Lifestyle

उन्हाळ्यात काचेसारखी चमकेल त्वचा, तांदळाच्या पाण्यापासून तयार करा सीरम

Image credits: freepik

उन्हाळ्यात त्वचेसंबंधित वाढतात समस्या

उन्हाळ्याच्या दिवसात धूळ, मातीमुळे त्वचेचे नुकसान होते. पिंपल्स येण्याची समस्याही निर्माण होते. अशातच त्वचेची खास काळजी घेणे आवश्यक आहे.

Image credits: Getty

तांदळाचे पाणी त्वचेसाठी उपयुक्त

ग्लोइंग त्वचेसाठी तांदळाच्या पाण्याचा वापर करु शकतात. तांदूळमध्ये व्हिटॅमिन्स आणि अ‍ॅमिनो अ‍ॅसिडसारखे गुणधर्म असतात, यामुळे त्वचा उजळ होण्यास मदत होते.

Image credits: Freepik

त्वचेवरील सुरकुत्या दूर होतात

तांदळाचे पाणी चेहऱ्यावर लावल्याने त्वचा ग्लो होण्यासह सुरकुत्याही दूर होण्यास मदत होते.

Image credits: freepik

डाग दूर होतात

तांदळाच्या पाण्याचा सातत्याने त्वचेसाठी वापर केल्यास चेहऱ्यावरील डाग दूर होण्यास मदत होते.

Image credits: Getty

असे तयार करा सीरम

सर्वप्रथम एक कप तांदूळ घेऊन ते स्वच्छ करा. यानंतर गरम पाण्यामध्ये तांदूळ उकळून घेतल्यानंतर त्यामधील शिल्लक राहिलेले पाणी गाळून घ्या.

Image credits: social media

तांदळाच्या पाण्याचे सीरम

तांदळाचे शिल्लक राहिलेले पाणी थंड होऊ द्या. यामध्ये व्हिटॅमिन सी मिक्स करुन एका स्प्रे बॉटलमध्ये भरून ठेवा. अशाप्रकारे तुमचे तांदळ्याच्या पाण्यापासून सीरम तयार होईल.

Image credits: Getty

चेहऱ्यावर येईल ग्लो

ग्लोइंग त्वचेसाठी कोरिया आणि जापानमधील तरुणी तांदळाच्या पाण्याचा वापर करतात. दररोज तांदळाच्या पाण्याचे सीरम वापरल्यास त्वचा नक्कीच नितळ आणि मऊ होण्यास मदत होईल.

Image credits: Getty

DISCLAIMER

लेखाद्वारे वाचकांपर्यंत केवळ माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत. याबाबत Asianet News Marathi कोणताही दावा व समर्थन करत नाही. यासाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

Image credits: pexels