उन्हाळ्याचे दिवस सुरू होताच त्वचेसंबंधित समस्या उद्भवू लागतात. त्वचेला खाज येणे किंवा त्यावर पुरळ येण्याची समस्या निर्माण होते. यावर कोणते उपाय करू शकता हे पुढे जाणून घेऊ.
त्वचेवर उन्हाळ्यात खाज येत असल्यास बहुतांशजण केमिकलयुक्त प्रोडक्ट्सचा वापर करतात. यामुळे काहींमध्ये त्वचेसंबंधित समस्या कमी होण्याएवजी अधिक वाढली जाते.
उन्हाळ्यात त्वचेवर येणारी खाज कमी करण्यासाठी एलोवेरा जेलचा वापर करू शकता. यामध्ये अँटी-माइक्रोबियल गुण असण्यासह अँटी-फंगल गुण असतात. यामुळे त्वचेला येणाऱ्या खाजेची समस्या कमी होईल.
उन्हाळ्यात शरीरातून अत्याधिक घाम निघत असल्यास थंड पाण्याने आंघोळ करा. यामुळे त्वचेवर येणारी खाजेची समस्या कमी होऊ शकते.
शरीरावर खाजेची समस्या दूर करण्यासाठी कडुलिंबाची पेस्ट किंवा कडुलिंबाच्या पाण्याने आंघोळ करा. यामधील अँटी-इंफ्लेमेंटरी व अँटी-फंगल गुण असल्याने त्वचेसंबंधित अन्य समस्याही दूर होतील.
नारळाचे तेल उन्हाळ्यात त्वचेसाठी वापरणे फायदेशीर ठरू शकता. यामुळे त्वचेवर येणारी खाज कमी होण्यास मदत होईल. यामशिवाय त्वचा मऊसरही होईल.
खाजेपासून सुटका मिळवण्यासाठी पुदीन्याची पेस्ट लावू शकता. यासाठी पुदीन्याची पाने मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्या. पुदीन्यामध्ये अँटीफंगल आणि अँटी इंफ्लेमेंटरी गुण असतात.
सदर लेख केवळ सामान्य माहिती देण्याकरिता आहे. Asianet News या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी आपण तज्ज्ञ किंवा आपल्या ओळखीच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.