आजकाल वॉफल खाण्याचा ट्रेंड खूप वाढलाय, त्यामुळे अनेक जण घरी वॉफल मेकर आणतात. पण त्याचा वापर फक्त वॉफल बनवण्यासाठीच का करायचा? तुम्ही या मशीनचा वापर करून इतरही ५ भन्नाट पदार्थ बनवू शकता.

Waffle Maker Snacks: वॉफल मेकरचा वापर बहुतेकदा गोड वॉफल्स बनवण्यासाठी केला जातो. पण थोडा हटके विचार केला, तर यात अनेक चविष्ट आणि कुरकुरीत पदार्थही बनवता येतात. विशेष म्हणजे, यात तेल खूप कमी लागतं. चला, वॉफल मेकरमध्ये बनवता येणाऱ्या अशाच ५ सोप्या आणि क्रिएटिव्ह रेसिपींबद्दल जाणून घेऊया...

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred

वॉफल मेकर रेसिपी

1. बटाटा टिक्की वॉफल

बटाटा टिक्की वॉफल खूपच कुरकुरीत आणि खमंग लागतो. उकडलेल्या बटाट्यामध्ये मीठ, लाल तिखट, हिरवी मिरची, कोथिंबीर आणि थोडं कॉर्नफ्लोअर घालून मिश्रण तयार करा. वॉफल मेकरला थोडं तेल लावून गरम करा आणि त्यात बटाट्याचं मिश्रण घाला. १-२ मिनिटांत तुमची कुरकुरीत बटाटा टिक्की तयार होईल. ही टिक्की तुम्ही चटणी, दही किंवा सॉससोबत खाऊ शकता.

View post on Instagram

2. डोसा वॉफल

घरात डोशाचं पीठ उरलं असेल, तर तुम्ही त्याचा वापर करून डोसा वॉफल बनवू शकता. वॉफल मेकर गरम करून त्यात डोशाचं पीठ घाला. काही मिनिटांतच बाहेरून कुरकुरीत आणि आतून मऊ असा डोसा वॉफल तयार होईल. नारळाची चटणी आणि सांबारसोबत हा डोसा एकदम मस्त लागतो.

3. पनीर टिक्का वॉफल

पनीरचे तुकडे दही, मसाले आणि थोडं बेसन लावून मॅरिनेट करा. आता हे मिश्रण वॉफल मेकरमध्ये घालून काही मिनिटं शिजवा. यातून एक वेगळ्याच प्रकारचा पनीर टिक्का वॉफल तयार होईल, जो चवीला अप्रतिम लागतो.

4. भजी वॉफल

भजी खायला कोणाला आवडत नाही? बेसनाचं पीठ भिजवून त्यात कांदा, बटाटा किंवा पालक घाला. आता हे मिश्रण वॉफल मेकरमध्ये टाका आणि काही मिनिटांतच कुरकुरीत भजी वॉफल तयार!

5. कॉर्न चीज वॉफल

उकडलेल्या कॉर्नमध्ये किसलेलं चीज, थोडं मैदा किंवा कॉर्नफ्लोअर, मीठ आणि काळी मिरी घाला. हे मिश्रण वॉफल मेकरमध्ये टाकून शिजवा. यातून चविष्ट आणि चीझी कॉर्न वॉफल तयार होईल, जो लहान मुलांना आणि मोठ्यांनाही नक्की आवडेल.