पावसाळ्यात कोणत्या प्रकारचे कपडे वापरावेत? जाणून घ्या शहनाज हुसैन यांनी सांगितलेल्या खास टिप्स

| Published : Jun 10 2024, 08:42 AM IST / Updated: Jun 10 2024, 08:44 AM IST

Monsoon Clothing Tips

सार

सध्या पावसाळ्याचे दिवस सुरु झाले आहेत. अशातच कोणत्या रंगाचे आणि कोणत्या प्रकारचे कपडे परिधान करावेत असा प्रश्न बहुतांशजणांना पडतो. याबद्दलच्या शाहनाज हुसैन यांनी काही खास टिप्स सांगितल्या आहेत.

Monsoon Clothing Tips : कडाक्याच्या उन्हापासून दिलासा मिळत सध्या पावसाच्या सरी ठिकठिकाणी बरसण्यास सुरुवात झाली आहे. अशातच पावसाळ्यात कोणत्या प्रकारचे आणि रंगाचे कपडे परिधान करावेत जेणेकरुन कंम्फर्टेबल वाटेल असा प्रश्न बहुतांशजणांना पडतो. जाणून घेऊया पावसाळ्यात योग्य कपडे कसे निवडावे आणि स्टाइल करण्यासंदर्भात प्रसिद्ध ब्युटी आणि हेअर केअर एक्सपर्ट्स शहनाज हुसैन यांनी सांगितलेल्या काही खास टिप्स सविस्तर...

अशाप्रकारचे कपडे परिधान करा
फॅशन ट्रेण्ड कोणताही असो, बदललेल्या तापमानानुसार सिंपल कपडे परिधान करणे गोल्डन रुल आहे. पण ग्रुमिंगची सुरुवात पर्सनल हाइजीनपासून होते. पावसाळ्यात अंगाला घट्ट बसणारे कपडे परिधान करणे टाळावे असे नेहमीच सांगितले जाते. कारण घट्ट कपड्यांमध्ये भिजल्यानंतर त्वचेसंबंधित काही समस्या निर्माण होऊ शकतात. अशातच पावसाळ्यास अशाप्रकारचे कपडे परिधान करा जे सुटसुटीत आणि कंम्फर्टेबल असतील.

योग्य रंगांची निवड
पावसाळ्याच्या दिवसात योग्य रंगांची निवड करणे अत्यंत महत्वाचे आहे. या दिवसांमध्ये गडद रंगांच कपडे परिधान करावेत. पांढरा, नारंगी, पिवळा, जांभळा अशा गडद रंगांमधील कपडे परिधान करु शकता. पण तुमच्या स्किन टोनला सूट होतील त्यानुसारच गडद कपड्यांची निवड करावी. याशिवाय सटल लूकसाठी आयव्हरी, लेमन आणि लीफ ग्रीन रंगातील कपडे परिधान करू शकता. सर्वाधिक महत्वाचे म्हणजे न्यूट्रल शेड्सची निवड करता. जेणेकरुन कपड्यांवर शोभेल अशी ज्वेलरी, बॅग आणि फुटवेअर घालू शकता.

अशा फॅब्रिकचे कपडे निवडा
पावसाळ्यात कॉटन, ऑर्गेंजा, शिफॉन अथवा जॉर्जेट कापडापासून तयार केलेले कपडे परिधान करणे बेस्ट पर्याय आहे. याशिवाय पावसाळ्यात सिंथेटिक, डेनिम कपडे अजिबात परिधान करु नका. याउलट फ्लोइंग शिफॉन अथवा जॉर्जेटच्या कपड्यांची निवड करा. पावसाळ्यात फ्लोरल प्रिंट अथवा डिजिटल प्रिंट असणाऱ्या कपड्यांची निवड करू शकता. अशाप्रकारचे कपडे तुमचा लूक पावसाळ्यात अधिक खुलवतात.

पावसाळ्यात अशी करा स्टाइल
पावसाळ्यात विशिष्ट फॅशन केली पाहिजे असे नाही. पण शहनाज हुसैन म्हणतात, पावसाळ्यात ट्रेडिशनल आणि वेस्टर्न आउटफिट्स ट्राय करु शकता. अथवा कॉम्बिनेशन लूक क्रिएट करू शकता. यासाठी शॉर्ट स्कर्ट, क्रॉप टॉप अथवा एथनिक लूक देणारे कपडे पावसाळ्यात स्टाइलिश दिसण्यासाठी पुरेसे आहेत. या पद्धतीचे कपडे तुम्ही वेगवेळ्या प्रकारे परिधान करू शकता.

या गोष्टींचीही घ्या काळजी
पावसाळ्यात पायांकडे देखील लक्ष द्यावे. पाय व्यवस्थितीत धुवावेत आणि सुकवावेत. यानंतर पायांना टाल्कम पावडर लावा. याशिवाय पावसाळ्यात पाय झाकले जातील अशा चप्पल, शूजची निवड करा. महत्वाचे म्हणजे, थंड पाण्यात मीठ मिक्स करुन त्यामध्ये काहीवेळ पाय बुडवून ठेवा.

आणखी वाचा :

मुंबई-पुण्याजवळ पावसाळ्यात 2K मध्ये होईल ट्रिप, पाहा 10 अनोखी ठिकाणे

घरच्याघरी तयार करा हे 5 अंड्याचे Hair Mask, केस होतील मऊ आणि हेल्दी