Parama Ekadashi 2026 : अधिक मासातील एकादशीच्या दिवशी काही शुभ योग तयार होत आहे. अशातच जाणून घेऊया या एकादशीचे महत्व, पूजा विधी, तिथी आणि काय करावे-काय करू नये याबद्दल सविस्तर माहिती…
Parama Ekadashi 2026 : एकादशीची तिथी भगवान विष्णुंना अतिशय प्रिय आहे आणि अधिक मास देखील विष्णुंना समर्पित आहे. यामुळेच धार्मिक दृष्टीकोनातून पाहिल्यास या एकादशीचे महत्व अधिक वाढले जाते. धार्मिक मान्यतेनुसार, भक्तांनी या दिवशी केलेली पूजा किंवा व्रताचे पुण्य अधिक वाढले जातेय हे व्रत केल्याने व्यक्ती सर्व संकटातून मुक्त होत भगवान विष्णुंसह श्रीमहालक्ष्मी यांचे आशीर्वाद मिळतात. याशिवाय अडकेलली कामे देखील पूर्णत्वास जातात. मात्र हे व्रत करताना काही नियमांचे पालन करणे आवश्यक आहे.

कधी आहे एकादशी?
शास्रांनुसार, पुरुषोत्तम महिन्यातील परमा एकादशीचे अत्यंत महत्व आहे. हिंदू पंचांगानुसार, ज्येष्ठ महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशीच्या तिथीची सुरुवात १० जूनच्या मध्यरात्री १२ वाजून ५७ मिनिटांपासून ते रात्री १०.३६ वाजेपर्यंत राहणार आहे. उदया तिथीच्या आधारावर एकादशीचे व्रत ११ जूनला असणार आहे.
परमा एकादशीनिमित्त शुभ संयोग
हिंदू धर्मात अधिक मासावेळी येणाऱ्या एकादशी तिथीचे विशेष महत्व आहे. या वर्षात अधिक मास आल्याने परमा एकादशी ११ जूनला असणार आहे. ज्योतिषशास्रानुसार, परमा एकादशीवर शोभन आणि सर्वाथ सिद्धी योगाचा संयोग होत आहे, जो अत्यंत शुभ योग मानला जातो.
एकादशीवेळी काय करावे?
- पुण्यफल वाढवण्यासाठी या दिवशी सर्व इच्छा आणि सिद्धी देणारे भगवान विष्णू यांची पूजा ईशान्य दिशेला किंवा पूर्व/उत्तर दिशेला तोंड करून करावी.
- अधिक मासात तुलसी पूजनाला विशेष महत्त्व असते. त्यामुळे या एकादशीला भगवान दामोदर यांची तुलसी मंजिरी, पिवळा चंदन, रोळी, अक्षत, पिवळी फुले, हंगामी फळे, धूप-दीप आणि मिश्री यांनी भक्तिभावाने पूजा करावी.
- या दिवशी तुलसीची पाने तोडू नयेत, कारण शास्त्रांनुसार ते निषिद्ध मानले गेले आहे.
- गीता पाठ, विष्णू सहस्रनाम, श्रीसूक्त आणि “ॐ नमो भगवते वासुदेवाय” जप केल्याने पापमुक्ती व कर्जमुक्ती मिळून लक्ष्मी-नारायणाची कृपा प्राप्त होते.
- एकादशी व्रत सिद्धीसाठी भगवान विष्णूंसमोर तुपाचा अखंड दिवा लावावा.
- दीपदान करणे अत्यंत शुभ मानले जाते.
- संध्याकाळी घरात, मंदिरात, पिंपळाच्या झाडाखाली आणि तुळशीजवळ दिवे लावावेत.
- रात्री भगवान विष्णूंच्या प्रसन्नतेसाठी नृत्य, भजन, कीर्तन आणि जागरण करावे. असे केल्याने हजारो वर्षांच्या तपस्येइतके पुण्य मिळते असे मानले जाते.
- उन्हाळ्याच्या काळात ही एकादशी येत असल्याने छत्री, वस्त्र, अन्न, गूळ, धार्मिक पुस्तके आणि फळे यांचे दान करणे अत्यंत लाभदायक मानले जाते.
- भगवान श्रीकृष्णांना गायी अतिशय प्रिय आहेत, त्यामुळे गायींना चारा खाऊ घालणे आणि त्यांची सेवा करणे शुभ मानले जाते.
- पुरुषोत्तम एकादशीची कथा वाचल्याने किंवा ऐकल्याने भगवान विष्णूंची कृपा राहते.
- द्वादशीच्या दिवशी सूर्योदयानंतर ब्राह्मणांना भोजन व दक्षिणा देऊन नंतर अन्न व पाणी ग्रहण करावे.
एकादशीला काय करू नये?
- लसूण, कांदा, मांस, मासे, अंडी यांसारखे तामसिक पदार्थ खाऊ नयेत.
- दिवसा झोप घेणे टाळावे.
- कोणाचाही अपमान किंवा वाईट वर्तन करू नये.
- या दिवशी तांदूळ खाणे निषिद्ध आहे.
- व्रत करत नसाल तरीही तांदूळ खाणे टाळावे, कारण धार्मिक मान्यतेनुसार तांदूळ हे जीवस्वरूप मानले जाते.
- एकादशीला सात्त्विकता टिकवण्यासाठी या नियमांचे पालन करणे आवश्यक मानले जाते.


