No Smoking Day 2025 पासून फॉलो करा 5 सवयी, गंभीर आजार राहतील दूर
Lifestyle Mar 12 2025
Author: Chanda Mandavkar Image Credits:Getty
Marathi
धूम्रपान निषेध दिवस 2025
यंदा धूम्रपान निषेध दिवस 12 मार्चला साजरा केला जाणार आहे. खरंतर, हा दिवस प्रत्येक वर्षी मार्च महिन्यातील दुसऱ्या बुधवारी साजरा केला जातो.
Image credits: unsplash
Marathi
धूम्रपान निषेध दिवसाचे महत्व
नागरिकांमध्ये धूम्रपानाविषयी जनजागृती धूम्रपान सोडण्यासाठी नागरिकांना प्रोत्साहित करणे आणि यासंबंधित होणाऱ्या आरोग्यासंबंधित समस्यांबद्दल नागरिकांना सांगणे.
Image credits: freepik
Marathi
योगासन
फिजिकल अॅक्टिव्हिटीच्या कारणास्तव धूम्रपान करण्याची इच्छा कमी होते. यामुळे दररोज थोडावेळ योगासने करण्याचा प्रयत्न करा. यासाठी भुजंगासन, सेतूबंधासन किंवा सर्वांगसन करू शकता.
धूम्रपानाची सवय सोडायची असल्यास तुमची इच्छाशक्तीही फार महत्वाची आहे. यासाठी स्वत:साठी मर्यादा घाला. धूम्रपान करावेसे वाटल्यास दीर्घश्वास घ्या.
Image credits: freepik
Marathi
भविष्याबद्दल विचार करा
धूम्रपान करत असाल कर तुमच्या भविष्याबद्दल सर्वप्रथम विचार करा. तुमचे करियर, परिवार, मुलं-बाळ यांच्यासह आरोग्यावर काय परिणाम होऊ शकतो याकडे लक्ष द्या.
Image credits: freepik
Marathi
लिंबू पाणी
सकाळी उठळ्यानंतर दोन ग्लास कोमट पाण्यामध्ये लिंबू पिळून त्यात मध मिक्स करा. हे पाणी दररोज प्यायल्याने धूम्रपानाची सवय कमी होण्यास मदत होईल.
Image credits: freepik
Marathi
Disclaimer
सदर लेख केवळ सामान्य माहिती देण्याकरिता आहे. Asianet News या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी आपण तज्ज्ञ किंवा आपल्या ओळखीच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.