Navratri 2026 : दीपिका, रश्मिकाकडून घ्या बोल्ड लिपस्टिकच्या टिप्स
या सणासुदीला नेहमीच्या लाल रंगाऐवजी काहीतरी हटके आणि क्लासी लिप कॉम्बोज ट्राय करायचे आहेत? मग बॉलिवूडच्या या अभिनेत्रींकडून नक्की प्रेरणा घ्या.

बोल्ड मेकअप आणि लिप कॉम्बोज!
दुर्गा पूजेला लाल रंगाची लिपस्टिक छान दिसतेच, पण यावेळी नेहमीचा लाल रंग सोडून काहीतरी नवीन ट्राय केलं तर? हे भन्नाट लिप कॉम्बोज लावून तुम्ही नक्कीच उठून दिसाल. सगळे तुम्हाला विचारतील, "काय लावलंय ओठांवर?"

दीपिका पदुकोण
दीपिका पदुकोणसारखा लूक हवा असेल, तर आधी म्यूटेड मॉव्ह लिप लायनरने ओठांना आउटलाईन करा. ओठ थोडे मोठे दिसण्यासाठी हलकीशी बाहेरून लाईन मारा. मग तोच रंग ओठांवर भरा आणि तुमचा सॉफ्ट न्यूड लिप लूक तयार!
रश्मिका मंदान्ना
रश्मिका मंदान्नासारखे ग्लॉसी ओठ हवे असतील, तर लिप स्टेन, ग्लॉस किंवा लिप ऑइल वापरा. यामुळे ओठांना एक छान चमक आणि हलका रंग मिळतो. रंग फिका पडल्यास तुम्ही हे पुन्हा सहज लावू शकता.
आलिया भट्ट
सध्या ब्लर्ड न्यूड लिप्सचा ट्रेंड जोरात सुरू आहे! यासाठी पावडर फिनिश असलेली मॅट न्यूड लिपस्टिक निवडा. सॉफ्ट लूकसाठी पीच, पिंक आणि डस्टी न्यूड शेड्स एकदम भारी दिसतात.
करीना कपूर
करीना कपूरच्या या एव्हरग्रीन लूकसारखी क्लासिक ब्राऊन लिपस्टिक नेहमीच उठून दिसते! यासाठी ओठांना आउटलाईन करायची गरज नाही. फक्त वॉर्म ब्राऊन लिपस्टिक लावा आणि तुम्ही सणांसाठी एकदम रेडी आहात!
क्रिती सेनॉन
क्रिती सेनॉनसारखे पीची-टिंटेड ओठ हवेत? मग लिपस्टिकला सुट्टी द्या! तुमच्या आवडीच्या पीच शेडचा लिक्विड लिप स्टेन लावा आणि त्यावर रेग्युलर लिप बाम किंवा क्लिअर ग्लॉस फिरवा. तुमचा फ्रेश लूक तयार!







