Navratri 2024 : शारदीय नवरात्रीत केली जाते या 9 देवींची पूजा, वाचा पूजेचे महत्व

| Published : Sep 11 2024, 03:06 PM IST / Updated: Sep 11 2024, 03:07 PM IST

WB Durga Pooja
Navratri 2024 : शारदीय नवरात्रीत केली जाते या 9 देवींची पूजा, वाचा पूजेचे महत्व
Share this Article
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Email

सार

Navratri 2024 : शारदीय नवरात्रोत्सवाला येत्या 3 ऑक्टोंबरपासून सुरुवात होणार आहे. या दिवशी घटस्थापना असून पुढील नऊ दिवस देवीच्या नऊ वेगवेगळ्या रुपांची पूजा केली जाते. याबद्दलच सविस्तर जाणून घेऊया…

Shardiya Navratri 2024 : नवरात्रौत्सवाचा सण देशभरात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. यंदा शारदीय नवरात्रौत्सव 3 ऑक्टोंबरपासून साजरी केली जाणार आहे. नवरात्रौत्सवाच्या नऊ दिवसात देवीच्या नऊ रुपांची विधीवत पूजा-आरती केली जाते. याशिवाय नवरात्रीच्यावेळी बहुतांशजण व्रत, पूजन, हवन-पाठ आणि जप करतात. नवरात्रीच्या दिवशी देवी दुर्गा घरात प्रवेश करते असे मानले जाते.

शारदीय नवरात्री प्रत्येक वर्षी अश्विन महिन्यात साजरी केली जाते. यावेळी देवीची स्थापना करत दसऱ्याच्या दिवशी विसर्जन केले जाते. नवरात्रौत्सवावेळी काही ठिकाणी गरबा आणि रामलीलाचे आयोजन केले जाते. जाणून घेऊया नवरात्रौत्सवाच्या नऊ दिवसात केल्या जाणाऱ्या देवींच्या नऊ रुपांसह पूजा-विधी सविस्तर...

पहिली माळ : देवी शैलपुत्री
नवरात्रीच्या पहिल्या दिवशी शैलपुत्रीची पूजा केली जाते. देवी दुर्गेने पार्वतीचे स्वरुप घेत हिमालयात जन्म घेतला होता. यामुळे देवीचे नाव शैलपुत्री पडले होते. या देवीच्या पूजनाने आयुष्यात धन-समृद्धी येते असे मानले जाते. शैलपुत्रीची पूजा करताना पिवळ्या रंगाचे वस्र परिधान करा. याशिवाय पूजेवेळी देवीला शुद्ध तूपातील पदार्थांचा नैवेद्य दाखवा.

दुसरी माळ : देवी ब्रम्हचारिणी
देवी ब्रम्हचारिणीची पूजा केल्याने आयुष्यात यश आणि सिद्धी प्राप्त होते असे मानले जाते. देवी ब्रम्हचारिणी देवीचे अविवाहित रुप आहे. या देवीच्या पूजेनंतर साखरेचा नैवेद्य दाखवल्याने घरातील मंडळींना दीर्घायुष्य लाभते असे मानले जाते.

तिसरी माळ : देवी चंद्रघंटा
देवी चंद्रघंटेची पूजा केल्याने वाईट कृत्यांच्या पापांमधून मुक्ती मिळते असे मानले जाते. नवरात्रीच्या तिसऱ्या दिवसी देवी चंद्रघंटाची पूजा केली जाते. या देवीच्या कपाळावर अर्धचंद्र दिसून येते. या दिवशी राखाडी रंगातील वस्र परिधान केले जातात. देवी चंद्रघंटाला दूध अथवा दूधापासून तयार करण्यात आलेल्या पदार्थांचा नैवेद्य दाखवावा. यामुळे आयुष्यातील दु:ख दूर होतात.

चौथी माळ : देवी कुष्मांडा
नवरात्रीच्या चौथ्या दिवशी दुर्गा देवीचे रुप देवी कुष्मांडाची पूजा केली जाते. या दिवशी नारंगी रंगातील वस्र परिधान करत पूजा केल्याने देवी प्रसन्न होते असे मानले जाते. नारंगी रग आनंद आणि सकारात्मकतेचे प्रतीक आहे. देवी कुष्मांडाची पूजा केल्याने आयुष्यातील दु:ख दूर होतात असे मानले जाते. देवी कुष्मांडाला सिद्धीची देवी असेही म्हटले जाते.

पाचवी माळ : देवी स्कंदमाता
नवरात्रीच्या पाचव्या दिवशी देवी स्कंदमाताची पूजा केली जाते. ही देवी भगवान कार्तिकेयची माता आहे. दुर्गा देवीच्या स्वरुपाने आनंद, समृद्धी आणि मोक्ष प्राप्ति होते असे मानले जाते. देवी स्कंदमातेला केळ्यांचा नैवेद्य दाखवल्याने शारिरीक आरोग्य नेहमीच स्वस्थ राहते.

सहावी माळ : देवी कात्यायनी
नवरात्रीच्या सहाव्या दिवशी देवी कात्यायनीची पूजा केली जाते. देवी कात्यायनी वाघावर स्वार असून तिच्या हातात तलवार धारण केलेली दिसते. देवी कात्यायनीची पूजा केल्याने आरोग्यासंबंधिक समस्या आणि भीती दूर होते. या दिवशी लाल रंगाचे वस्र परिधान करून पूजा झाल्यानंतर मध अर्पण करावे.

सातवी माळ : देवी कालरात्री
देवी कालरात्रीची नवरात्रौत्सवाच्या सातव्या दिवशी पूजा केली जाते. या देवीची पूजा केल्याने आयुष्यातील आर्थिक कष्ट आणि नकारात्मक उर्जा दूर होतात. पूजेनंतर देवीला गुळाचा नैवेद्य दाखवल्याने अकाली येणारी संकटे दूर होतात.

आठवी माळ : देवी महागौरी
नवरात्रीच्या आठव्या दिवशी देवी महागौरीची पूजा केली जाते. या दिवशी गुलाबी रंगातील वस्र परिधान केले जातात. देवी महागौरीच्या पूजनाने आयुष्यातील सर्व दु:ख, दारिद्रता दूर होते. देवी महागौरी व्यक्तीच्या आयुष्या धन, आरोग्य आणि सर्व प्रकारचे आनंद देते असे मानले जाते. या देवीच्या रुपाची पूजा केल्यानंतर तिला नारळ अर्पण करावा.

नववी माळ : देवी सिद्धिदात्री
नवरात्रीच्या नवव्या दिवशी देवी सिद्धिदात्रीची पूजा केली जाते. ही देवी कमाळावर बसलेली असते. देवी सिद्धिदात्रीची पूजा केल्याने आयुष्यात सर्व सिद्धी प्राप्त होते असे मानले जाते. देवीच्या पूजेवेळी जांभळ्या रंगातील वस्र परिधान करण्यासह तिळाचा नैवेद्य दाखवावा.

आणखी वाचा : 

Jyeshtha Gauri Avahana : गौरीचे गणपतीसोबत नाते काय? वाचा 5 खास गोष्टी

गणपतीला दुर्वा का अर्पण करतात?, त्यामागचे रहस्य जाणून घ्या

 

Read more Articles on