सार
बहुतांश महिला पायांचे सौंदर्य वाढवण्यासाठी ब्युटी पार्लरमध्ये जाऊन पेडिक्युअर करतात. यासाठी खूप पैसेही खर्च होतात. पण तुम्ही घरच्याघरी अगदी कमी किंमतीतील वस्तूंममध्ये पेडिक्युअर करू शकता.
Pedicure At Home : चेहऱ्याचे सौंदर्य वाढवण्यासह आजकाल बहुतांशजण पायांच्या सौंदर्याकडेही अधिक लक्ष देतात. खरंतर, पायांची योग्य काळजी न घेतल्यास त्यावर डेड सेल्स जमा होतात आणि पायांचे सौंदर्य दूर होते. अशाच पायांचे सौंदर्य कायम टिकून राहण्यासाठी काही उपाय करू शकता. पेडिक्युअरसाठी पार्लरमध्ये वापरल्या जाणाऱ्या महागड्या वस्तूंऐवजी घरच्याघरी कमी किंमतीत पेडिक्युअर करू शकता. जाणून घेऊया याबद्दल सविस्तर..
घरच्याघरी कसे कराल पेडिक्युअर?
घरच्याघरी पेडिक्युअर करण्यासाठी टुथपेस्टचा वापर करू शकता. यासाठी एका वाटीत टुथपेस्ट, एलोवेरा जेल, गुलाब पाणी, तांदळाचे पीठ घ्या. या सर्व साहित्यांचे एक मिश्रण तयार करुन पायाला लावा. पाच मिनिटांनंतर पेस्ट पायाला लावून ठेवल्यानंतर कोमट पाण्यात पाय बुडवून ठेवा. यानंतर पाय स्वच्छ धुवा आणि टॉवेलने पुसून घ्या. यानंतर पायांना हलक्या हाताने मसाज करा.
लिंबूचा रस आणि गुलाब पाणी
पायांचे टॅनिंग दूर करण्यासाठी गुलाब पाणी आणि लिंबूचा रस समप्रमाणात मिक्स करा आणि रात्रभर पायांना लावून ठेवा. सकाळी पाय स्वच्छ पाण्याने धुवा.
बेकिंग सोडा
बेकिंग सोड्यामध्ये टॉमेटोचा रस आणि नारळाचे तेल मिक्स करुन पेस्ट तयार करा. ही पेस्ट पायांना स्क्रब करुन पाच मिनिटानंतर स्वच्छ धुवा.
बटाटा आणि लिंबू
काचेच्या भांड्यात किसलेला बटाट्याचा रस काढून घ्या. यामध्ये लिंबाचा रसही मिक्स करुन पायांना मसाज करा. अर्धा तास पायांना पेस्ट लावून ठेवल्यानंतर स्वच्छ धुवा. यामुळे पायावरील टॅनिंग दूर होईल.
संत्र्याची साल
संत्र्याची साल सुकवून त्याची पावडर तयार करा. या पावडरमध्ये कच्चे दूध मिक्स करुन पेस्ट पायांना लावा. यामुळे पायांचे टॅनिंग दूर होईल.
पेडिक्युअरचे फायदे
- पेडिक्युअर केल्याने पायांची त्वचा उजळण्यासह टॅनिंग दूर होईल. याशिवाय पायांवरील डेड सेल्स निघून जाण्यासह पायाची त्वचा मऊ होईल.
- पेडिक्युअर केल्याने पायांना व्यवस्थितीत रक्तपुरवठा होतो. पायांची त्वचा चमकदार होण्यासाठी पेडिक्युअर करण्यासाठी पाच मिनिटेआधी पायांना व्यवस्थितीत मसाज करा.
- उन्हाळ्याच्या दिवसात बहुतांशजणांच्या पायांची आगआग होते. यावेळी टुथपेस्टने स्क्रब केल्याने पायांची आग होणे कमी होईल.
- पेडिक्युअरसाठी तयार केलेल्या मिश्रणाने पायांची नख देखील स्वच्छ करू शकता. यामुळे नखांचीही चमक परत येईल.
(Disclaimer : सदर लेख केवळ सामान्य माहिती देण्याकरिता आहे. Asianet News या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी आपण तज्ज्ञ किंवा आपल्या ओळखीच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)
आणखी वाचा :
महागडे हेअर मास्क नव्हे दह्यात 7 गोष्टी करा मिक्स, वाढेल केसांची चमक
उन्हाळ्यात काचेसारखी चमकेल त्वचा, तांदळाच्या पाण्यापासून तयार करा सीरम