उन्हाळ्यात टॅनिंग हटवण्यासाठी वापरा संत्र्याचा पल्प, असा करा वापर
Orange pulp benefits : उन्हाळ्याच्या दिवसात टॅनिंग हटवण्यासाठी ऑरेंज पल्पचा वापर करणे फायदेशीर ठरू शकते. यामुळे त्वचा फ्रेश आणि ग्लोइंग दिसू लागते.जाणून घेऊया ऑरेंज पल्प वापरण्याचे फायदे आणि पद्धत…
- FB
- TW
- Linkdin
)
टॅनिंगची समस्या
उन्हाळ्याच्या दिवसात उन्हातून बाहेर पडल्यानंतर त्वचेचे नुकसान होऊ शकते. अशातच त्वचा टॅन होऊ नये म्हणून सनस्क्रिन लोशनचा वापर केला जातो. यामुळे त्वचेचे संरक्षण होते. पण ऑरेंज पल्पचा वापर करुन त्वचेवरील टॅनिंग हटवू शकता.
संत्र्याचे फायदे
संत्र्यामध्ये व्हिटॅमिन सी आणि साइट्रिक अॅसिड त्वचेला एक्सफोलिएट करते. यामुळे त्वचेवरी डेड स्किन दूर होण्यास मदत होते. याशिवाय उन्हाळ्यात संत्र्याच्या पल्पमुळे त्वचा फ्रेश राहण्यासही मदत होते.
स्किन टाइपनुसार वापरा
खरंतर, संत्र्याच्या पल्पचा स्किन टाइपनुसार वापर करावा. त्वचा कोरडी किंवा तेलकट असल्यास ऑरेंज पल्पचा योग्य पद्धतीने वापर करावा. जेणेकरुन टॅनिंगच्या समस्येपासून दूर राहण्यास मदत होईल.
ऑरेंज पल्पचे फायदे
- ऑरेंज प्लपमध्ये नॅच्युरल ब्लीचिंग गुण असतात, जे त्वचेवर जमा झालेले टॅनिंग हळूहळू दूर करण्यास मदत करतात.
- संत्र्यामधील व्हिटॅमिन सी आणि साइट्रिक अॅसिड त्वचेला आतमधून स्वच्छ करण्यास मदत करते.
- ऑरेंज पल्पमधील अँटी-बॅक्टेरियल गुण पिंपल्स आणि स्किन इन्फेक्शनच्या समस्येपासून दूर रहण्यास मदत करतात.
असा करा वापर
एका ताज्या संत्र्याचा ज्यूस काढा.यानंतर चेहऱ्यावर संत्र्याचा पल्प मानेवर, हातांवर लावून 10 मिनिटे ठेवा. यानंतर थंड पाण्याने धुवा.
बेसन आणि संत्र्याच्या पल्प
दुसऱ्या पद्धतीनुसार, एक चमचा ऑरेंज पल्पमध्ये गुलाब पाणी, अर्धा चमचा बेसन मिक्स करुन पेस्ट तयार करा. ही पेस्ट चेहऱ्याला, हाताला आणि पायाला लावून ठेवा. यामुळे टॅनिंगची समस्या दूर होण्यास मदत होईल.
या गोष्टींची घ्या काळजी
- ऑरेंज पल्प लावल्यानंतर लगेच उन्हामध्ये जाणे टाळा.
- त्वचा अधिक संवेदनशील असल्यास पॅच टेस्ट करा.
- आठवड्यातून 2-3 वेळा ऑरेंज पल्पचा वापर करू नका. जेणेकरुन त्वचा कोरडी होणार नाही.
(Disclaimer : सदर लेख केवळ सामान्य माहिती देण्याकरिता आहे. Asianet News या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी आपण तज्ज्ञ किंवा आपल्या ओळखीच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)