अर्धा कप दह्यात अंड फेटून घेऊन त्याचा हेअर मास्क तयार करा. हेअर मास्क केसांना अर्धा तास ठेवल्यानंतर स्वच्छ धुवून घ्या.
मध आणि अंड्याचा हेअर मास्क तयार करण्यासाठी दोन्ही सामग्री व्यवस्थितीत मिक्स करा. मऊ केसांसाठी तुम्ही आठवड्यातून एकदा अंड आणि मधाचा हेअर मास्क केसांना अर्धा तासांसाठी लावून ठेवा.
अंड्यामध्ये एक चमचा ऑलिव्ह ऑइल मिस्क करुन हेअर मास्क तयार करा. यामुळे केस मऊ आणि हेल्दी राहण्यास मदत होईल.
एक केळ स्मॅश करुन त्यामध्ये अंड मिक्स करा. हेअर मास्क केसांना लावल्यानंतर अर्धा तास लावून ठेवा आणि त्यानंतर स्वच्छ पाण्याने धुवा.
एका वाटीमध्ये अंड आणि 4-5 नारळाचे थेंब टाकून हेअर मास्क तयार करा. हेअर मास्क केसांना हलक्या हाताने लावून मसाज करा. यानंतर अर्ध्या तासाने हेअर मास्क शॅम्पूने धुवा.
दोन चमचे मेथी दाण्याची पावडर आणि अंड मिक्स करुन हेअर मास्क तयार करा. यानंतर अर्धा तास हेअर मास्क केसांना लावून शॅम्पू करा. यामुळे केस मऊ आणि हेल्दी राहण्यास मदत होईल.
अर्धी वाटी एलोवेरा जेलमध्ये अंड मिक्स करा. यापासून तयार केलेला हेअर मास्क केसांना लावल्याने केस मऊ आणि मजबूत होण्यास मदत होईल.