सार
प्रत्येक वर्षी मार्च महिन्यातील दुसऱ्या बुधवारी 'No Smoking Day' म्हणजेच 'धूम्रपान निषेध दिवस' साजरा केला जातो. या दिवशी बहुतांशजण धूम्रपान करण्याची सवय मोडण्याचा संकल्प करतात. पण तुम्हाला माहितेय का, पहिली सिगरेट कोणी तयार केली होती?
No Smoking Day 2025 : आज 12 मार्चला ‘नो स्मोकिंग डे’ साजरा केला जात आहे. खरंतर, प्रत्येक वर्षी मार्च महिन्यातील दुसऱ्या बुधवारी नो स्मोकिंग डे साजरा केला जातो. धूम्रपान केल्याने होणारे दुष्परिणाम आणि ही सवय मोडण्यासाठी नागरिकांना प्रोत्साहन देण्यासाठी आजचा दिवस साजरा केला जातो. धूम्रपान निषेध दिवस पहिल्यांदाच वर्ष 1984 मध्ये आयर्लंडमध्ये साजरा करण्यात आला होता. यानंतर वर्ष 1920 च्या दशकातील वर्षांमध्ये हा दिवस डॉक्टरांचे रिपोर्ट्स आण अन्य आजारांसोबत जोडण्यात आला.
संशोधकांच्या मते, धूम्रपान निषेध दिवस साजरा करणे एक उत्तम बाब ठरली. यामध्ये असे दिसून आले की, 10 पैकी कमीत कमी एक व्यक्ती सिगरेट ओढण्याची सवय सोडतो. पण सिगरेट एवढी आरोग्याला नुकसान पोहोचवते आणि जीव देखील घेते तरीही ती तयार का करण्यात आणि कोणी तयार केली? याबद्दलच पुढे सविस्तर जाणून घेऊया.
सिगरेटबद्दल रंजक किस्सा
टोबॅको इन हिस्ट्री पुस्तकाचे लेखक जॉर्डन गुडमॅन यांचे असे म्हणणे आहे की, अमेरिकेतील जेम्स बुकानन ड्यूक यांना सिगरेट यांचा जन्मदाता म्हटले जाते. जेम्स बुकानन ड्यूक यांनी केवळ सिगरेट तयार केली नाही तर त्याच्या मार्केटिंगमध्येही उत्तम भूमिका निभावली.
जेम्स सिगरेटचे वाटप करायचे. हेच कारण होते की, जगभरात सिगरेटची लोकप्रयता अधिक वाढली गेली. वर्ष 1880 मध्ये ड्यूक केवळ 24 वर्षांचे होते, तेव्हा सिगरेट हाताने तयार करण्याच्या व्यवसायात पाऊल ठेवले होते. यानंतर उत्तर कॅरोलीनाच्या डरहम शहरातील काही जणांनी ड्यूक डरहम नावाने सिगरेट तयार केली. यादरम्यान, सिगरेटचे कोन कोपरे मोडून सील बंद करण्यात येत होती. यानंतर ड्यूक यांनी मशीनच्या मदतीने सिगरेट तयार करण्यास सुरुवात केली. ड्यूक यांचे असे म्हणणे होते की, हाताने तयार केलेल्या सिरगेटएवजी मशीनच्या मदतीने एकाच आकारत तयार करण्यात आलेली सिगरेट ओढणे नागरिकांच्या पसंतीस पडेल.
(Disclaimer : सदर लेख केवळ सामान्य माहिती देण्याकरिता आहे. Asianet News या माहितीची जबाबदारी घेत नाही.)