सार

येत्या 26 जानेवारीला प्रजासत्ताक दिन साजरा केला जाणार आहे. या दिवशी घरच्याघरी काही खास पदार्थ तयार केले जातात. अशातच तुम्ही यंदाच्या प्रजासत्ताक दिनानिमित्त पनीर तिरंगा रेसिपी नक्की ट्राय करा.

Paneer Tiranga Recipe :  प्रजासत्ताक दिनानिमित्त वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. याशिवाय घरच्याघरी तिरंग्यातील तीन रंगांमधील खास पदार्थ तयार केले जातात. यंदाच्या प्रजासत्ताक दिनानिमित्त तुम्ही पनीर तिरंगा रेसिपी नक्की ट्राय करू शकता. जाणून घेऊया रेसिपीसाठी लागणारी सामग्री आणि कृती सविस्तर....

सामग्री

  • 250 ग्रॅम पीनर
  • लाल ढोबळी मिरचीची प्युरी
  • पालक प्युरी
  • 1 कांदा
  • 1 टोमॅटो
  • 1 चमचा आल-लसूण पेस्ट
  • 1 चमचा जीरे
  • 1 चमचा हळद
  • 1 चमचा लाल मिरची पावडर
  • 1 चमचा गरम मसाला
  • 2 मोठे चमचे तेल
  • मीठ

कृती

नारंगी रंगातील पनीर ग्रेव्हीसाठी

  • सर्वप्रथम एका पॅनमध्ये एक चमचा तेल गरम करून घ्या. तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये जीरे फोडणीसाठी घाला.
  • जीऱ्याच्या फोडणीत कांदा गोल्डन-ब्राउन रंगाचा होईपर्यंत भाजून घ्या. त्यामध्ये आल-लसूणची पेस्ट मिक्स करुन सर्व गोष्टी व्यवस्थितीत भाजा.
  • टोमॅटोची प्युरी मिक्स करुन त्यामध्ये हळद, लाल मिरची पावडर, गरम मसाला आणि मीठा टाका. यानंतर लाल रंगातील ढोबळी मिरचीची प्युरी आणि पनीर मिक्स करून सर्व सामग्री व्यवस्थितीत शिजू द्या.

पांढऱ्या रंगातील पनीर ग्रेव्हीसाठी
दुसऱ्या पॅनमध्ये एक मोठा चमचा तेल गरम करून घ्या. यामध्ये चिरलेला कांदा आणि पनीर मिक्स करा. कांद्याला ब्राउन रंग येईपर्यंत भाजा. अशाप्रकारे पनीर तिरंगासाठीची पांढऱ्या रंगातील पनीरची ग्रेव्ही तयार होईल.

हिरव्या रंगातील पनीर ग्रेव्हीसाठी
पालकला दोन मिनिट मंद आचेवर शिजवून त्याची प्युरी तयार करून घ्या. प्युरीमध्ये मीठ टाकून ती थोडावेळ शिजवा आणि घट्ट झाल्यानंतर त्यामध्ये पनीर मिक्स करा.

पनीर तिरंगा रेसिपीसाठी तयारी
एका प्लेटमध्ये वरील बाजूस नारंगी रंगातील पनीरची लेअर लावून घ्या. मध्यभागी पांढऱ्या रंगातील आणि खालच्या बाजूस हिरव्या रंगातील पनीरची लेअर लावून घ्या. पनीर तिरंगाच्या रेसिपीला कोथिंबिरचा वापर करून सजवून खाण्यासाठी सर्व्ह करा.

आणखी वाचा : 

प्रजासत्ताक दिनानिमित्त पांढऱ्या रंगातील हे Outfits नक्की ट्राय करा

असा इडली सांबार कधी खाल्लाय का? व्हायरल व्हिडीओला पाहून म्हणाल... (Watch Video)

Jalebi Recipe : अयोध्येतील प्रसिद्ध जिलेबी तयार करा घरच्याघरी, पाहा ही सोपी रेसिपी