सार

Navratri 2024 : आज नवरात्रीची पाचवी माळ आहे. या दिवशी देवी स्कंदमातेची पूजा केली जाते. जाणून घेऊया देवीसाठी केली जाणारी पूजा-विधीसह मंत्र जपबद्दल सविस्तर...

Skandamata Devi Puja on 5th Day Of Navratri 2024 : देशभरात शारदीय नवरात्रौत्सव मोठ्या आनंदात साजरा केला जात आहे. नऊ दिवसांच्या या उत्सवातील आज पाचवा दिसून असून देवी स्कंदमातेची पूजा केली जाते. पुराणांनुसार, देवी भगवान स्कंद यांची माता असल्याने तिला स्कंदमाता असे म्हटले जाते. देवीला पांढरा रंग अतिशय प्रिय आहे. पांढरा रंग सुख-शांतीचे प्रतीक आहे. मातृत्वाचे हे रुप व्यक्तीला शांती आणि आनंदाचा अनुभव देतो. देवी स्कंदमातेची पूजा केल्याने सर्व इच्छा पूर्ण होतात. याशिवाय पूजा-प्रार्थना केल्याने मोक्षाचे दरवाजे उघडतात असे मानले जाते. जाणून घेऊया देवी स्कंदमातेचे स्वरुप, पूजा-विधसह मंत्र जपबद्दल सविस्तर....

पंचमी तिथी
हिंदू पंचांगानुसार, तिथीची सुरुवात 7 ऑक्टोंबरला सकाळी 9 वाजून 7 मिनिटांनी सुरुवात होणार असून 8 ऑक्टोंबरला रात्री 11.17 मिनिटांनी संपणार आहे.

देवीचे स्वरुप
देवी स्कंदमाता कमळावर विराजमान झालेली आहे. यामुळे तिला पद्मासना देवी असेही म्हटले जाते. देवीचे वाहन सिंह असून तिला चार हात आहेत. देवीच्या उजव्या बाजूला भगवान स्कंद बसले आहेत. डाव्या आणि उजव्या बाजूच्या वरच्या हातात कमळ आहे.

अशी करा पूजा

  • स्कंदमातेची पूजा करण्यासाठी घटस्थाना केली आहे तेथे देवीची मुर्ती किंवा फोटो लावा.
  • देवीला फूल अर्पण केल्यानंतर फळ आणि मिठाईचा नैवेद्य दाखवा.
  • देवी स्कंदमातेसमोर तूपाचा दिवा लावून आरती करा.
  • अशाप्रकारे पूजा करणे अत्यंत शुभ मानले जाते. यामुळे देवीचे आशीर्वाद मिळतात.

देवी स्कंदमातेला नैवेद्य
नवरात्रीच्या पाचव्या दिवशी देवी स्कंदमातेची पूजा केली जात असल्याने तिला पांढरा रंग अतिशय प्रिय आहे. अशातच पंचमीला दूध आणि तांदळापासून तयार केलेली खीर नैवेद्य म्हणून दाखवू शकका. याशिवाय देवीला केळ आणि खीरचाही नैवेद्य दाखवू शकता. यामुळे देवी प्रसन्न होत आयुष्यात सुख-समृद्धी आणते असे मानले जाते.

देवीचा मंत्र जप

  • सिंहासनगता नित्यं पद्माञ्चित करद्वया। शुभदास्तु सदा देवी स्कन्दमाता यशस्विनी॥
  • ॐ देवी स्कन्दमातायै नमः॥
  • या देवी सर्वभूतेषु माँ स्कन्दमाता रूपेण संस्थिता। नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः॥

(DISCLAIMER : लेखाद्वारे वाचकांपर्यंत केवळ माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत. याबाबत Asianet News Marathi कोणताही दावा व समर्थन करत नाही. यासाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

आणखी वाचा : 

थालीपीठापासून ते लाडूपर्यंत, साबुदाण्याने बनवा या 10 वेगवेगळ्या रेसिपी

Navratri वेळी देवीच्या पूजेवेळी म्हणा हे 9 बीजमंत्र, संकटे होतील दूर