सार

अमूल दूध कंपनीने आपल्या दूधाच्या किंमतीत 2 रुपये प्रति लीटर दराने वाढ केली आहे. खरंतर, दूध उत्पादनासाठी येणाऱ्या खर्चात वाढ झाल्याने कंपनीने दूधाच्या किंमती वाढवल्या आहेत. पण आरोग्यासाठी सर्वाधिक उत्तम दूध गाय की म्हशीचे असते हे तुम्हाला माहितेय का?

Healthiest Milk Options :  दूधामुळे शरिराला पुरेशा प्रमाणात पोषण तत्त्वे आणि कॅल्शिअम मिळते. दूधातील कॅल्शिअममध्ये प्रोटीन आणि फॅट्सचे प्रमाण सर्वाधिक असते. सर्वसामान्यपणे मार्केटमध्ये दोन प्रकारचे दूध मिळतात. बहुतांशजण गाय किंवा म्हशीचे दूध खरेदी करणे पसंत करतता. अशातच अमूल दूधाच्या किंमतीत देखील वाढ करण्यात आली आहे. पण आरोग्यासाठी गाय की म्हैस या दोघांपैकी कोणते दूध फायदेशीर असते हे माहितेय का?

गाय की म्हशीचे दूध?
गाईच्या दूधात प्रोटीन, कॅल्शिअम, व्हिटॅमिन डी आणि फॉस्फरसचे प्रमाण सर्वाधिक असते. याशिवाय दूधात लॅक्टोजही असते. तर म्हशीच्या दूधात अधिक फॅट्स आणि कॅलरीज असतात. याशिवाय म्हशीचे दूध कॅल्शिअम, मॅग्नेशिअम, पोटॅशिअम आणि फॉस्फरसचाही उत्तम स्रोत मानले जाते.

मार्केटमध्ये उपलब्ध असलेले अन्य दूधाचे प्रकार
मार्केटमध्ये अन्य प्रकारचे दूध देखील उपलब्ध आहे. जसे की, सोया मिल्क, बदाम मिल्क. जर तुम्हाला एखाद्या डेअरी दूधामुळे अ‍ॅलर्जीची समस्या उद्भवत असे तर लो फॅट दूधाचे सेवन करावे. यामध्ये पॉली अनसॅच्युरेटेड फॅट आणि फायटो-एस्ट्रोजन असते, जे हृदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर मानले जाते.

कोणते दूध आरोग्यासाठी उत्तम
मार्केटमध्ये काजू मिल्क, नारळाचे दूध, ओट मिल्क आणि बकरीचे दूध देखील मिळते. बहुतांशजण लठ्ठपणा वाढू नये म्हणून स्किम्ड दूध, टोंड मिल्क अथवा डबल टोंड मिल्कचा वापर करतात. पण अशाप्रकारचे दूध आरोग्यासाठी फायदेशीर नसतात. दूधातील वसा काढल्यानंतर त्याची भरपाई करण्यासाठी स्किम्ड मिल्कमध्ये काही गोड तत्त्वे मिक्स केली जातात. यामुळेच गाय किंवा म्हशीचे दूध आरोग्यासाठी फायदेशीर आहे.

दूधाच्या सेवनाने समस्या असल्यास काय करावे?
ज्या व्यक्तींना दूधाचे सेवन केल्यानंतर पोटात दुखते त्यांनी दूधाचे सेवन करू नये. त्याएवजी दह्याचे सेवन करावे. यामध्ये लॅक्टोजचे प्रमाण फार कमी असते. याशिवाय दही अगदी सहज पचण्यास मदत होते. दूधामधील अन्य प्रकारांपैकी काजू अथवा नारळाचे दूध आरोग्यासाठी बेस्ट मानले जाते. याच्या माध्यमातून शरिराला आवश्यक असलेल्या पोषण तत्त्वांची पुर्तता पूर्ण केली जाते.

अमूल दूधाच्या किंमतीत वाढ
अमूल कंपनीने आपल्या दूधाच्या किंमतीत दोन रुपयांनी वाढ केली आहे. यामुळे अमूल गोल्ड, अमूल शक्ती, अमूल टी स्पेशल दूधाचे दर वाढले आहेत. दूधाचे नवे दर 03 मे पासून देशभरात लागू करण्यात आले आहेत.

(Disclaimer : सदर लेख केवळ सामान्य माहिती देण्याकरिता आहे. Asianet News या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी आपण तज्ज्ञ किंवा आपल्या ओळखीच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)

आणखी वाचा : 

दूधासोबत कधीच या 5 गोष्टींचे सेवन करू नका, आरोग्यासाठी ठरतील घातक

वेगाने लठ्ठपणा कमी करायचाय? डाएटमध्ये प्या 5 हेल्दी ज्यूस