Bird Flu मुळे जगात पहिला मृत्यू, जाणून घ्या H5N2 बद्दल सर्वकाही

| Published : Jun 06 2024, 03:40 PM IST

bird flue

सार

वर्ल्ड हेल्थ ऑर्गेनाइजेशनने बर्ड फ्लू मुळे व्यक्तीचा मृत्यू झाल्याची पहिली नोंद झाल्याची माहिती दिली आहे. याशिवाय व्हायरसमध्ये होणाऱ्या बदलावाबद्दलही डब्लूएचओने चिंता व्यक्त केली आहे.

Bird Flue Death : मॅक्सिकोमध्ये बर्ड फ्लू संक्रमित एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याचे प्रकरण समोर आले आहे. याबद्दल वर्ल्ड हेल्थ ऑर्गेनाइजेशनने बुधवारी (5 जून) याची माहिती दिली आहे. बर्ड फ्लू मुळे पहिल्यांदाच एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झालाची घटना समोर आली आहे. अशातच संपूर्ण जगभरातील वैज्ञानिक अ‍ॅलर्ट झाले आहेत. याशिवाय डब्लूएचओने बर्ड फ्लू बद्दल चिंता व्यक्त केली आहे.

मॅक्सिकन हेल्थ अधिकाऱ्यांनुसार, 59 वर्षीय व्यक्तीमध्ये ताप, श्वसनासंबंधित समस्या, मळमळ, उलटी अशी काही सामान्य लक्षणे दिसून आली. सदर व्यक्ती तीन आठवडे बेडवरच झोपून होता. आजार वाढल्यानंतर अखेर रुग्णालयात व्यक्तीला भरती करण्यात आले. पण 24 एप्रिलला व्यक्तीचा मृत्यू झाला. आरोग्य मंत्रालयाने म्हटले की, मृत व्यक्तीच्या संपर्कात येणाऱ्या व्यक्तींची तपासणी केली असता ती निगेटिव्ह आली. असे सांगितले जात आहे की, पीडित व्यक्ती कधीच याआधी पोल्ट्री अथवा अन्य जनावरांच्या संपर्कात आला नव्हता.

व्हायरसच्या स्ट्रेनमध्ये बदल
डब्लूएचओनुसार, जागतिक स्तरावर रिपोर्ट करण्यात आलेल्या इन्फुएंजा ए (H5N2) व्हायरसच्या संक्रमण पहिल्यांदाच एखाद्या व्यक्तीला झाले आहे. अशातच व्हायरसमध्ये होणाऱ्या बदलावामुळे वैज्ञानिक सतर्क झाले आहेत. याआधी करण्यात आलेल्या रिपोर्ट्सनुसार, मृत्यूसाठी जबाबदार असणारा स्ट्रेन सध्या अमेरिकेतील पशूधनमध्ये प्रसारित होणाऱ्या बर्ड फ्लू स्ट्रेनपेक्षा वेगळा आहे. युएसमध्ये मार्च महिन्यात डेअरी दुग्धशाळेत H5N1 स्ट्रेनचा शोध लागला होता.

H5N2 इन्फ्लूएंजा व्हायरस नक्की काय आहे?
H5N2 इन्फूएंजा व्हायरस पक्षांच्या माध्यमातून होणारे संक्रमण आहे. यामुळे पक्षांचा मृत्यू होऊ शकतो. वर्ष 2005 मध्ये जापानच्या इबाराकी येथील कोंबड्यांना H5N2 इन्फ्लूएंजा व्हायरसचे संक्रमण झाले होते. यामध्ये मोठ्या प्रमाणात कोंबड्यांचा मृत्यूही झाला होता. H5N2 इन्फ्लूएंजा व्हायरस व्यक्तींना देखील संक्रमित करू शकतो.

व्यक्तीमध्ये एवियन फ्लूची प्रमुख लक्षणे-

  • डोळे लाल होणे
  • ताप येणे
  • घसा खवखवणे
  • नाक गळत राहणे किंवा बंद होणे
  • डोकेदुखी
  • थकवा
  • मळमळ
  • उलटी
  • स्नायू किंवा अंग दुखी
  • श्वास फुलणे अथवा श्वास घेण्यास समस्या

आणखी वाचा : 

आरोग्यासाठी गाय की म्हशीचे दूध सर्वाधिक उत्तम? जाणून घ्या सविस्तर

दूधासोबत कधीच या 5 गोष्टींचे सेवन करू नका, आरोग्यासाठी ठरतील घातक