सार

Mumbaicha Raja 2024 Visarjan Live : मुंबईच्या राजाच्या विसर्जन मिरवणूकीला सुरुवात झाली आहे. यासाठी गणेशभक्तांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केल्याचे दिसून येत आहे. बाप्पाची पूजा केल्यानंतर आता त्याला निरोप देताना सर्वांचे डोळे पाणावले आहेत.

Mumbaicha Raja 2024 Visarjan Live : मुंबईत गणेशोत्सावेळी पहिला मान असणाऱ्या गणेशगल्लीतील मुंबईच्या राजाची विसर्जन मिरवणूक सुरु झाली आहे. सकाळीच बाप्पाची उत्तरपूजा करत बाप्पाला मंडपाबाहेर आणण्यात आले आहे. बाप्पाला मोठ्या थाटात आणि आनंदात निरोप दिला जात आहे. मंडपात सुंदर अशा रांगोळ्याही काढण्यात आल्या. आता ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाच्या विसर्जन मिरवणूकीला सुरुवात झाली आहे. मुंबईच्या राजाचे गिरगाव चौपाटीवर विसर्जन केले जाते. तेथेही गणेशभक्तांनी मोठी गर्दी होते. येथे पाहा घरबसल्या मुंबईच्या राजाचे विसर्जनाचे लाईव्ह…

YouTube video player