मुंबई-पुण्याजवळ पावसाळ्यात 2K मध्ये होईल ट्रिप, पाहा 10 अनोखी ठिकाणे
Lifestyle Jun 08 2024
Author: Chanda Mandavkar Image Credits:freepik
Marathi
महाबळेश्वर
हिरव्यागार निसर्गाच्या प्रेमात पडायचे असल्यास पावसाळ्यात महाबळेश्वरला नक्की भेट देऊ शकता. येथील उंचचउंच डोंगर आणि धुक्यांमुळे पावसाळ्यातील ट्रिपची मजा लूटता येईल.
Image credits: Our own
Marathi
लोणावळा-खंडाळा
लोणावळा-खंडाळा पुणे आणि मुंबईजवळील सर्वाधिक लोकप्रिय हिल स्टेशन आहे. पावसाळ्यात लोणावळा-खंडाळ्याला पर्यटकांची फार मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते.
Image credits: Freepik
Marathi
पाचगणी
पाचगणी एक प्रसिद्ध हिल स्टेशन आहे. पाचगणी येथे पासरी पॉइंट, सिडनी पॉइंट आणि अन्य काही ठिकाणांना भेट देऊ शकता.
Image credits: Freepik
Marathi
अलिबाग
अलिबागच्या समुद्रकिनारी वर्षभर पर्यटकांची गर्दी होत राहते. पण पावसाळ्यात अलिबागला तुम्हाला बोटीने नव्हे रस्ते मार्गाने प्रवास करावा लागेल.
Image credits: Facebook
Marathi
भंडारदरा
भंडारदरा येथील निसर्ग आणि सह्याद्री डोंगररांचे सौंदर्य पाहण्यासाठी पावसाळ्यात हमखास भंडारदराचे प्लॅनिंग केले जाते. या ठिकाणी कॅम्पिंगची सोय पर्यटकांना उपलब्ध आहे.
Image credits: Freepik
Marathi
इगतपुरी
इगतपुरी प्रसिद्ध हिल स्टेशन असून येथे पावसाळ्यात अनेक ग्रुप ट्रेक करतात. उंच डोंगरांवरुन समोर दिसणारा नजारा तुम्हाला मोहात पाडणारा ठरतो.
Image credits: facebook
Marathi
माथेरान
माथेरान एक लहान हिल स्टेशन असून येथे तुम्हाला वाहने घेऊन जाण्याची परवानगी नाही. पण 2 हजारांपेक्षा कमी खर्चात तुम्ही पावसाळ्यात माथेरानची ट्रिप प्लॅन करू शकता.
Image credits: Facebook
Marathi
कामशेत
पॅराग्लाइडिंगसाठी कामशेत प्रसिद्ध आहे. पण पावसाळ्यात कामशेत येथे सर्वत्र हिरवळ आणि शांत वातावरणात तुम्ही रिलॅक्स होऊ शकता.
Image credits: Facebook
Marathi
लवासा
पुण्याजवळ असणाऱ्या लवासाला पावसाळ्यात भेट देऊ शकता. येथील तलाव, धबधबे तुमच्या ट्रिपची मजा द्विगुणीत करतील.
Image credits: Facebook
Marathi
माळशेज घाट
माळशेज घाटातून पावसाळ्यात नक्कीच प्रवास केला जातो. पावसाळ्यामुळे हिरवार घाट पाहण्याचा नजराच वेगळा असतो.