Lifestyle

दूधासोबत कधीच या 5 गोष्टींचे सेवन करू नका, आरोग्यासाठी ठरतील घातक

Image credits: Freepik

जागतिक दूध दिवस 2024

1 जूनला जागतिक दूध दिवस साजरा केला जातो. वर्ल्ड मिल्ड डे चे निमित्त दूधाच्या फायद्यांप्रति नागरिकांमध्ये जागृकता निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो.

Image credits: Freepik

दूधातील पोषण तत्त्वे आणि तज्ज्ञांचा सल्ला

दूधात प्रत्येक प्रकारच्या पोषण तत्त्वांचा समावेश असतो, जे आपल्या आरोग्यासाठी अत्यावश्यक असतात. पण दूधात कोणत्या गोष्टी मिक्स करुन पिऊ नये याबद्दलच जाणून घेऊया सविस्तर...

Image credits: Freepik

केळ आणि दूध

बहुतांशजण केळ आणि दूधाचे एकत्रित सेवन करतात. पण आरोग्य तज्ज्ञांनुसार केळ आणि दूधाचे एकत्रित सेवन केल्याने पचनासंबंधित समस्या निर्माण होऊ शकते. याशिवाय थकवा देखील जाणवू शकतो.

Image credits: Freepik

फळांसोबत दूध

फळांसोबत दूध पिणे आरोग्यासाठी घातक ठरू शकते. फळांसोबत दूध प्यायल्याने उलटी होऊ शकते.

Image credits: Freepik

मूळा आणि दूध

आयुर्वेदानुसार, मुळा खाल्ल्यानंतर लगेच दूधाचे सेवन करू नये. यामुळे पोटात जळजळ होणे, आग पडणे अशी समस्या उद्भवू शकते.

Image credits: Freepik

मासे आणि दूध

दूध प्यायल्याने शरिराला थंडावा मिळतो आणि मासे खाल्ल्याने शरिराचे तापमान वाढले जाते. मासे आणि दूधाचे कॉम्बिनेशनमुळे शरिरात केमिकल बदल होतात. यामुळे पचनासंबंधित समस्या होऊ शकते.

Image credits: Freepik

दूधासोबत आंबट पदार्थ

आरोग्य तज्ज्ञांकडून दूधासोबत आंबट पदार्थांचे सेवन करू नये. यामुळे सर्दी, खोकला अथवा अ‍ॅलर्जीची समस्या उद्भवू शकते.

Image credits: Freepik

Disclaimer

सदर लेख केवळ सामान्य माहिती देण्याकरिता आहे. Asianet News या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी आपण तज्ज्ञ किंवा आपल्या ओळखीच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा

Image credits: Freepik