन्याच्या पौर्णिमेपासून ते अश्विन अमावस्या अशा 15 दिवसांसाठी असतो. पितृपक्षात पंधरा दिवस आपले पूर्वज पृथ्वीतलावर येतात असे म्हटले जाते. यामुळे पितृपक्षात श्राद्ध, तर्पण आणि पिंडदान करण्याचे महत्व आहे. अशी मान्यता आहे की, पितृपक्षात श्राद्ध केल्याने पितरांना मोक्ष प्राप्ती होते. याशिवाय पितृदोषापासूनही आपल्याला मुक्तता मिळत घरात सुख-शांती आणि समृद्धी येते. खरंतर, पितरांचे श्राद्ध त्यांच्या मृत्यूच्या तिथीनुसार करणे उत्तम मानले जाते. दरम्यान, यंदा पितृपक्षाची सुरुवात 17 सप्टेंबर की 18 सप्टेंबरपासून असणार अशी शंका बहुतांशजणांना आहे.

यंदा पितृपक्षाची सुरुवात कधी?
यंदा पितृपक्षाची सुरुवात भाद्रपद पौर्णिमा म्हणजेच 17 सप्टेंबर 2024 पासून सुरु होणार आहे. येत्या 2 ऑक्टोंबरला पितृपक्ष संपणार आहे.

पहिले श्राद्ध कधी?
पितृपक्षाची सुरुवात 17 सप्टेंबरपासून होणार आहे. पण या दिवशी श्राद्ध कर्म केले जाणार नाहीये. कारण 17 सप्टेंबरला पौर्णिमा आहे. यावेळी ऋषींचे तर्पण केले जाते. श्राद्ध नेहमीच प्रतिपदा तिथीपासून सुरु होते. अशातच पहिले श्राद्ध 18 सप्टेंबरला केले जाणार आहे.

पितृपक्षातील श्राद्ध तिथी

  • 17 सप्टेंबर 2024 (पौर्णिमा श्राद्ध )
  • 18 सप्टेंबर 2024 (प्रतिपदा श्राद्ध )
  • 19 सप्टेंबर 2024 (द्वितीया श्राद्ध)
  • 20 सप्टेंबर 2024 (तृतीया श्राद्ध )
  • 21 सप्टेंबर 2024 (चतुर्थी श्राद्ध)
  • 21 सप्टेंबर 2024 (महाभरणी)
  • 22 सप्टेंबर 2024 (पंचमी श्राद्ध)
  • 23 सप्टेंबर 2024 (षष्ठी श्राद्ध)
  • 23 सप्टेंबर 2024 (सप्तमी श्राद्ध)
  • 24 सप्टेंबर 2024 (अष्टमी श्राद्ध)
  • 25 सप्टेंबर 2024 (नवमी श्राद्ध)
  • 26 सप्टेंबर 2024 (दशमी श्राद्ध)
  • 27 सप्टेंबर 2024 (एकादशी का श्राद्ध)
  • 29 सप्टेंबर 2024 (द्वादशी श्राद्ध )
  • 29 सप्टेंबर 2024 (मघा श्राद्ध)
  • 30 सितंबर 2024 (त्रयोदशी श्राद्ध )
  • 1 ऑक्टोंबर 2024 (चतुर्दशी श्राद्ध )
  • 2 ऑक्टोंबर 2024 (सर्वपित्री अमावस्या)

(DISCLAIMER : लेखाद्वारे वाचकांपर्यंत केवळ माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत. याबाबत Asianet News Marathi कोणताही दावा व समर्थन करत नाही. यासाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

आणखी वाचा : 

Navratri 2024 : शारदीय नवरात्रीत केली जाते या 9 देवींची पूजा, वाचा पूजेचे महत्व

यंदाच्या Navratri 2024 मधील 9 रंग, देवी दुर्गा होईल प्रसन्न